Categories
परिसंवाद

श्रेष्ठ कोण? धर्मसत्ता की राज्यसत्ता

वार्षिकांक - २०१६

धर्मानुसार राजकारण व्हावे, धर्मसत्तेचे राज्यसत्तेचे नियंत्रण असले पाहिजे, जेव्हा जेव्हा राज्यसत्ता भ्रष्ट होते तेव्हा तेव्हा धर्मसत्ता तिला ताळ्यावर आणते. अशा पद्धतीची वक्तव्ये सत्ताधार्‍याकडून तथाकथित धर्ममार्तंडाकडून होत आहेत. सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ उडवून दिला जात आहे. या संदर्भात विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते यांची काय मते आहेत यादृष्टीने हा परिसंवाद घेतला आहे. यात प्रा. एन. डी. पाटील यांनी ज्यादिवशी […]

Categories
परिसंवाद

धर्मसत्तेचा राज्यसत्तेवर प्रभाव नको – प्रा. एन. डी. पाटील

वार्षिकांक - २०१६

गेल्या काही दिवसांत अशा घटना आणि अशी वक्तव्ये येत आहेत की ज्यातून धर्मसत्ता श्रेष्ठ की राजसत्ता…? अशा अंगाने गोंधळ निर्माण होईल…अशी परिस्थिती निर्माण होत आहे… परवाच काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये विधानसभेत सभापतींच्याही आसनाच्या वर बसून एका नग्न महाराजांचं प्रवचन झालं आणि त्यात ते असं म्हणाले की, “धर्म पती आहे आणि राजकारण पत्नी आहे. सबब, पत्नीने पतीच्या […]

Categories
परिसंवाद

धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धर्मनिरपेक्षता

वार्षिकांक - २०१६

नुकत्याच एका समारंभात महाराष्ट्राचे सुविद्य मुख्यमंत्री असे म्हणाले की, धर्मसत्तेचे राजसत्तेवर नियंत्रण असले पाहिजे. यापूर्वी पंजाबचे अकाली दलाचे मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला पण असे म्हणाले होते. पण पंजाबात अकाली दलाची सत्ता शीख धर्मसत्तेतूनच उगम पावते. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या द्वारे त्यांनी ही सत्ता प्राप्त केली आहे. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात अशी परिस्थिती नाही. अगदी मराठेशाहीतसुद्धा राज्यव्यवस्थेने धर्मसत्तेला […]

Categories
परिसंवाद

आता तर खरी लढाई सुरू झालीय – जयदेव डोळे

वार्षिकांक - २०१६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेव्हा जेव्हा राज्यसत्ता भ्रष्ट होते, तेव्हा धर्मसत्ता तिला जागेवर आणते; राजसत्तेवर धर्मसत्ता अंकुश ठेवते,’ असे विधान केले. त्यांचा हा विचार नेमका कुठून आलेला आहे? त्या धारणेचे मूळ नेमके कुठे आहे? फडणवीसांची संघाच्या गणवेशातली छायाचित्रे आपण बघितलेली आहेत. त्यामुळे जे अंगावर आहे, ते डोक्यामध्येही असणार. त्यांची भाषाच पाहाना. ती अजूनही धर्मसत्ता, राज्यसत्ता […]

Categories
परिसंवाद

अंकुश की आधार?

वार्षिकांक - २०१६

सामान्यांच्या दृष्टिकोनातून धर्मसत्ता व राज्यसत्ता दोन्हीचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः असंख्य जाती-जमाती-पंथ-धर्मांनी गजबजलेला, प्रचंड कालखंडातून संक्रमित झालेला, अनेक राज्यसत्ता व धर्मसत्ता अनुभवलेला भारतीय समाज लक्षात घेता हे स्पष्टीकरण आवश्यक ठरते. त्यात या दोन्ही सत्ता एकमेकांत इतक्या मिसळून गेलेल्या की, त्यांचे स्वरूप काही वेगळे असू शकते, हा विचार आधुनिक लोकशाहीनंतरच आत्ता कुठे सामोरा आला […]

Categories
परिसंवाद

धर्मसत्ता आणि साहित्य

वार्षिकांक - २०१६

धर्मसंस्था ही प्राचीन काळापासून सामाजिक व सांस्कृतिक मानवी व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. आजच्या अत्याधुनिक काळातही तिचे या संदर्भातले स्थान हे महत्त्वाचेच राहिले आहे. प्राचीन काळात तर ती राज्यसत्तेबरोबर समांतरपणे कार्यरत होती. ऋग्वेदपूर्व आणि ऋग्वेदोत्तर काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारातील धर्मसंस्थेचा सहभाग काय होता आणि या इतिहास प्रवाहातून नेमके काय घडत गेले, याची […]