Categories
चळवळ

संगमनेर येथे दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धा

ऑक्टोबर - २०१८

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समिती, संगमनेर शाखेच्या वतीने विविध विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 16 सप्टेंबरला रोजी पार पडला. यावेळी महा.अंनिस अहमदनगर जिल्ह्याचे सल्लागार बाबा अरगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुवाबाजीविरुद्ध संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी उपस्थितांना महा.अंनिसची चतुःसूत्री समजावून सांगितली.

यानंतर अध्यक्षीय भाषणात बाबा अरगडे यांनी ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य आणि बुद्धिप्रामाण्य यातील फरक उदाहरण देऊन (छोट्या कथा सांगून) स्पष्ट करून सांगितला, तसेच चमत्कारामागे असलेली हातचलाखी, वैज्ञानिक कार्यकारणभाव समजून सांगत भोंदूबाबा कसे तयार होतात, हे सांगितले. यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धा तीन गटात घेतली होती- शालेय, कुमार आणि खुला गट. या तीनही गटातील विजेत्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रायोजक, निरीक्षक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे कार्याध्यक्ष काशिनाथ गुंजाळ यांनी केले व शाखेचे सचिव अरविंद गाडेकर यांनी आभार मानले.