Categories
शाखा वार्ता सत्यशोधक विवाह

वर्धा अंनिसने लावला सत्यशोधक विवाह

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा वर्धातर्फे सेवाग्राम येथे दि 26 मे रोजी 32 वा आंतरधर्मीय विवाह संपन्न झाला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सचिन ओंबासे सर (सी.ई.ओ. जि. प. वर्धा) मा. विकास राचेलवार (सहायक प्रकल्प अधिकारी, गडचिरोली), मा. गजेंद्र सुरकार(राज्य सरचिटणीस), मा. प्रा. नूतन माळवी (सत्यशोधक महिला प्रबोधिनी) उपस्थित होत्या. महात्मा […]

Categories
उपक्रम शाखा वार्ता

महाराष्ट्र अंनिस नागपूर जिल्हा शाखेने 14 स्मशानभूमींमध्ये देहदानाचे संदेश फलक लावले

एप्रिल २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर जिल्हा शाखेने देहदान आणि अवयवदान यासंदर्भात जनतेपुढे आवाहन ठेवलेले आहे, काही सामाजिक विषय असे असतात की, ज्याबद्दल लोकांमध्ये जागृती होण्यासाठी पुन्हा-पुन्हा लिहिणे गरजेचे असते. मानवी जीवनाइतके अमूल्य दुसरे काही असू शकत नाही. हा अमूल्य ठेवा वाचविण्याकरिता अवयवदान ही वैद्यकशास्त्राने मानवी जीवनाला दिलेली अमूल्य देणगी आहे, हे लोकांना कळावे, यासाठी महाराष्ट्र […]

Categories
शाखा वार्ता

पिंपरी-चिंचवड शाखेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

सप्टेंबर - २०१८

दि. 7 जुलै 2018 रोजी म.अंनिस शाखा पिंपरी – चिंचवडला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. पूर्ण एकदिवसीय कार्यक्रम व दुसर्‍या दिवशी अतुल पेठे या म.अंनिस परिवारातील कलाकार – दिग्दर्शक यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचा प्रयोग, अशा रीतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम सत्रामध्ये म.अंनिसची अभिवादनपर गाणी रिंगणनाट्य चमूने गायली. […]

Categories
शाखा वार्ता

सोलापुरात मअंनिस राज्यस्तरीय महिला कार्यकर्ता शिबीर

सप्टेंबर - २०१८

महाराष्ट्र अंनिसच्या कामात पुरुषांबरोबर महिलाही सहभागी असतात. हा सहभाग देताना महिला कार्यकर्त्यांना येणार्‍या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रबोधनाचे निरनिराळे मार्ग दाखवून त्यांचा सहभाग व काम वाढविण्यासाठी राज्य महिला सहभाग विभागातर्फे राज्यव्यापी महिला कार्यकर्ता शिबीर आयोजित करण्यात आले होते. सोलापूर येथील हिराचंद नेमचंद मंगल कार्यालयात दि. 28 व 29 जुलै रोजी हे शिबीर […]

Categories
शाखा वार्ता

नागपुरात स्मशान सहल…

एन.डी.सर कृतज्ञता विशेषांक - जुलै २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंतर्गत असलेल्या शाखा उत्तर नागपूरच्या वतीने ‘शोध भुताचा बोध मनाचा’ वर्ष तिसर्‍या स्मशान सहलीचे अमावस्येच्या रात्री मंगळवार, दि. 15 मे रोजी सायंकाळी 08:30 ते 12:30 पर्यंत वैशाली नगर स्मशानभूमी, नागपूर येथे कार्यक्रम संपन्न झाला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने स्मशान सहलीचे आयोजन महा.अंनिस शाखा अध्यक्ष रामभाऊ डोंगरे यांनी केले होते. पथनाट्य […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान शाखा वार्ता

अंनिसचे कार्यकर्ते प्रमोद भारूळे यांनी आपल्या पत्नीच्या अस्थीचे वृक्षाजवळ केले विसर्जन

जून - २०१८

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे यांच्या पत्नी विजया भारुळे (वय 52) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी सामाजिक भान ठेवत आपल्या पत्नीचे देहदान केले. पत्नीच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील त्यांनी घेतलेल्या देहदानाच्या धाडसी निर्णयाने अनेक गरजू रुग्णांना अवयव मिळाले. तसेच पत्नीचे अस्थी विसर्जन नदीत न करता एमआयडीसी येथील […]

Categories
शाखा वार्ता

प्रश्न विचारणारी संस्कृती रुजवणे अंनिसचे ध्येय

जानेवारी - २०१८

-डॉ. हमीद दाभोलकर प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत ज्या वेळेस मनामनात प्रश्न निर्माण होतील, तेव्हा भोंदूबाबा आणि समाजशोषकांचे ‘पानिपत’ झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रश्न विचारणारी संस्कृती रुजविण्याचे ध्येय घेऊन पुढे जात आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी परभणी येथे व्यक्त केले. ते अंनिसच्या […]

Categories
शाखा वार्ता

बेलापूर येथे वार्तापत्र कार्यवाहांचा राज्यस्तरीय प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न!

सप्टेंबर - २०१७

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्यावतीने बी.टी.रणदिवे ग्रंथालय बेलापूर, नवी मुंबई येथे रविवारी, दि. 30 जुलै रोजी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या कार्यवाहांचा राज्यस्तरीय प्रेरणा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीस साम टी.व्ही.चे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर ‘अंनिवा’चे संपादक प्रा. प. रा. आर्डे यांनी वार्तापत्राचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सहसंपादक […]

Categories
शाखा वार्ता शिबिर

अंबरनाथ येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

जुलै - २०१७

महाराष्ट्र अंनिस, अंबरनाथ शाखेतर्फे दिनांक 28 मे 2017 रोजी आयोजन महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे येथे करण्यात आले. सकाळी 9.30 च्या सुमारास शाहीर शिंदे यांच्या चळवळ गीतांनी व अभिवादन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मच्छिंद्र मुंडे यांनी (बुवा) इच्छेनुसार जळणारा कापूस श्री. वाघ यांना जाळायला लावला. आधी तो कापूस काही जळेना. मग मुंडे (बुवा) […]

Categories
उपक्रम शाखा वार्ता

सांगली अंनिस कार्यकर्त्यांचा आकाशदर्शनाचा रोमांचकारी अनुभव

जून – २०१७

आयुष्यातील कोणताही पहिला चांगला प्रसंग हा हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी कोरला जातो. ती अनुभूती मग आठवण होऊन निरंतर आठवत राहते, आनंद देते. 17 एप्रिल 2017 ची खरी तर उकाड्यातील; पण शांत, आल्हाददायक अशी पहाटेची 4 वाजताची वेळ. विश्रामबाग चौक, सांगलीच्या चौकातील डॉ. संजय निटवे यांच्या हॉस्पिटलच्या टेरेसवर आमच्या अंनिसचे कार्यकर्ते उत्साह व उत्सुकता यांची दाटणी मनात […]