महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्हा आणि तालुक्यात झालाच आहे. पण, महाराष्ट्राबाहेरील राज्यातही हा विचार पोहोचला आहे आणि आता याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. या वर्षीचा अमेरिकेतील मानाचा समजला जाणारा ’अविजित राय करेज अवॉर्ड’ आपल्या संघटनेला प्रदान करण्यात आला. तो स्विकारण्यासाठी अमेरिकेस गेलेल्या आपल्या कार्याध्यक्षांनी, त्यानिमित्ताने केलेल्या भाषणाचा स्वैर अनुवाद […]
लेखक: arc_admin
स्त्री सन्मानाचा लढा : शबरीमला
10 ते 50 वयाच्या महिलांना मासिक पाळी येते, त्यामुळे त्या अपवित्र आहेत. शिवाय अय्यप्पा ब्रह्मचारी आहे; तेव्हा शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देता येणार नाही, असे महिला प्रवेशबंदीचे समर्थन करणार्या पुरोहितांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आणि 2018 साली महिलांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाले. स्त्री–पुरुष विषमतेविरोधातली लढाई धर्मक्षेत्रातून न्यायक्षेत्रात आली आणि तिने राजकीय क्षेत्रही व्यापले. कोर्टाच्या या निर्णयानंतर […]
कोकण या निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार प्रदेशाला अंधश्रद्धांचे आगर म्हटले जाते, ते तिथल्या निसर्गाच्या हिरव्या पडद्याआड चालत असलेल्या जगावेगळ्या विविध प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे! इथल्या भुतांनी तर काही मराठी दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. याच विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात अंधश्रद्धांचा अंध:कार दूर करण्यासाठी विवेकाचा दिवा पेटवून तेवत ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता […]
डॉ. विठ्ठल प्रभूंनी स्त्री कामशोषणाविषयी जळजळीत मते मांडली आहेत. कामजीवनासंबंधी आजवर स्त्री आपले विचार मांडत नव्हती, त्यामुळे तिच्या लैंगिकतेसंबंधी पुरुषाच्या मनातले विचार हेच वास्तव मानले गेले व तिचे अधिकाधिक शोषण होऊ लागले. कायदा असूनही हुंडाबळी, बालविवाह, स्त्री–भ्रूणहत्या, लैंगिक छळ, एकतर्फी प्रेम, हत्या, वासनाकांड असे प्रकार वाढताहेत. यावर उपाय? लैंगिक शिक्षण. सेक्सची उत्क्रांती सांगणारं एक पुस्तक […]
पडद्यामागचा कार्यकर्ता – वैजनाथ कोरे
वैजनाथ कोरे हे सुरुवातीपासून युवक क्रांती दल, राष्ट्रसेवा दल, ‘महाअंनिस’साठी वेळ देत असत. पण सर्वांत जास्त वेळ ते ‘महाअंनिस’ला देत असत. त्याचबरोबर ‘महाअंनिस’ला त्यांनी फार मोठी मदत केलेली आहे, आणि तीही सातत्याने. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वतीने त्यांना ‘आधारस्तंभ’ म्हणून अनेक वेळेला गौरविले होते. ‘महाअंनिस’च्या लातूर शहर शाखेचे अध्यक्ष वैजनाथ केरबा कोरे यांचे शुक्रवार, दि. 11 […]
डॉ. दाभोलकरांच्या बहुतेक लेखांचा व भाषणांचा अनुवाद सुमन ओक यांनी केला. त्यातूनच डॉक्टरांचा परिचय अमराठी वाचकांना होऊ शकला. डॉक्टरांच्या लेखात व भाषणात अस्सल मराठी शब्दांची व मराठी समाजातील, संतवाङ्मयातील उदाहरणांची रेलचेल असे. मराठी भाषेच्या सौंदर्याला धक्का न लावता इतर भाषांत अनुवाद करत असताना फार मोठी कसरत करावी लागते. परंतु सुमन ओक यांना मात्र या गोष्टी […]
स्त्रिया हा अंधश्रद्धेने बाधित असा समाजातील एक मोठा घटक आहे. त्याच वेळी हा घटक मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा वाहकही आहे, हे वापरून–वापरून गुळगुळीत झालेले विधान तेवढेच सत्यही आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्याच काय, पण एकूण समाजबदलाच्या कार्यात झोकून देऊन काम करणार्या स्त्रियाही खूप आहेत, याचा नेहमी उल्लेख होतोच, असे नाही. अलका चाफेकर अशा एक कार्यकर्त्या होत्या. ‘होत्या’ […]
दु:ख पाहता जवापाडे। सुख पर्वताएवढे।
स्टीफन पिंकर कृत ‘एनलाईटनमेंट नाऊ’ या पुस्तकाचा परिचय ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।’ असं तुकारामबुवांनी म्हटलेलंच आहे. जगात ‘सुख थोडे दु:ख फार,’ हा लोकप्रिय समज; पण पिंकर म्हणतो, ‘दु:ख पाहता जवापाडे, सुख पर्वताएवढे’ हे जग झक्कपैकी सुधारत चाललं आहे, चक्क ज्ञानोदय झाला आहे, उत्तरोत्तर प्रगती होते आहे, असं तो ठामपणे सांगतो. ज्ञानयुगाचा आजचा अवतार बाळसेदार […]
तमिळनाडू येथील द्रविड या संघटनेला 75 वर्षे झाली. महाराष्ट्रातील महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा या संघटनेने पुढे नेला. या संघटनेचे संस्थापक पेरियार रामसामी नायर यांनी ब्रिटिशांच्या काळात व स्वातंत्र्योत्तर काळात जातीनिर्मूलन, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, मंदिर प्रवेश या सारख्या सामाजिक प्रश्नांवरून संघर्ष उभे केले. चळवळ उभी केली. या संघटनेचे व पेरियार यांचे परिचयात्मक लेख […]
पेरियार ई. व्ही. रामसामी नायकर यांचा जन्म 1879 साली एका श्रीमंत धार्मिक व्यापारी कुटुंबात तमिळ नाडू येथील इरोड या शहरी झाला. (‘पेरियार’ हे ‘महात्मा’सारखे सन्मान करण्यासाठी वापरलेले पद आहे.) पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते वडिलांच्या व्यापारधंद्यात सहभागी झाले. वडील धार्मिक (व श्रीमंत) असल्यामुळे त्यांच्या घरी धार्मिक गुरूंची ये-जा होती. हे गुरू-महागुरू संध्याकाळच्या सुमारास धर्माविषयी प्रवचन-कीर्तन करत […]