भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कोल्हापूरचे जिल्हा सचिव कॉ. सतीशचंद्र कांबळे यांच्या वडिलांचे गेल्या वर्षी दु:खद निधन झाले. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध – म्हणजे पहिला स्मृतिदिन! पूर्वजन्म आहे, पुनर्जन्म आहे आणि त्यासाठी आत्मा आहे, या कल्पनेवर-पायावर- श्राद्धाची इमारत उभी आहे. पण विज्ञानाने आत्मा आणि पूर्व-पुनर्जन्म सिद्धांत तपासल्यास सत्य ठरत नाही. चार्वाकांनी सांगितल्यानुसार हे सर्व पुरोहितांच्या पोट भरण्याच्या युक्त्या आहेत.
कॉ. सतीशचंद्र यांनी वडिलांच्या श्राद्धानिमित्त विचारांची मेजवानी द्यायचे ठरवले. दहा शाळांमध्ये प्रत्येक इयत्तेत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले असे विषय देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना अंनिसच्या खंडामधील एक ग्रंथ, कॉ. पानसरेंचे चरित्र-आरपार कॉम्रेड, शिवाजी कोण होता, कन्हैयाकुमार, छत्रपती शाहू, विवेकी कवयित्री बहिणाबाई अशी पुस्तकरुपाने पारितोषिके देण्यात आली. दहा हजार रुपयांचे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे खंड वाटले.
– अनिल चव्हाण