स्टीफन पिंकर कृत ‘एनलाईटनमेंट नाऊ’ या पुस्तकाचा परिचय ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।’ असं तुकारामबुवांनी म्हटलेलंच आहे. जगात ‘सुख थोडे दु:ख फार,’ हा लोकप्रिय समज; पण पिंकर म्हणतो, ‘दु:ख पाहता जवापाडे, सुख पर्वताएवढे’ हे जग झक्कपैकी सुधारत चाललं आहे, चक्क ज्ञानोदय झाला आहे, उत्तरोत्तर प्रगती होते आहे, असं तो ठामपणे सांगतो. ज्ञानयुगाचा आजचा अवतार बाळसेदार […]
कॅटेगरी: पुस्तक परिचय
निर्भय
‘निर्भय’ हे उमेश मुरलीधर सूर्यवंशी यांनी लिहिलेले पुस्तक; नुकतेच ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झाले. सूर्यवंशी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृतिशील कार्यकर्ते. ‘अंनिवा’चे सहसंपादक म्हणून त्यांनी तीन वर्षेजबाबदारी पेलली. लाख मराठा मोर्चाचाही त्यांना अनुभव आहे. गेल्या वर्षी राजर्षी शाहूंचा परिचय करून देणारे ‘राजर्षी’ पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. त्याच्या दहा हजार प्रती संपल्या […]
ओह माय गोडसे
माणसाच्या पिल्लाच्या तोंडी प्रेमाची भाषा पेरणार्यांना सविनय अर्पण केलेली ‘ओह माय गोडसे’ ही विनायक होगाडे यांची कादंबरी. विनायक होगाडे राष्ट्र सेवादलाचे युवक कार्यकर्ते. सेवादलाच्या अनेक शिबिरात त्यांनी झांज आणि लेझीमपासून पथनाट्य आणि गाण्यापर्यंत अनेक विषयांची प्रशिक्षणे दिली आहेत. सेवादलाचाच समतेचा विचार सांगणार्या अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा सनातन्यांनी खून पाडला; त्यानंतर होगाडे अंनिसचे कार्यकर्ते बनले. ‘सॉक्रेटीस […]
गांधीजी
‘गांधीजी’ – हे नुकतेच दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेलं प्रा. आनंद मेणसे यांचे पुस्तक. कॉ. पुरव तारुण्यात पदार्पण करण्यापूर्वीच ‘लोकसेना’ या हिटलरच्या फॅसिझमविरोधी आणि देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धडपडणार्या तरुणांच्या संघटनेत सामील झाले. स्वातंत्र्यानंतर ते बँक कर्मचारी बनले. त्यांच्या ए. आय. बी. इ. ए. या संघटनेचे असि. सेक्रेटरी बनले. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या माध्यमातून […]
जादूई वास्तव या पुस्तकातील मनोगताचा संपादित अंश अंनिसच्या त्रिदशवार्षिक परिषदेत माझे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद काही खास आहे. रिचर्ड डॉकिंन्सचं, ‘द मॅजिक ऑफ रियॅलिटी’ हे पुस्तक मी वाचलं आणि थक्क झालो. वाचल्यावाचल्याच याचा अनुवाद करायचं मी मनोमन ठरवलं. आज ‘जादूई वास्तव’च्या रूपाने हा भावानुवाद आपल्या हाती देत आहे. विज्ञानाच्या सृष्टीबद्दल विस्मयकारी माहिती देणारी […]
दारिद्र्याची शोधयात्रा
हेरंब कुलकर्णी म्हणजे तेच, ज्यांचे शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारे “शाळा आहे शिक्षण नाही” हे पुस्तक प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये जाहीरपणे जाळले होते. पुस्तक जाळले; पण त्यातील मुद्दे खोडणे शक्य झाले नाही; प्रत्यक्ष पाहणी करून, शाळांना भेटी देऊन, वस्त्या-वस्त्यांवर चर्चा करून त्यांनी अनुभव लिहिले होते. शासकीय पातळीवर मात्र त्याची दखल घेतली गेली. पुस्तक शिक्षक संघटनांपर्यंत पोचायला […]
उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट
विवेकाच्या वाटेवर डॉ. हमीद दाभोलकर यांचं ‘विवेकाच्या वाटेवर’ हे पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. त्यांचे वडील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बरोबर त्यांनी ‘प्रश्न मनाचे’ हे पहिले पुस्तक लिहिले. लेखक म्हणतात की, डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर लगेचच ते काही लिहू शकले नाहीत; पण जादूटोणाविरोधी कायदा झाल्यावर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात […]
गावनवरी : स्त्रीशोषणाची गाथा
कोर्या साडीचा गंध लिंबाचा गंध भंडार्याचा गंध फुलांचा गंध कडू हिरवा गोड सफेद तुरट पिवळा घमघम कळना नाकाला काई येगयेगळ आज्जीन आंघोळ घाटलीती उष्ण उदकानं जसा सूर्यच ओतायलीती अंगावर निस्त्या वाफांनी धुकं भरतेल दगडी न्हाणीत जसा भिंतीना पाझर फुटल आत्ता, पण नही फुटला लिंब बांधलाता वल्या आंगाला देवासमूर केसांचा आंबाडा नारळायेवढा, आंबोली, जाईजुईचे गजरे मस्तकावर […]
मला आठवतं, लहान म्हणजे पहिली-दुसरीत असताना शाळेतल्या बाई ‘आळी मिळी गुपचिळी’ म्हणाल्या की, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचं. गप्प म्हणजे गप्पच! काही बोलायचंच नाही, इकडं-तिकडं सुद्धा बघायचं नाही. वाढत्या वयाबरोबर ‘आळी मिळी गुपचिळी’ वाढत जाऊन त्याचे रूपांतर ‘पाळी मिळी गुपचिळी’ मध्ये कधी झालं, हे समजलंही नाही. पाळीविषयी काही बोलायचं नाही, काही विचारायचं नाही. […]
‘आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणार्या विचारांकडे आपला नेहमीच कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारा एखादा विचार असल्यास तसले विचार करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, असेच आपल्याला वाटत असते.’ बर्ट्राँड रसेल यांनी 1925 साली हा विचार मांडला होता. गेल्या 90-95 वर्षांत अजूनही आपण त्याच अविचारांच्या गर्तेत आहोत. या गर्तेतून बाहेर काढणार्या काही मोजक्या […]