हरंगुळ (ता. जि. लातूर) येथील मरिआईसमोर गाभण मेंढीचा ‘जळ’ या प्रथेनुसार बळी दिला जातो. या प्रथेला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते अंगद कांबळे यांच्यावर देवीच्या भक्तांनी प्राणघातक हल्ला केला. याच्या निषेधार्थ आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी अंगद कांबळे यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्याला अंनिस लातूरने जाहीर पाठिंबा दिला. पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहे, असा आरोप अंनिसचे कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांनी केला आहे. या आंदोलनात माधव बावगे, अनिल दरेकर, वैजनाथ कोरे, रामकुमार रायवाडीकर, सुनीता आरळीकर, गणपतराव तेलंगे, सूरज पाटील, संजय व्यवहारे, श्याम वरियानी, रामदास ससाणे, बाबा शेख, रघुनाथ बेडदे, अॅड. डी. एन. भालेराव, व्ही. एस. टेंकाळे, दिलीप आरळीकर, दत्ता बेले, वसंतराव मिटकले उपस्थित होते.
Categories