नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळील राजेवाडी हे आदिवासी गाव आहे. गावात बहुतांश ठाकूर समाजाची आदिवासी कुटुंबं राहतात. जानेवारी महिन्यात एक भयानक घटना घडली.एकोणीस वर्षाच्या दिनकर शिवा येले याच्या शेजारी एक कुटुंब राहत होते.त्या घरात तेरा वर्षांची मुलगी परिवारासोबत राहत होती. 23 जानेवारी 2018 रोजी घरात कुणी नाही, ही संधी हेरून दिनकरने त्या अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात शिरून […]
कॅटेगरी: जात पंचायत
तुंग, ता. मिरज येथील पांडुरंग तमाण्णा चौगुले (नंदीवाले) यांच्या कुटुंबास नंदीवाले जातपंचायतीने गेल्या 10 वर्षांपासून वाळीत टाकले होते. चौगुले यांनी 10 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाच्या विवाहास पाठिंबा दिला होता. त्यामुळे जातपंचायतीने त्यांना बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजाच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास, लग्न, मयत यावेळी बोलावले जात नव्हते. त्यांचे जगणे या जातपंचायतीने मुश्कील केले होते. […]
तेलगू मडेलवार समाजातील तीन मुलांनी आंतरजातीय विवाह केल्याने जातपंचायत समितीने या तीन कुटुंबियांना वाळीत टाकण्याची घटना खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी समाजातील 9 पंचांवर गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही धार्मिक, तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांत त्यांना सामावून घेतले जात नसल्याने या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तीन जणांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकाराने पुरोगामी […]
जातशोषणाला लागणार लगाम
महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कृत करण्याला मोठा इतिहास आहे. परंतु किरकोळ अपवाद वगळता कुणी त्याबद्दल लिहिलेले नाही. महाराष्ट्रात नामांकित लेखक होऊन गेले; परंतु अण्णा भाऊ साठे वगळता कुणी त्यावर लिहिले नाही. त्यांनी ‘बरबाद्या कंजारी’ ही जातपंचायतीवर कथा लिहिली आहे. अनेक समाज सुधारकांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. परंतु त्याविरोधात कुणी आवाज उठवला नाही. एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नानंतर, आंदोलनानंतर, खूप मोठ्या संघर्षानंतर जातपंचायतविरोधी कायदा मंजूर झाला आहे. सरकारमध्ये रोज नवीन कायदे मंजूर होत असतात, जुने कायदे दुरुस्त होत असतात. त्यापैकी हा कायदा नाहीये. या कायद्याचा संबंध सामाजिक परिवर्तनाशी, सामाजिक सुधारणांशी जोडावयास पाहिजे. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कधीतरी एक सामाजिक बदल घडवू शकतो. त्यादृष्टीने विचार केल्यानंतर हा कायदा […]
महापुरुषांनाही जातपंचायतीचा जाच
महात्मा गांधी यांनी समुद्र ओलांडून परदेशगमन केले, तेव्हा त्यांची मोढ वाणिया जातपंचायत बसली. सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला. महात्मा गांधींना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. त्यांना मदत करणार्यास सव्वा रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला होता. त्यामुळे परदेशात जाताना व परत आल्यानंतरही त्यांना भेटण्यास कुणीही समाजबांधव पुढे आला नाही. त्यावेळी गांधीजींची प्राथमिकता देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे, ही असल्याने त्यांनी […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जातपंचायतीच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी काही उदाहरणे खाली दिली आहेत. त्या वाचून जातपंचायतीची दहशत समजून येते. एका समाजात जातपंचायतीकडून नववधूची कौमार्याची परीक्षा घेण्यात येते. लग्नानंतर पंचांनी दिलेल्या पांढर्या वस्त्रावर नवर्या मुला-मुलीने झोपल्यावर रक्ताचा डाग असेल तरच लग्न ग्राह्य धरण्यात येण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रक्ताचा लाल डाग नसेल, तर मुलीच्या […]
कोकणात अजूनही आहे गावकीचा धाक
भारतीय समाजात ‘एक स्वतंत्र व्यक्ती’ यापेक्षा एखाद्या धर्माचा, जाती- जमातीचा भाग असलेली स्त्री किंवा पुरुष असणे, हे माणसाच्या अस्तित्वाचे मूळ एकक आहे. जातपंचायत या रचनेची त्या-त्या जाती-जमातीतील पुरुष व स्त्रियांच्या जगण्यावर असलेली पोलादी पकड बघितली तर हे स्पष्ट होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जातपंचायतीच्या मनमानीविरोधातील लढा जसा वेग घेत गेला, तसे महाराष्ट्रामध्ये जातपंचायतींकडून केल्या जाणार्या […]
इब्राहीम हसन शेख, जिल्हा अहमदनगर : हा कायदा जरुरी होता, तो झाला, हे फार चांगले झाले. या कायद्यासाठी महाराष्ट्र अंनिस देत असलेल्या लढ्याची कात्रणे काढून, त्याला निवेदन जोडून मी ते राज्यपाल व राष्ट्रपती यांना पाठवले होते. आता या कायद्याचा गावोगावी प्रचार होणे गरजेचे आहे. अजून हा कायदा पोलिसांपर्यंत पोहोचला नाहीये. मी पोलीस स्टेशनला गेलो आणि […]
13 एप्रिल 2016 रोजी महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा व विधानपरिषदेत जातपंचायतीच्या मनमानी विरोधात कायदा मंजूर करण्यात आला होता.’महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम 2016’असे या कायद्याचे नाव आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. केंद्र सरकार व राष्ट्रपती यांच्या परवानगीसाठी कायदा दिल्लीला पाठविण्यात आला होता. मअंनिसकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला […]