अनेक सामाजिक कार्यात अनेक वर्षे हिरिरीने काम करणारा व प्रसिद्धीपासून दूर राहणारा असा मिलिंद हा कार्यकर्ता. अलिबागमध्ये राजकारणाचा पिळ असणारी अनेक माणसे दिसतात; पण मिलिंद सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांशी समान जवळीक ठेवणारा एक दुर्मिळ माणूस ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अलिबाग शाखेमध्ये हा बिनीचा शिलेदार होता व संघटनेच्या कौटुंबिक सहली, मेळाव्यात बायको-मुलांसह सहभागी होई. त्यामुळेच […]
बळ देऊन गेला मिलिंद मुळे