अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे घेण्यात आलेल्या रिंगणनाट्य कार्यशाळेचा समारोप आर. आर. विद्यालयात झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक एकात्मतेवर आधारित नवीन बसस्थानकात ‘सापडलं रे सापडलं’ या नाटकाचे सादरीकरण केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित गीते, घोषवाक्ये सादर केली. या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रा. योगेश कुदळे, अवधूत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अंनिसचे कार्यकर्ते आणि नाट्य व लघुपट दिग्दर्शक अवधूत […]
कॅटेगरी: चळवळ
अंधश्रद्धेच्या जोखडातून ‘चिंध्यापीर’ मुक्त
अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेली, इस्लामपूर येथील ताकारी रस्त्यावरील आर.आय.टी. कॉलेजसमोरील एक औषधी वनस्पती तथा ‘चिंध्यापीर’ चिंध्यांच्या जोखडातून मुक्त झाली. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य विविध उपक्रमप्रमुख डॉ. नितीन शिंदे, प्राचार्य एस. बी. माने, शाखेचे अध्यक्ष विष्णू होनमोरे, पी. व्ही. गायकवाड, योगेश कुदळे, अवधूत कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. अनेक […]
काळ्या बाहुल्यांच्या पाशातून झाडे मुक्त
असाच एक निनावी फोन… खणखणतो.. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या मोबाईलवर! मॅडम नुकत्याच लोणावळ्याचे जादूटोणा प्रकरण धसाला लावून माघारी पोचलेल्या … आणि त्यांच्या मोबाईलवर पलीकडील आवाज बोलत होता….‘अहो मॅडम, खडकीच्या ज्ञानेश्वर घाट स्मशानभूमीजवळच्या होळकर ब्रीज नजिकच्या झाडांना अंधश्रध्देतून मुक्त कराल काय ?’ मॅडम :- ‘काय आहे प्रकरण ? आणि आपण कोण बोलताय?’ आवाज:- “अहो […]
नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व त्यावर दुकान चालविणारे शासनकर्ते होत आहेत. साक्षात् लोकांवर शासन करण्यासाठी अंधश्रद्धेची नेमणूक केली जात आहे. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अतिशय कठीण झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर […]
‘FIRA’ ची 10 वी राष्ट्रीय परिषद त्रिवेंद्रम येथे संपन्न ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन’ची 10 वी राष्ट्रीय परिषद त्रिवेंद्रम येथे दि.25, 26 फेबु्रवारी 2017 दरम्यान पेरियार रॅशनॅलिस्ट फोरम, त्रिवेंद्रम यांचे सहकार्याने बी.टी.आर. मेमोरियल हॉल येथे संपन्न झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय समन्वय विभागाचे सहकार्यवाह प्रा.डॉ. सुदेश घोडेराव उपस्थित होते. देशातील विविध राज्यांतील 50 […]
भटक्या जोशी समाजातील प्रमिला कुंभारकरने आंतरजातीय विवाह केला म्हणून जातपंचांनी तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. पुढे प्रमिला जातीबाहेरच्या पुरुषापासून गरोदर असल्याचे समजल्यावर, दुसर्या जातीच्या पुरुषाचा वंश तिच्या पोटात वाढतो म्हणून प्रमिलाच्या वडिलांवर आणखी दबाव आणला. त्यासंबंधाने कृष्णा चांदगुडे व नाशिकमधील अंनिसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तशी तक्रार केली. तक्रारीचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करून जातपंचांना अटक […]
मअंनिसचा दिल्ली दौरा यशस्वी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 42 महिने पूर्ण झाले. त्यानंतर त्याच पद्धतीने कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचेही खून झाले. तपास प्रक्रियेतून जे निष्पन्न झाले आहे, ते आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र तपास समाधानकारक नाही, ही खंत आहे. मअंनिस गेली 42 महिने अत्यंत चिकाटीने, सातत्यपूर्वक अहिंसक […]
महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान 3 ते 12 जानेवारी 2017 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला सहभाग विभागातर्फे 3 जानेवारी, ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ ते 12 जानेवारी, ‘राजमाता जिजाबाई जयंती’ या दरम्यान महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान घेण्यात आले. ‘जातिधर्माचा नको आधार, आम्ही वापरू मानव अधिकार’ हे घोषवाक्य घेऊन कार्यक्रम सादर करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी ‘जातिअंत’ […]
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा कार्यकर्त्यांचे ‘महामानवास युवा अभिवादन आणि संविधान जागर यात्रा’ 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2016 दरम्यान संपन्न झाली. त्याविषयी…. महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्र अंनिसच्या वतीने एका अभिनव पद्धतीने अभिवादन करण्याची कल्पना मांडली. बाबासाहेबांनी […]