Categories
संपादकीय

लढेंगे! जितेंगे!

वार्षिकांक - २०१९

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहिदत्वाला ऑगस्ट 2019 ला सहा वर्षे पूर्ण झाली. आजही खटला चालूच आहे. खुन्यांना शिक्षा नाही, तपास यंत्रणा सूत्रधाराला पकडण्यात अपयशी ठरलेल्या आहेत. तपासात काहीच प्रगती होत नाही, याबद्दल न्यायालय तपास यंत्रणांना तीव्र शब्दांत जाब विचारत आहे. पण ‘तपास चालू आहे,’ हे सांगण्यापलिकडे तपास यंत्रणांकडून काहीच होताना दिसत नाही. सरकारी पातळीवर तर तपास […]

Categories
संपादकीय

महापूर ओसरल्यानंतर…

ऑक्टोबर - २०१९

सांगली-कोल्हापूर येथे आलेला महापूर आता ओसरला आहे. या महापुराने केलेल्या नुकसानीचे तपशील सामोरे येत आहेत, तसेच घरांची पडझड, दैनंदिन उपयोगी वस्तूंचे झालेले नुकसान प्रचंड आहे; पण त्याचबरोबर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत ज्याप्रमाणे समाजातून मदतीचे हजारो हात तत्परतेने पुढे येतात, त्याप्रमाणे ते आले. परंतु तेवढी तत्परता, नियोजनबद्धता, संवेदनशीलता ‘एनडीआरएफ’चे मदतकार्य सोडता सरकारी पातळीवर मात्र अजिबात अनुभवायला आलेली […]

Categories
संपादकीय

अंनिसची त्रिदशकपूर्ती आणि जवाब दो…

त्रिदशकपूर्ती विशेषांक - सप्टेंबर- २०१९

जुलै अखेरपासून मुंबईत आणि राज्यातील इतर भागात सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा भागात उद्भवलेल्या भयानक पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 9, 10, 11 ऑगस्ट रोजी संघटनेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त मुंबईतील मुलुंड येथील ‘महाकवी कालिदास नाट्यगृहा’त आयोजित केलेली एक दिवसाची ‘मानवतेसाठी विवेकवाद’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसाचे अधिवेशन राज्यातील 35 जिल्ह्यांतून व देशातील 15 राज्यांतून मोठ्या […]

Categories
संपादकीय

समाजपरिवर्तनासाठी संघर्ष अटळ…

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

महाराष्ट्राला धर्मचिकित्सेची संतपरंपरेपासून थेट फुले-शाहू-आंबेडकर-आगरकर अशी मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेच्या मूल्यांशी धागा जोडत, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. 9 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. तीस वर्षांचा काळ म्हणजे एखाद्या संघटनेसाठी काही फार मोठा काळ नाही; अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीसाठी तर नाहीच नाही. कारण चार्वाक, महावीर, बुद्ध, […]

Categories
संपादकीय

निरोप घेताना…

जुलै - २०१९

महाराष्ट्र अंनिसच्या भोर येथील विस्तारित राज्य कार्यकारिणीत मी (प्रा. प. रा. आर्डे) पाठविलेला मुख्य संपादक पदाचा राजीनामा संघटनेने मंजूर केला. याबद्दल मी संघटनेचा मन:पूर्वक आभारी आहे. 1995 ते 2002 पर्यंत मी वार्तापत्राच्या ‘संपादक’ मंडळातील एक सदस्य म्हणून सहभाग दिला. या काळात डॉ. प्रदीप पाटील हे वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांनी 2002 मध्ये मुख्य संपादक पदाचा […]

Categories
संपादकीय

सी.बी.आय.ची उशिरा; पण योग्य कारवाई

जून - २०१९

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना सी.बी.आय.ने केली अटक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांना सी.बी.आय.ने शनिवारी, दिनांक 25 मे रोजी मुंबईतून अटक केली. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणार्‍या दोघांना मदत करून या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली […]

Categories
संपादकीय

नकाशाचे फडफडणे आणि धरणीकंप

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

प्रख्यात नाटककार राम गणेश गडकरी यांच्या एका नाटकातील एक सुभाषित सद्याच्या राजकीय रणधुमाळीत संबंधितांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरेल. भिंतीवर नकाशा फडफडला म्हणून देशात धरणीकंप होत नाही, हेच ते सुभाषित. राजकारण हा काही अंनिसचा विषय नाही; पण क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये अंधविश्वास आणि अविवेकाचा घोष केला जात असेल, तर त्याचा समाचार घेणे हे आमचे कर्तव्य ठरते. […]

Categories
संपादकीय

पाऊल पडले पुढे!

एप्रिल २०१९

फेब्रुवारी महिन्यात सांगली जिल्ह्यात संपूर्ण समाजाने जिचे कौतुक करावे, अशी घटना घडली. 24 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्यातील शिरगाव येथील वीस वर्षांच्या विधवा सोनाली संतोष पाटील हिचा, सासू राजश्री आणि सासरे शांताराम पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांचा धाकटा मुलगा उमेश याच्याशी पुनर्विवाह घडवून आणला. सोनालीचे पती काविळीने आजारी पडले; त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले. त्यावेळी त्यांची […]

Categories
संपादकीय

राजस्थानात सरकारी ज्योतिषी

मार्च २०१९

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. राजस्थान सरकारने घोषणा केली आहे की, जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलांची कुंडली सरकारतर्फे काढून देण्यात येईल. त्यासाठी ज्योतिषांना सरकारकडून या कामाचा मोबदला दिला जाणार आहे. ही बातमी खरी असेल, तर तिचं गांभीर्य आपण ओळखायला हवे. देशपातळीवर अशा छद्म विज्ञानाविरोधात कसा उठाव करता येईल, त्याबाबत पावलं टाकली पाहिजेत. भारतातील विवेकवादी वैज्ञानिक आणि […]

Categories
संपादकीय

नादियाला सलाम!

फेब्रुवारी २०१९

नादिया मुराद. इराकमधील याझिदी या धार्मिक समूहातील ही युवती. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अत्याचाराला बळी पडलेली नादिया खचून गेली नाही. गुलाम म्हणून विकले गेल्यानंतर मोठ्या धैर्याने ती इराकमधून निसटली. तिने जर्मनीत आश्रय घेतला आणि जगाच्या व्यासपीठावर आपली दर्दभरी कहाणी सांगायला सुरुवात केली. ‘दि लास्ट गर्ल’ (The Last Girl) या आत्मवृत्ताद्वारे नादिया आणि याझिदी अल्पसंख्याकांवरील […]