Categories
अभिवादन

जगन्मित्र, अजातशत्रू विज्ञानवादी : श्रीकृष्ण गुत्तीकर

जुलै - २०१७

लोकविज्ञान संघटनेचे आधारस्तंभ असलेले, वयाच्या 82 व्या वर्षीही प्रचंड उत्साहाने विज्ञान-प्रसाराचे काम करणारे श्रीकृष्ण गुत्तीकर यांच्या अचानक जाण्याने लोकविज्ञान संघटनेत तर मोठी पोकळी झाली आहेच; पण विज्ञान चळवळीतील निरनिराळे प्रवाह आणि कार्यकर्तेयांच्यातील एक महत्त्वाचा दुवाही निखळला आहे. पक्का विज्ञानवादी, पुरोगामी असा हा हाडाचा कार्यकर्ता दिलदारपणे सर्वांशी संवाद साधणारा आणि जीवनावर सर्वांगाने प्रेम करणाराही होता. अनेकांना […]

Categories
अभिवादन

निळूभाऊंच्या स्मृतीनिमित्ताने निळू फुले फिल्म क्लब सुरू करण्याचे मअंनिसचे आवाहन

जून – २०१७

13 जुलै 2009 साली सुप्रसिद्ध कलावंत निळूभाऊ फुले आपल्यातून गेले. ते केवळ सिने व नाट्य कलावंत नव्हते, तर एक सच्चा माणूस म्हणून त्यांचे जगणे होते. पुरोगामी चळवळीशी त्यांची अखेरपर्यंत सक्रिय बांधिलकी होती. स्वातंत्र्य चळवळीच्या समाजवादी पार्श्वभूमीतील राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकातून ते कलावंत म्हणून पुढे आले होते. त्यानंतर त्यांनी मराठी व हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणून […]

Categories
अभिवादन

मुंबई अंनिसच्या कार्यकर्त्या अलकाताई काजरोलकर यांचे निधन

जून – २०१७

अलका गोविंद काजरोलकर या मुंबई महानगर पालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होत्या. त्यानंतर त्या महापालिकेच्या विभाग अधिकारी (बीट ऑफिसर) पदावर सुद्धा कार्यरत होत्या. आपापली इतर कामे सांभाळत अलकाताई व गोविंद काजरोलकर हे दोघेही सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेले जोडपे आहे. रिटायरमेंट नंतर जेव्हा इतर लोक आरामात दिवस घालवण्याचा विचार करतात, तेव्हा या जोडप्याने आता संपूर्ण वेळ सामाजिक […]

Categories
अभिवादन

अंनिसचा झुंजार ‘वाघ’ हरपला!

मार्च - २०१७

महाराष्ट्र अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ. मच्छिंद्र वाघ, रा. नेवासा, जि. अहमदनगर यांचे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मच्छिंद्र वाघ हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ‘आरोग्य सेवक’ म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्याकाळी लोक त्यांना डॉक्टर म्हणूनच हाक मारीत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात हागणदारीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती. डॉ. वाघ हे 1991 […]

Categories
अभिवादन

डॉ. सुलभा ब्रह्मे यांना विनम्र अभिवादन

फेब्रुवारी – २०१७

ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, लोकविज्ञान संघटनेच्या संस्थापक सदस्या आणि कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे 1 डिसेंबर 2016 रोजी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. सुलभाताईंचा जन्म सातारला 1932 मध्ये झाला. सुलभाताई या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, सहकार चळवळीचे प्रवर्तक धनंजयराव गाडगीळ व सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला काळे यांच्या कन्या. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ हे त्यांचे […]

Categories
अभिवादन

राजकीय शिक्षणाचा चैतन्यशील स्रोत – कॉ. गोविंद पानसरे

फेब्रुवारी – २०१७

16 फेब्रुवारी 2015 या दिवशी कॉ. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला झाला आणि 20 फेबु्रवारी 2015 रोजी त्यांचा दु:खद अंत झाला. तेव्हापासून साहजिकच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची कमी ठळकपणे जाणवते आहे. एक विवेकी, मार्क्सवादी विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व कामगार चळवळीचा ज्येष्ठ नेता, कामगारांचा बुद्धिमान वकील, सामाजिक व राजकीय चळवळीतील धडाडीचे व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील माणूस अशा […]

Categories
अभिवादन

ज्येष्ठ संपादक दिलीप पाडगावकर यांना विनम्र अभिवादन

फेब्रुवारी – २०१७

भारतीय म्हणून आपण भारतीय विविधतेला मानतो. पण आज याच विविधतेला संपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे परिवर्तनवादी चळवळीसमोरचे मोठे आव्हान आहे. यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी, साध्या सोप्या शब्दांत सांगावे, अहिंसेच्या मार्गाने लोकांना प्रबोधित करीत संवाद करावा, असे मार्गदर्शन अंनिसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र अंनिसच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात करणार्‍या ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे माजी संपादक दिलीप पाडगावकर यांचे पुणे […]

Categories
अभिवादन

समीक्षक विचारवंत वसंतराव पळशीकर यांना विनम्र अभिवादन!

फेब्रुवारी – २०१७

विचारांच्या क्षेत्रात लहान-मोठे कार्य करणार्‍या, विचारांविषयी आस्था असणार्‍या मंडळींनी विचारांच्या क्षेत्रातील शोचनीय परिस्थिती सुधारण्याचे काम अंतर्मुख होऊन प्रथमत: हाती घ्यायला हवे. ही गोष्ट विचारवंतांची एक संघटना बांधून वा पक्ष स्थापन करून साध्य होणारी नाही. वैयक्तिक व छोट्या समूहांच्या पातळीवर चोख, कसदार विचार करावयास लागणे, हा एक मार्ग आहे. आपल्या सह-विचारवंतांच्या वैचारिक कृतींची चोख समीक्षा करणे […]

Categories
अभिवादन

न्यायापासून वंचित राहिलेल्या खैरलांजीच्या भैय्यालाल भोतमांगेंनी अखेर श्वास सोडला!

फेब्रुवारी – २०१७

आपली पत्नी व तीन मुलांची ज्या खैरलांजी गावातील जातीयवाद्यांनी निर्घृण हत्या केली, त्या आरोपींना कठोर शासन होईल, अशी गेली दहा वर्षे प्रतीक्षा करणारे भैय्यालाल भोतमांगे अखेर दि. 27 जानेवारी 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने हे जग सोडून गेले. खैरलांजीच्या अमानुष दलित हत्याकांडाचा पाठपुरावा करीत असताना ज्या-ज्या वेळेस मी भैय्यालाल भोतमांगे यांना भेटलो, त्यावेळेस आपले सर्वस्व हरविल्याची […]

Categories
अभिवादन

नगर जिल्ह्याचा पुरोगामी चेहरा कॉ. पी. बी. कडू पाटील

फेब्रुवारी – २०१७

ब्रिटीशकालीन राजवटीत अन्यायाविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध झगडणारं व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यानंतर प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध झगडणारं वादळ शांत झालं, असं कॉ. पी. बी. कडू-पाटील (आप्पा) यांच्या निधनानंतर वाटलं. 1942 सालच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या हाकेला ओ देऊन आप्पांनी ना. ग. गोरे, साने गुरुजी यांच्यासोबत हिरिरीने भाग घेतला. कठोर कारावासही भोगला. आप्पांनी कम्युनिस्ट पक्षाच्या साम्यवादाचा पंथ स्वीकारला. मार्क्स लेनीन यांचे […]