शांतपणे, निरपेक्ष वृत्तीने सतत क्रियाशील असणारे कार्यकर्ते हेच संघटनेचे खरे बळ असते. अशा वृत्तीने अंनिससह इतर सामाजिक कार्यामध्ये योगदान देणारे कार्यकर्तेविनायक चव्हाण यांचे कार्य आदर्शवत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते विनायक चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा रविवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सत्यनारायण मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक प्रा. प. रा. आर्डे यांच्या हस्ते विनायक चव्हाण व त्यांच्या पत्नी शारदा चव्हाण यांचा भारतीय संविधानाची प्रत व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राष्ट्र सेवा दल, शाखा इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंतरभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शामराव नकाते, अंनिसचे शाखाध्यक्ष विनायक होगाडे बापू, राष्ट्रसेवा दलाचे शाखा कार्याध्यक्ष अभिजित होगाडे, सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्तेरेहमान खलिफा, ज्येष्ठ राजकीय नेते सुधाकर मणेरे, मदन कारंडे, अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश वडणगेकर, रमेश माणगावे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मा. रमेश मर्दा, कल्लाप्पा गावडे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर नानावटी, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे कार्यकारी संपादक राहुल थोरात, सहसंपादक मुक्ता दाभोलकर, अनिष पटवर्धन, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अमर कुलकर्णी, डॉ. आनंद कोळी, डॉ. आरती कोळी, डॉ. रमेश स्वामी, डॉ. निर्मला स्वामी, शाहिरी क्षेत्रातील कोल्हापूर जिल्हा शाहिरी परिषदेचे अध्यक्ष शामराव खडके, विजय जगताप, संजय जाधव, हिंदुराव लोंढे, गंगाराम नलवडे, आयुर्विमा क्षेत्रातील सुनील पाटील, सुहास परीट, पुष्पा सुतार, भटक्या-विमुक्तांच्या चळवळीतील विविध कार्यकर्ते; तसेच अंनिस व सेवा दलाचे कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कोरोची, इचलकरंजी, सांगली इत्यादी शाखांतील कार्यकर्तेआणि चव्हाण यांचे मित्र व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीस शोभा स्वामी यांनी मानवतावादी प्रार्थना सादर केली. अंनिसचे राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह सुनील स्वामी यांनी प्रास्ताविकामध्ये विनायक चव्हाण काका यांनी गेल्या तीस वर्षांत आणि विशेषतः डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर अखंडपणे केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर अंनिस युवा विभाग राज्य कार्यवाह कृष्णात कोरे, कन्या स्वरदा संकपाळ, मुलगा योगेश चव्हाण, बहीण सुवर्णा पाटील, विनायक होगाडे, शाहीर शामराव खडके, प्रा. विद्या पाटील, सुनील पाटील, नंदकुमार वेदपाठक इत्यादींनी मनोगते व्यक्त केली. विनायक चव्हाण यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचे हृदयस्पर्शी वर्णन या विविध वक्त्यांनी केल्यामुळे भावनोत्कट वातावरणात निर्माण झाले. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी हा समाजसेवेचा वसा असाच पुढे चालू ठेवीन, असे उद्गार विनायक चव्हाण यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय रेंदाळकर यांनी केले. मंगल सुर्वे यांनी आभार मानले.
– विनायक होगाडे, इचलकरंजी