Categories
चळवळ

नवी मुंबई येथे भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा संपन्न

ऑक्टोबर - २०१८

अंनिस नवी मुंबई शाखेने दिनांक 02 सप्टेंबर 2018 रोजी शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 103 च्या प्रज्योत गायकवाड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला.

प्रथम क्रमांक मिळविलेल्या मुलाच्या शाळेतच पारितोषिक वितरण समारंभ घ्यावा असे शाखेने ठरवले व दिनांक 25 सप्टेंबर रोजी हा समारंभ शाळा क्र. 203 ऐरोली येथे घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय अशोक अंकुश सर यांना बोलावले होते. इतर शाळांचे सहभागी स्पर्धकही कार्यक्रमासाठी या शाळेत आले होते.

सर्व सहभागी स्पर्धकांना पनवेल येथील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ व म. अंनिसचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, म. अंनिस राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व नवी मुंबईचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब पठाडे यांच्या सहीचे प्रमाणपत्र व प्रकाश रेड्डी लिखित ‘भगतसिंग : एक झंझावात’ ही पुस्तिका देण्यात आली.

विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ‘भ्रम व निरास,’ ‘अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह व पूर्णविराम’ व ‘भगतसिंग : एक झंझावात’ ही पुस्तके देण्यात आली.

या स्पर्धेसाठी जी. पी. पारसीक बँकेने अर्थसहाय्य केले. या कार्यक्रमासाठी नवी मुंबई शाखेचे भाऊ पठाडे, रेखा देशपांडे, राजीव देशपांडे, नीमा शिंगारे, अशोक निकम, नंदना गजभिये, नरेश पाटील; तसेच सुहास शिंगारे व तुषार भारती यांनी परिश्रम घेतले.