भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 व 19 अन्वये दिलेल्या अधिकाराचा पुनरुच्चार करत उच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तुतारी फुंकली. नागरिकांना पुराणकथा, अनिष्ट रुढी, परंपरा, अंधविश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा अधिकार आहे. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे वैचारिक उत्क्रांतीला पायबंद घालण्यासारखे असल्याचे मत न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभाग कंकणवाडी यांच्या खंडपीठाने मांडले. समाज माध्यमांवरील पोस्टवरून दाखल […]
कॅटेगरी: अनिष्ट रुढी – परंपरा
11 वर्षांच्या मुलीची केली जटेतून मुक्तता राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या घावर गावातील एका व्यक्तीने जटा निर्मूलनाविषयी तीन महिन्यांपूर्वी पेपरमधील बातमी वाचून मला फोन केला, ‘माझे नाव गुपित ठेवणार असाल तर आपल्याला एक गोष्ट सांगावयाची आहे.’ ‘मी आपले नाव गुपित ठेवेन,’ हे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, ‘घावर या गावात इयत्ता 6 वीत शिकत असलेल्या (11 […]
समाजात स्त्रियांच्या दुय्यमत्वाला अधोरेखित करणारी घटना घडते. अशा घटनेचा विषय घेऊन महाअंनिस महिला सहभाग विभागातर्फे 3 ते 12 जानेवारीदरम्यान महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान राबविण्यात येते. यंदा केरळमधील शबरीमला येथे अय्यप्पाच्या मंदिरात 10 ते 50 वर्षेवयोगटातील महिलांना मासिक पाळी येते, म्हणून प्रवेशबंदी हा विषय पूर्ण भारतभर चर्चिला गेला. अय्यप्पा हा कट्टर ब्रह्मचारी देव. त्यामुळे पूर्वापार […]
पुन्हा एकदा ‘शबरीमला’
सर्वच धर्मांनी धार्मिक आचरणातल्या पाप–पुण्याच्या आणि शुद्ध–अशुद्धतेच्या कल्पना स्त्रियांशी जोडल्या. शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातल्या स्त्रियांना प्रवेशबंदी घालण्यामागे मासिक पाळी हे कारण सांगितले जाते. त्या मंदिरातला अय्यप्पादेव हा आजन्म ब्रह्मचारी असल्यामुळे पाळी आलेल्या स्त्रियांपासून त्याचे लक्ष विचलित होऊन त्याचे व्रत मोडण्याचा धोका निर्माण होतो, असे म्हणून बंदीचे समर्थन केले जाते. ‘शबरीमला’चा प्रश्न आणि त्यातील […]
कोणत्याही धार्मिक स्थळात सर्व वयाच्या स्त्रियांना आपल्या मर्जीप्रमाणे प्रवेश घेण्याचा हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिनांक 28 सप्टेंबर रोजी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने बहुमताने (चार विरुद्ध एक) दिलेला आहे. त्यामुळे केरळमधील साबरीमाला येथील अय्यप्पाच्या मंदिरात 10 ते 50 वर्षांच्या स्त्रियांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. केरळ सरकारने या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर साबरीमालाच्या मुख्य पुजार्याने म्हटले […]
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकार्यांनी नारायणगाव या तमाशापंढरीतील प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी मालती इनामदार यांच्या केसामधील ‘जट’ कात्रीने कापून काढून अंधश्रद्धेच्या रुपात ग्रामीण भागात प्रचलित असणारा देवीचा प्रकार हा समज दूर केला. अंधश्रद्धेमुळे गेली 22 वर्षे त्या ही दोन किलोची जट सांभाळत होत्या. ग्रामीण भागातील महिलांच्या केसांमध्ये ‘जट’ निघणे हा देवीचा प्रकार असून ‘जट’ महिलांच्या केसात आढळून […]
भिसेवाघोली (ता. जि. लातूर) येथील अल्पभूधारक शेतकरी वायाळ यांच्या शीतलने लग्नासाठी हुंडा द्यायला वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून नुकतीच आत्महत्या केली. अशा अनेक आत्महत्या आजपर्यंत झालेल्या आहेत; पण त्याचप्रमाणे शीतल वायाळचीही आत्महत्या समजून तिच्या घरच्यांना सहानुभूती दाखवून, काही आर्थिक मदत करून विसरणारी ही आत्महत्या निश्चितच नाही. म्हणूनच हा लेखणीचा प्रपंच. शीतलने केवळ वडिलांकडे लग्नाला पैसे नाहीत […]