11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते, या दोन्ही महामानवाच्या जयंती निमित्त त्यांचे समतेचे विचार जनमानसात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा-शाखांत दरवर्षी सामाजिक समता सप्ताह साजरा केला जातो.
या अभियानांतर्गत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजकार्याविषयी व्याख्यानाचे आयोजन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट प्रोजेक्टरद्वारे दाखविणे व त्यावर चर्चा घडवून आणणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन, पथनाट्य, पुस्तक प्रदर्शन या सारख्या अभिनव पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
भुसावळ शाखा (जळगाव) तर्फे रेलवे कर्मचारी यूनियन यांच्या सहकार्याने सामाजिक समता अभियान कार्यक्रम घेण्यात आला.त्या अंतर्गत दिगंबर कट्यारे जिल्हा कार्याध्यक्ष जलगाव यांचे वैज्ञानिक दृष्टिकोण व चमत्कार सादरीकरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अरुण दामोदर व सागर बहिरुणे,ईश्वर खंडारे आणि सहकारी यांनी सहकार्य केले.
शहादा (नंदुरबार) शाखेतर्फे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती च्या निमित्ताने पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा स्टॉल लावण्यात आला. यात डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यांच्यासह महराष्ट्र अं.नि.स ची 18,000 रूपयांची पुस्तके विकण्यात आली. हा उपक्रम शाखेच्या वतीने गेल्या 7 वर्षापासून सुरु आहे. या उपक्रमात राज्य कार्याध्यक्ष अविनाश भाई पाटील, राज्य सरचिटनिस विनायक सावळे खंडू घोडे, रविंद्र पाटील, संतोष माळी, श्याम महिन्द्रे, प्रदीप केदारे, श्याम भलकारे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तर नागपुर मअंनिस शाखेतर्फे महात्मा जोतिबा फूले जयंती आणि युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त दयानंद पार्क जरीपटका, लष्करीबाग, संविधान चौक, शाखेचे जनसंपर्क कार्यालय इन्दौरा, कुशी नगर डॉ. आंबेडकर चौक, पारमिता भवन कुशी नगर या सर्व ठिकाणी पथनाट्य, पोवाडा व चळवळीचे प्रबोधन पर गीत गाऊन क्रांतिबा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्याच प्रमाणे समितीचे प्रचार साहित्य वाटण्यात आले सभासद नोंदणी सुद्धा करण्यात आली. विशेष म्हणजे माननीय माजी गृह राज्य मंत्री नीतिनजी राऊत यांनी स्टॉल ला भेट दिली व समिति विषयी विचारपूस करून पुढील कामा करिता सुभेच्छा दिल्या.
लातूर शाखेतर्फे या निमित्ताने सामाजिक समता सप्ताह अंतर्गत संविधानावर आधारीत पोवाडा व अभंगाच्या माध्यमातून उपस्थित सर्वांचे प्रबोधन व त्यांच्या सामाजिक विचार याच्यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सुनिल स्वामी यांनी संविधानावर आधारीत पोवाडा सादर केला.
खोपोली खालापुर (रायगड) शाखे मधे सभासद यांनी प्रत्येक सभासद याने 5 ते 10 मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य बद्दल बोलणे असा कार्यक्रम घेतला. त्यामुळे सभासद यांचे स्टेज डेरिंग व अभ्यास या दोन्ही गोष्टी झाल्या, तसेच बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक जयंती सुद्धा साजरी झाली. या कार्यक्रमात संदीप गायकवाड़, डॉ सुभाष कटकदौंड, सुविधा गायकवाड़, महेंद्र ओव्हल, दयानंद पोळ, रोहन दळवी, प्रिया कदम, जयश्री पोळ, यशवंत गायकवाड़ सहभागी झाले.
निमगूळ ः महात्मा ज्योतिबा फुले जयंती व बाबासाहेब आंबेडकर जयंती, सामाजिक समता सप्ताह रूपाने म.अनिस धुळे व जि. प.शाळा1व2 निमगूळ येथे साजरी केली त्यावेळी महाले सर, वाघ सर, संजय पाटील सर, परदेशी सर, हर्षल सूर्यवंशी, दिलीप खिंवसरा, केशव महाजन, गौतम मोरे, चांदगुडे मॅडम, भावसार मॅडम, राजपूत मॅडम उपस्थित होते
पालघर अंनिसने समता सप्ताह निमित्त, शेड स्वयंसेवी संघटननेचे साथी, भीमराव घरत व प्रसिद्ध आहार तज्ञ मा ःऋजुता दिवेकर यांनी आज सोनावे, ता जि पालघर येथील अनेक अंगणवाडीतील सेविका, मुले व पालक यांच्यासाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला, अंनिस तर्फे मा ए आर खिलारे, अण्णा कडलासकर यांनी संवाद घेतला, पोलीस निरीक्षक मा सानप यावेळी उपस्थित होते,. कुपोषण, उपवास, आरोग्याविषयी गैरसमज, अंधश्रद्धा, भगतगिरी यावर मार्गदर्शन घेतले.
नांदेड अंनिसच्या वतीने दि. 11 एप्रिल पासून ते दि. 14 एप्रिल पर्यंत सामाजिक समता सप्ताह हा उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत अंनिस नांदेड व नंदिग्राम हाउसिंग सोसायटी नांदेड तर्फे दि.14 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सानपाडा (नवी मुंबई) शाखेतर्फे जयंती निमित्ताने चमत्काराच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले, या वेळी शुभम कांबळे, प्रथमेश लोंढे, अशोक निकम आणि शाखा कार्यकर्त्यांनी यांनी सहकार्य केले.
अलिबाग शाखेच्या वतीने डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 वी जयंती निमित्ताने मल्याण अलिबाग येथे नितीन राउत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.. सहभाग शाखा पदाधिकारी जयेश मोरे व कार्यकर्ते.
मुंबई बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 16.रमाई महीला मंडळ,संघामित्रा युवती संघ याच्या सहकार्याने आज दि15एप्रील रोजी डाँ,बाबासाहेब आंबेडकर यांचा 128व्या जयंती निमित्त आज अंधश्रद्धा निर्मूलन व चमत्कार सादरीकरण कार्यक्रम नंदकिशोर तळाशिलकर राज्य सरचिटणीस ,रुपेश शोभा शंकर गोरेगाव शाखा कार्याध्यक्ष व अँड.प्रबुध्द माळी यानी सादर केला. अश्या प्रकारे राज्यातील सर्व क्रियाशील शाखांतर्फे या महामानवाना कृतीशील अभिवादन करण्यात आले.
– अनिल करवीर, राज्य कार्यवाह
(विविध उपक्रम विभाग)
संपर्क ः 9823280327