Categories
इतर

संविधानाची प्रास्ताविका वाचून गृहप्रवेश – गोवळकर कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम; धार्मिक विधींना दिला फाटा

जून - २०१९

खेड (जि. रत्नागिरी) जवळील चिनकटेवाडी येथील सचिन, संदीप आणि संजय गोवळकर बंधूंनी बांधलेल्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश भारताच्या संविधानाची प्रास्ताविका वाचून केला. भारतीय संस्कृतीचे धार्मिक विधी, पूजापाठ यांना त्यांनी फाटा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. चिनकटेवाडीतील सर्व ग्रामस्थ व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. हे तीनही बंधू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेली अनेक वर्षेजिल्ह्यात काम करत […]

Categories
इतर

शून्य सावलीचा भरीव अनुभव

जून - २०१९

असे म्हणतात की, आपली सावली नेहमी आपल्यासोबतच असते; परंतु 7 मे 2019 रोजी दुपारी 12 वाजता सावलीने चक्क आपली पाठ सोडल्याचे अनेकांनी अनुभवले. विद्यार्थ्यांच्या जीवनात विज्ञानाचे भान राखून त्यांनी प्रयोगशीलता जोपासण्यासाठी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली शाखेच्या कार्यकर्त्यांनी 5 ते 7 मे 2019 या दिवसांत सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे ‘शून्य सावली’ची अनुभूती दिली. […]

Categories
इतर

विदर्भात सहा महिलांची सहा दिवस सहा जिल्ह्यांत फटाकेमुक्त प्रबोधन यात्रा

जानेवारी २०१९

फटाकेमुक्त अभियान प्रबोधन यात्रा, पूर्वविदर्भ असा प्रवास ठरला. सुरुवातीला मनात भ्रमण करावं, अशीच कल्पना होती. डॉ. हरिष पेटकर यांनी आम्हाला अंनिसचा उपक्रम लोकांपर्यंत घेऊन जाण्यास सुचविले. त्यांनी सुचविलेली ही संकल्पना. परिवर्तन स्वयंसहाय्यता बचत गटामध्ये सर्वांनाच आवडली. (प्रत्येकाच्या काही ना काही मर्यादा, अडचणी या होत्याच.) ज्यांनी होकार दिला आणि या फटाकेमुक्त अभियानात दुचाकीच्या प्रवासात सहभागी झाल्या […]

Categories
इतर

कळंब येथील नरबळीने पीडित कुटुंबाला मिळाली अंनिसच्या प्रयत्नाने शासकीय मदत

जानेवारी २०१९

मौजे पिंपळगाव (डोळा) ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथील एक गरीब कुटुंब. त्या कुटुंबातील कृष्णा नामक शाळकरी मुलगा 26 जानेवारीच्या प्रभात फेरीत सामील झाला. तो घरी परत आलाच नाही. आई घरी वाट पाहत होती. घरी आला नाही म्हणून आई कृष्णाला शोधत – शोधत शाळेत आली. कुणीच दिसले नाही, म्हणून गावातील नातेवाईक, मित्र यांच्याकडे शोध घेतला, सर्वांनी […]

Categories
इतर

नागपूर स्मशानभूमीत लागले देहदानाचे आवाहन फलक

फेब्रुवारी - २०१८

नागपूर (कोराडी) : महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोराडी शाखेच्या वतीने देहदान, अवयवदान आवाहन फलकाचे उद्घाटन राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. मनोगतात बोलताना पाटील यांनी सांगितले की, स्मशानभूमीत कोराडी शाखेच्या वतीने घेतलेला हा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पहिला आहे व सर्व 347 शाखांना स्मशानभूमीत देहदान, अवयवदानाचा संदेश व प्रेरणा देणारा […]