कोकण या निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार प्रदेशाला अंधश्रद्धांचे आगर म्हटले जाते, ते तिथल्या निसर्गाच्या हिरव्या पडद्याआड चालत असलेल्या जगावेगळ्या विविध प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे! इथल्या भुतांनी तर काही मराठी दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. याच विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात अंधश्रद्धांचा अंध:कार दूर करण्यासाठी विवेकाचा दिवा पेटवून तेवत ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता […]
कॅटेगरी: कार्यकर्ता मुलाखत
हंसयोग शिकविणारा शितोळे महाराज किंवा वज्रेश्वरीच्या ‘गुरुमाई’ आश्रम अशा कर्मकांडी व अंधश्रद्धाळू वातावरणात राहूनही आपल्या व चिकित्सक व अभ्यासू वृत्तीला न सोडणारे अंनिसचे कार्यकर्ते दीपक गिरमे यांच्या विवेकवादापर्यंतचा अंनिसच्या सहाय्याने झालेल्या प्रवासाचा आलेख या मुलाखतीतून डॉ. ठकसेन गोराणे यांनी रेखाटला आहे. “आम्ही व्यक्ती आणि समाजव्यवस्था या दोहोंमध्ये परिवर्तन करू इच्छितो,” असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे. […]
प्राचार्य सविता शेटे. बीडच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य. ‘मअंनिस’च्या माध्यमातून महिला विभागापासून राष्ट्रीय अनुसंधान विभागापर्यंत वेगवेगळ्या विभागात, सामान्य कार्यकर्ता ते राज्य कार्यवाह अशा वेगवेगळ्या पदावर काम केलेले व्यक्तिमत्त्व. परंपरा, रूढी आणि महिलांचं दुय्यमत्व नाकारण्यापासून ते पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्यासाठी जागृती करणार्या प्रचारक; प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवरचे टीकेचेच नव्हे, तर हिंसेचे हल्लेही सहन करणार्या कणखर आंदोलक […]