Categories
जात पंचायत

जातपंचायतचा विरोध झुगारून तिने दिला बाळाला जन्म : आरोपी व जातपंचांना अटक

जुलै - २०१९

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धोंगडेपाडा गाव आहे. या गावात आदिवासी भिल्ल समाजाची लोकसंख्या जास्त आहे. सुनीता (नाव बदलविले आहे) या पंधरा वर्षांच्या मुलीची गावातल्या एका लग्नात बाळा सहाणे या तरुणाशी ओळख झाली. तो बेज (नाशिक) येथील रहिवासी असून आपल्या एका नातेवाईकांकडे धोंगडेपाडा येथे आला होता. तो सुद्धा तिच्याच समाजाचा होता. तिला लग्नाचं आमिष दाखवून बाळा […]

Categories
जात पंचायत

महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नानंतर जात पंचायत पीडित कुटुंबांना मिळाला न्याय

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

पुणे शहरातील रहिवासी असलेली तेलगू मडेलवार परीट समाजाची काही कुटुंबे त्याच समाजातील जातपंचांच्या मनमानीमुळे मागील 20 वर्षांपासून सामाजिक न्याय हक्कांपासून पीडित होते. या समाजात आंतरजातीय/धर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांना सभासद करून घेतले जात नसे. महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा पंचांना समजावून सांगण्याचा बराच […]

Categories
जात पंचायत

अंनिसच्या प्रयत्नाने रमेश धुमाळ यांच्यावरील गोंधळी जातपंचायतीचा बहिष्कार मागे

एप्रिल २०१९

देवळी (जि. वर्धा) येथील रहिवासी असलेले गोंधळी जोशी समाजातील रमेश धुमाळ यांच्यावर बहिष्कृत कुटुंबातील मुलगी केल्याचा ठपका ठेवून 9 वर्षांआधी रायपूर, छत्तीसगड येथे भरलेल्या जातपंचायतीने 5 हजार रुपये दंड व संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकलेला होता. दि. 13 मार्चला कळमेश्वर (जि. नागपूर) येथे भरविलेल्या महाजातपंचायतीने रमेश धुमाळ व इतरही कुटुंबांवर एकमताने घातलेला बहिष्कार मागे घेत यापुढे […]

Categories
जात पंचायत

भिल्ल समाजाची जातपंचायत बरखास्त; जिल्हाधिकारी, ‘अंनिस’समोर पंचांचा निर्णय

एप्रिल २०१९

एका जोडप्याला बहिष्कृत करण्याच्या निर्णयानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कायद्याचा बडगा उगारताच निलंगा (जि. लातूर) येथील भिल्ल (मसनजोगी) समाजाची जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय पंचांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत घेतला. यावेळी जात पंचायत बरखास्त करीत असल्याचे प्रतिज्ञापत्रही पंचांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. निलंगा येथील भिल्ल समाजाची 13 मार्च रोजी जात पंचायत भरविण्यात आली […]

Categories
जात पंचायत

अंनिसच्या प्रयत्नाने नंदीवाले तिरमली समाजाची जातपंचायत बरखास्त

मार्च २०१९

अहमदनगर येथे नंदीवाले तिरमली समाजाची जातपंचायत 15 पंच व समाजातील तरुणांच्या उपस्थितीत नुकतीच बरखास्त करण्यात आली. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आता समाजविकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुमारे तीन वर्षे लढा दिला होता. येथील श्रमिक भवन येथे तिरमली समाजाच्या राज्यभरातील 15 पंचांसह तरुणांची बैठक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे […]

Categories
जात पंचायत

जातपंचायतच्या सामाजिक बहिष्काराबाबत जिल्हावार आढावा बैठका घेण्याची अधिसूचना काढणार

मार्च २०१९

–गृहराज्यमंत्री रणजित पाटील महाराष्ट्र सरकारकडून सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2017 मध्ये लागू केला. जातपंचायतीच्या पंचांच्या समाजातील वाढत्या दबावाबाबत शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोर्‍हे यांनी सन 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती. जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करून पालन केली जावी व या कायद्याची जनजागृती होण्यासाठी आज आ. डॉ. गोर्‍हे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जातपंचायतविरोधी […]

Categories
जात पंचायत

कर्नाटकात आंतरजातीय विवाह केल्यामुळे जातपंचायतीने केले कुटुंबाला बहिष्कृत

मार्च २०१९

आम्ही कर्नाटकाच्या दौर्‍यावर होतो. तेव्हा ‘दि हिंदू’ मधील बातमी आमच्या वाचनात आली. मंड्या जिल्ह्यातील एका खेडेगावातील घटना. यशोदा या मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे तेथील जातपंचायतीने तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केल्याची ती बातमी होती. त्यामुळे आम्ही ठरविले की, आपण या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला भेट देऊ . ‘दि हिंदू’चे विशेष प्रतिनिधी एम. टी. शिवकुमार यांनी ही बातमी […]

Categories
जात पंचायत

…अखेर 40 वर्षांनी मरीआई समाजाने मारुती कोळी यांच्यावरील बहिष्कार उठवला

ऑक्टोबर - २०१८

अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश मारुती कोळी, रा.जत यांना त्यांच्या मरीआई समाजाने तब्बल 40 वर्षे बहिष्कृत केले होते. अंनिस व भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नामुळे जत पोलिसांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा उगरला. तेव्हा पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती यांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. पंचांच्या हस्ते पान-सुपारी देऊन मारुतींच्या […]

Categories
जात पंचायत

जातशोषणाला लागणार लगाम

मे - २०१८

महाराष्ट्रात जातपंचायतींच्या सामाजिक बहिष्काराला मोठा इतिहास आहे. परंतु लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वगळता कुणी त्यावर लिहिले नाही. त्यांनी ‘बरबाद्या कंजारी’ ही जातपंचायतीवर कथा लिहिली आहे. अनेक समाजसुधारकांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला; परंतु त्याविरोधात कुणी आवाज उठवला नाही. एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1952 मध्ये एका कमिशनसमोर गावकीच्या विरोधात साक्ष दिली होती. आज अनेक कायदे […]

Categories
जात पंचायत

मुस्लिम वाघवाले समाज जातपंचायतीविरोधी गुन्हा दाखल

मे - २०१८

धर्माने मुस्लिम असलेले वाघवाले, दरवेशी अस्वलवाले या नावानेही महाराष्ट्रात ओळखले जातात. पूर्वी हे लोक अस्वलाबरोबरच वाघही पाळत असत. वाघ बाळगणारे दरवेशी कुटुंब समाजात प्रतिष्ठित समजले जात असे. वाघ पाळणे अतिशय खर्चिक असल्याने सर्वांनाच ते शक्य नव्हते. पुढे-पुढे सर्वांनाच वाघ पाळणे, त्याचे खाणे-पिणे सांभाळणे, खर्च करणे शक्य न झाल्याने जमातीतील बहुतेक सर्वच लोक वाघाऐवजी केवळ अस्वल […]