माझ्या विचार प्रक्रियेत पूर्ण विरामाला स्थान नाही, माझी मनोवृत्ती अर्धविरामी आहे. मी थांबत नाही, थबकतो, अभ्यास करतो, चिकित्सा करतो त्यामुळेच माझी विचार प्रक्रिया सातत्याने गतीशील राहिली आहे आणि मला वाटते ही वैचारिक गतिशीलता हाच विवेकवादाचा गाभा आहे. हे उद्गार आहेत गेली चाळीस वर्षे विवेकवादाचा विचार आपल्या भाषणातून, लिखाणातून, शिकवणुकीतून सार्या भारतभर मांडणार्या डॉ. डी. डी. […]