विविध प्रकारच्या अनिश्चितता घोंघावत असतात रोज आपल्या मनोविश्वात… कामावर, ऑफिसमध्ये गेलेला आपला नवरा सुखरूप रात्री घरात परत येईल का? त्याचा कुठे काही अॅक्सिडेन्ट वगैरे होणार नाही ना? नोकरी टिकेल का? उद्योगधंद्यात तोटा ओढवेल का? आईला /वडिलांना हार्ट अटॅक आला तर किंवा लकवा मारला तर? नोकरी गेली तर? बायकोचं बाळंतपण सुखरूप होईल का? भावाचं, बहिणीचं लग्न […]
कॅटेगरी: मंथन
अविचारांची सरशी
प्रत्येकाकडे इतरांना सांगण्यासाठी काही ना काही अनुभव वा गोष्टी असतात. खरे पाहता या गोष्टीत स्वतः भर घातलेला भाग बराच असतो. मुळात कुठलीही गोष्ट फुगवून सांगण्याची हौस प्रत्येकात थोड्या–फार प्रमाणात असते. ऐकणार्यावर प्रभाव पाडण्यासाठी आपण गोष्टी फुगवून सांगत आहोत, याची कल्पनासुद्धा आपल्याला नसते. आपल्या मेंदूची ती फेकाफेकी असते व कळत न कळत आपण त्यात गुरफटून जातो. […]
‘आज लोकांच्या भल्यासाठी आवाज उठविणारे पकडले जात आहेत, त्यांचा आवाज थांबवले जात आहे. लेखक-पत्रकारांवर हल्ले होत आहेत. प्रस्थापितांना त्रासदायक असे कुणी बोलू नये, लिहू नये असा प्रयत्न केला जाण्याचे प्रमाण जगभरातच वाढत आहे. अशा वेळी वंचितांचा आवाज टिकवून ठेवण्यासाठी ‘पेन’सारख्या संस्थांची गरज आहे. एक नव्या स्वरुपाचा हिंसक समाज निर्माण होऊ लागला आहे; पण त्याचे प्रत्युत्तर […]
आत्म्याशी बोलणे हा मानसिक आजार
समाजातील सध्याच्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’ हे अभियान गेले तीन वर्षे चालवत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी अंनिसने केलेले सगळे प्रयत्न हे अहिंसक आणि संवैधानिक होते. या पार्श्वभूमीवर समाजातील जमावाची वाढती हिंसा आणि टोकाच्या धार्मिक प्रभावामधून झालेली ‘बुरारी’ सारखी कुटुंबाच्या आत्महत्येची हिंसा आणि तेलंगणामध्ये झालेली प्रणयची […]
डार्विन, उत्क्रांती आणि बटलर कायदा!
दृश्य 1 – वेदात सर्व ज्ञान आहे, त्यामुळे ‘वेदांना विरोधी मांडणी अक्षम्य आहे,’ असे मानणारे सत्यपाल सिंह जसे आपल्याकडे आहेत, तसे बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधी मत मांडणारे ‘पाखंडी, सबब वध्य होत’, असे मानणारे अनेक जण युरोप आणि अमेरिकेत होते. साहजिकच सर्व प्राणिसृष्टी एकाच वेळी उत्पन्न झालेली नाही, तर हळूहळू प्राथमिक अवस्थेतील प्राण्यांपासून उत्क्रांत होत गेली’, […]
धर्म व विज्ञान : सांधेजोड अशक्य
विज्ञान आणि धर्म हे दोन्हीही सत्य, ज्ञानाच्या शोधाचे मार्ग आहेत असे दाखविण्याची सध्या चाललेली धडपड ही बरीचशी मध्ययुगातील धर्माच्या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि त्याच संकल्पनेचे पुनरुज्जीवनही आहे. उत्क्रांती म्हणजे नैसर्गिक जगताची रचना करण्याचा ‘ईश्वराचा मार्ग’; मानवामध्ये स्वसंवेद्यता निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे ‘उत्क्रांती’; ‘वैज्ञानिक शोधांमधून ईश्वराची योजनाच उघड होते’ आणि ‘विज्ञान ही माणसाला ईश्वरानेच दिलेली देणगी […]