Categories
जट निर्मूलन

शरयू वारंग या वृद्ध महिलेला केले जटामुक्त

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

तारळे व सातारा अंनिसचा उपक्रम गेली जवळपास 10 वर्षे अत्यंत क्लिष्ट अशा डोक्यावरील जटेच्या बंधनात अडकलेल्या व जटेमुळे मनाचा कोंडमारा झालेल्या व त्यामुळे डोके सतत जड वाटणे, एकटेपणा जाणवणे, सतत डोकेदुखीचा त्रास अशा विचित्र अवस्थेत व मन:स्थितीत असलेल्या शरयू विलासराव वारंग, रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा या महिलेला जटामुक्त करण्यासाठी महा. अंनिसला यश आले. […]

Categories
अनिष्ट रुढी - परंपरा जट निर्मूलन

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे 100 वे जटा निर्मूलन

फेब्रुवारी २०१९

11 वर्षांच्या मुलीची केली जटेतून मुक्तता राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या घावर गावातील एका व्यक्तीने जटा निर्मूलनाविषयी तीन महिन्यांपूर्वी पेपरमधील बातमी वाचून मला फोन केला, ‘माझे नाव गुपित ठेवणार असाल तर आपल्याला एक गोष्ट सांगावयाची आहे.’ ‘मी आपले नाव गुपित ठेवेन,’ हे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, ‘घावर या गावात इयत्ता 6 वीत शिकत असलेल्या (11 […]

Categories
जट निर्मूलन

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सौ.मंगल चव्हाणला केले 20 वर्षाच्या देवीच्या जटेतून स्वतंत्र

सप्टेंबर - २०१८

21 व्या शतकातही आपला समाज अजूनही देवींच्या जटांसारख्या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचे पहावयास मिळते. सातारा अंनिसच्या प्रयत्नांमुळे 50 वर्षीय सौ.मंगल चव्हाण रा. आबेपुरी पाचुपतेवाडी, ता.वाई, जि.सातारा यांच्या गेल्या 20 वर्षापेक्षाही जास्त काळ डोक्यावर असलेल्या साधारण अडीच ते तीन फुटी जटा सोडवून खर्‍या अर्थाने तिला या जटेच्या जोखडातून स्वतंत्र करण्याचे काम केले आहे. सौंदतीच्या यल्लमा देवीच्या असलेल्या […]

Categories
जट निर्मूलन

नेसरीतील वृद्ध महिला झाली जटमुक्त

ऑगस्ट २०१८

गडहिंग्लज अंधश्रद्धा निर्मूलन शाखेच्या सहकार्याने नेसरी येथील अंनिस शाखेतर्फे श्रीमती विठाबाई लक्ष्मण कांबळे (वय 70) या वृद्धेची जटा काढण्यात आली. नेसरी शाखेचे हे तिसरे जटानिर्मूलन ठरले. येथील शाखेचे कार्यकर्ते टी. बी. कांबळे यांनी विठाबाई यांते मतपरिवर्तन केले. त्यानुसार येथील नेसरी वाचन मंदिरात हा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे यांनी प्रारंभी मार्गदर्शन करून जट हा […]

Categories
जट निर्मूलन

शामला सातेरी झाल्या जटामुक्त

जून - २०१८

सौ. गीताताई सुतार जटामुक्त झाल्याची बातमी अंनिस मासिकात व वृत्तपत्रात वाचून एस. एन. राजगोळकर सर, पांडुरंग करंबळकर गुरुजी (उपाध्यक्ष-मअंनिस, शाखा गडहिंग्लज) यांना भेटले व त्यांनी सांगितले, “शामला सातेरी पाटील ही 40-45 वर्षांची जटाधारी बाई आहे. तिच्या डोक्यावर अंदाजे दोन-अडीच किलोची जट असून त्याचा तिला त्रास होत आहे. ते ओझे मानेला तोलत नाही; शिवाय कीड (उवा) […]

Categories
जट निर्मूलन

गीताताई झाल्या जटामुक्त!

एप्रिल - २०१८

उत्साळी (ता. चंदगड, जि.कोल्हापूर) येथील सौ. गीता रुपेश सुतार या सुशिक्षित महिलेच्या केसामध्ये जटा तयार होऊन मोठा गुंता तयार झाला होता. अंनिसचे कार्यकर्तेसूर्यकांत देसाई व भूषण सुरंगे यांनी गीता सुतार व तिचे पती रुपेश यांची भेट घेऊन जटा निर्मूलनाबाबत त्यांची मानसिक तयार करून घेतली. प्रकाश भोईटे (जिल्हा अध्यक्ष, अंनिस), पांडुरंग करंबळकर गुरुजी (तालुका उपाध्यक्ष, अंनिस), […]

Categories
जट निर्मूलन

मअंनिस कोल्हापूर शाखेच्या वतीने महिलेचे जटा निर्मूलन

मे - २०१७

अंनिस कोल्हापूर शाखेच्या वतीने इंदूबाई लोखंडे या महिलेचे जटा निर्मूलन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात करण्यात आले. सदर महिलेचे प्रबोधन करण्याचे काम अंनिस महिला संघटक सीमा पाटील यांनी केले. या महिलेची मुलगी रतन कवाळे यावेळी उपस्थित होती. यावेळी अंनिस शहर प्रधान सचिव निशांत शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश वडणगेकर, गीता हासूरकर, कॉ. बाबा यादव, श्रीपती मगर आदी […]

Categories
जट निर्मूलन

पंधरा दिवसांत तीन महिला जटमुक्त…

मार्च - २०१७

पुणे शाखेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी 15 दिवसांमध्ये तीन महिलांचे समुपदेशन करून त्यांच्या जटा सोडविल्या. सुनंदा बोराडे, निर्मला जगताप आणि अनिता पात्रोड या तीन कष्टकरी महिलांच्या जटा सोडवून त्यांच्या डोईवरचे ओझे उतरविले. याबाबत अनिता पात्रोड या महिलेची जटा निर्मूलनाची कहाणी खाली देत आहोत… अनिता पात्रोड, वय वर्षे 40, यांच्या डोक्यात पंधरा वर्षांपूर्वी जट (केसांचा […]