इतर धर्मांच्या धार्मिकांप्रमाणे ख्रिश्चन धार्मिकसुद्धा फलज्योतिष, पुनर्जन्म, शरीरबाह्य अनुभव (out of body experience), भूत, भानामती, अतींद्रिय शक्ती, परमेश्वरी चमत्कार, प्रार्थनेतून इष्टपूर्ती इ. अनेक श्रद्धा-अंधश्रद्धावर (अजूनही) विश्वास ठेवतात. परंतु काही श्रद्धांचे प्रकार मात्र ख्रिश्चन धर्माशीच निगडित आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या श्रद्धा खालील प्रमाणे आहेत.
* ख्रिश्चन धार्मिकांच्या ‘कम्युनियन’ या विधीच्या वेळी प्रीस्ट/बिशप यांनी खाण्यासाठी वापरलेला ब्रेड वा वेफरचा तुकडा म्हणजे ख्रिस्ताचे शरीर असून त्याच्या सेवनामुळे ख्रिस्त आपल्या शरीरात वास करतो, असे धार्मिकांना वाटते. या विधीच्या वेळी वाइनचे सेवनही केले जाते. तेही येशूचे रक्त असून ते पिल्यामुळे येशू आपल्या शरीरात येतो व आपली सर्व दुःखं दूर करतो, असे त्यांना वाटते. (मुळात ही ‘कम्युनियन’ची विधी धर्मग्रंथात नमूद केलेल्या जीजसच्या सांगण्यावरून केली जाते, असा त्यांचा दावा आहे. ही रूढी एके काळी प्रचलित असलेल्या नरबळीचे भ्रष्ट स्वरूप आहे.) * बाप्तिस्मा करतेवेळी भक्ताच्या डोक्यावर ‘पवित्र’ पाण्याचा शिडकाव केला जातो. त्यामुळे भक्ताची सर्व ‘पापे’ धुऊन जातात अशी श्रद्धा त्यामागे आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये ‘सैतान’ (डेव्हिल) – अंधाराचा राजा – ही संकल्पना घर करून आहे. मुळात ही संकल्पना आदिम काळातील मूर्तिपूजकांकडून उचललेली आहे. ‘गोट गॉड’चे शिंग, शेपूट व पायाची खुरं उचलून शैतानाला चिकटवलेली आहेत. * ख्रिश्चन धार्मिकांच्या मृत्यूनंतर ट्रंपेटवर ‘जज्ज दि लिव्हिंग अँड दि डेड’ हे गीत धर्मगुरूंच्या आज्ञेवरून वाजवल्याशिवाय तो मृतात्मा तेथेच पडून राहतो. एकदा का हे गीत वाजवले की त्याला पुनर्जन्म मिळतो. * धर्मगुरूंच्या समोर तुम्ही तुमच्या ‘पापा’ची कबुली (कन्फेशन) दिल्यास तुमची सर्व ‘पापे’ धर्मगुरू धुऊन काढतो. यात कुठलेही कार्य व कारण यांचा संबंध नाही, असे त्यांना वाटते. * धार्मिकाच्या अंत्यविधीच्या वेळी प्रीस्टने उच्चारलेल्या मंत्रवत शब्दामुळे मृत व्यक्तीला स्वर्गात जागा मिळण्याची शक्यता असते. (विशेषकरून तुम्ही तुमच्या संपत्तीचे दान चर्चला केल्यास!) तुम्ही चर्चच्या नावे वेळोवेळी दान देत असल्यास स्वर्गातील तुमची जागा पक्की होते. * येशूने जन्माला घातलेल्या अॅडम आणि ईव्ह यांनी (आवाज नसलेल्या) सापाच्या सांगण्यावरून सफरचंद खाल्ल्यामुळे माणूस जातीचे अतोनात नुकसान झाले. माणसांना वाचवण्यासाठी जीजसचा जन्म झाला यावर धार्मिकांची श्रद्धा आहे. बाप्तिस्मा करायच्या अगोदर मूल मृत झाल्यास त्याला स्वर्गात प्रवेश नाही. * सैतानाला दूर ठेवण्यासाठी क्रॉस चिन्हाचा व चर्चमधील पवित्र पाण्याचा वापर केला जातो. परमेश्वर पापी आत्म्याला शाश्वतपणे नरकात ढकलण्याची शिक्षा देऊ शकतो. ख्रिश्चन धार्मिकांनी गर्भनिरोधक साधनं वापरल्यास किंवा घटस्फोटित व्यक्तीशी पुर्नविवाह केल्यास वा परस्त्री/परपुरुषाशी लैंगिक व्यवहार केल्यास तो/ती मृत झाल्यानंतर लाखो-करोडो वर्षे नरकात जाण्याची शक्यता आहे. (काही वर्षांपूर्वी हीच शिक्षा शुक्रवारी हॅम सँडविच खाणार्यासाठीसुद्धा होती) * तुम्ही हिटलरच्या तोडीचे गुन्हा वा पाप केले असले तरी मृत्यपूर्वी तुम्ही क्षमा मागितल्यास तुम्ही थेट स्वर्गात जाऊ शकता.