Categories
आंदोलन व्यसन

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे मुंबई येथे तिसरे राज्यस्तरीय धरणे आंदोलन

एप्रिल - २०१८

दिनांक 21 मार्च 2018 रोजी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे आझाद मैदान, मुंबई येथे तिसरे राज्यस्तरीय धरणे आंदोलन झाले. व्यस्त जीवनातून वेळ काढून अनेकांनी यात सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे दिवसभर जोशपूर्ण वातावरण होते. अविनाश पाटील, माधव बावगे, अ‍ॅड. रंजना गवांदे, वर्षा विद्या विलास, अ‍ॅड. मनीषा महाजन, अमोल मडामे, ज्ञानेश्वर मुंडे आदी महाराष्ट्राला बर्‍यापैकी परिचित असलेले आणि काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेले दिग्गज मैदानात उतरल्यामुळे स्थानिक सरकारी यंत्रणेला आंदोलन सुरू झाल्यापासूनच घाम फुटायला लागला होता. अतिशय शांततेच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून आंदोलन होत असल्यामुळे इतर आंदोलक आकर्षित होत होते व आम्हाला पाठिंबा देत होते यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापासून आलेल्या आमच्या अर्पिताताई मुंबरकर असतील, रेल्वेचा अतिशय खडतर प्रवास करून पोचलेले आमचे स्नेही विशाल अग्रवाल, चंद्रवीर साळवे, नीलकुमार बंगाले, मायाताई धांडे, किरण ईशी; तसेच यास्मीन शेख, चंद्रकांत राणे, भीमराव गमरे, रामकृष्ण दिग्रस, भारती शेडरी, फरहीन सय्यद, मैमुना शेख, अमीना शेख, डॉ. एस. एम. जाधव, आयुष्यमान प्रतिष्ठान, अमोल लांडगे, शरद कोलते, मदनभाई येवले, योगिराज कांबळे, राजेंद्र निर्भवने, चेतन लांभे, रमेश बैकर, किरण जाधव, सुरेखा भापकर, संदीप मुसळे, कैलाश गायकवाड़, संदीप मूळ, अनिल गायकवाड, शामभाऊ राऊत, सतीष पाचविले, हणमंत चव्हाण, प्रिया नाईक, सदाशिव नाईक, हणमंत जाधव, सचिन जाधव, गोकुळ जाधव, राजेंद्र भोसले, गणेश भाऊ कदम, यश बच्छाव, यशवंत लाकडे, गजेंद्र सुरकार, माधुरी पाटील, दीप्ती गायकवाड, डॉ. अजित मगदूम, नवल ठाकरे आणि पुण्याहून आलेले आमचे डॉ. देविदास भिडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व योद्ध्यांनी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला होता. मा. अविनाश पाटील यांनी बीजभाषण; तसेच इतर अनेक रणरागिणींनी धुरंधरपणे भाषणे केली. यावेळी वृषालीताई बोंदरे, आमदार राहुलजी बोंदरे व इतर अनेक मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेकांनी येऊ न शकल्यामुळे खेद व्यक्त करून ीाी, शारळश्र, ुहरीींींरिि इत्यादींद्वारे पाठिंबा दिला.

एक महत्त्वाची गोष्ट येथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते, ती म्हणजे येथे उपस्थित असलेल्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची घरे पूर्णपणे निर्व्यसनी आहेत. वैयक्तिक लाभाच्या आंदोलनामध्ये; जसे की, शिक्षकांच्या पगारासाठी, कामगार, सरकारी नोकरदार यांच्या समस्यांसाठी किंवा इतर कुठल्याही वैयक्तिक लाभ मिळवण्याच्या आंदोलनामध्ये प्रचंड गर्दी असते. ती असायलाच पाहिजे यात दुमत नाही; पण व्यसनमुक्तीच्या आंदोलनात ही सर्व काम करणारी माणसे दुसर्‍याच्या उज्ज्वल भविष्याची चिंता करीत आहेत, त्यासाठी स्वतःचा वेळ, पैसा, श्रम, मानसिक ताण सहन करून नवी दिशा देण्यासाठी विविध स्तरावर झटत आहेत, याचे समाजाला विस्मरण व्हायला नको, एवढी अपेक्षा व्यक्त करतो.

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचामार्फत करण्यात आलेल्या या तिसर्‍या राज्यस्तरीय आंदोलनाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र अंनिसचे मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष विजयजी परब, राज्य सरचिटणीस नंदकुमार तळशीलकर, उल्हासजी ठाकूर, कृष्णाजी चांदगुडे, मुंबई मअंनिसचे अध्यक्ष गिरीशभाई शहा माझे मित्र रूपेश गिरा, वैभव आदींनी आंदोलनाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. शाहीर रामकृष्ण दिग्रसकर, शाहीर एस. एस. शिंदे यांनी आपल्या सुरेल आवाजात विविध गीतांनी दिवसभर प्रबोधन केले. प्रा. सुनील चव्हाण यांनी सूत्रसंचालन, तर नंदकिशोर तळशीलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्थानिक मंडपवाले महेंद्रभाऊ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष साथ दिली.

इतर दोन्ही आंदोलने व पुन्हा हे तिसरे आंदोलन सलगपणे झाल्यामुळे सरकारने याची गंभीरतेने दखल घेतली असून मा. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आंदोलनाची दखल घेत शिष्टमंडळाबरोबर सुमारे दीड तास चर्चा केली.

नवल ठाकरे, धुळे. संपर्क : 9527206057