Categories
प्रासंगिक

भीमा-कोरेगावची लढाई – एक आकलन

जानेवारी - २०१८

‘बहिष्कृत भारत’च्या १९ नोव्हेंबर १९२८ च्या अंकातील अग्रलेखात पेशवे आणि ब्रिटीश राजवट यांची तुलना करून काही निष्कर्ष मांडले आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादी दृष्टीची साक्ष देणारे आहेत. ‘हिंदूंपेक्षा इंग्रज बरे?’ या मथळ्याखाली लिहिलेल्या मजकुरात त्यांनी पेशवाईने दलितांवर लादलेल्या जुलुमाचे वर्णन करून म्हटले आहे- ‘‘त्या पेशवाईची जो अस्पृश्य अंग्लाईशी (इंग्रजांशी) तुलना करील त्याला एका संबंधाने द्वेष […]

Categories
प्रासंगिक

भीमा-कोरेगाव दंगल दलित अस्मितेवर हल्ला

जानेवारी - २०१८

भीमा-कोरेगाव मधील नियोजित हिंसक घटना ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रावरील कलंक आहे. या घटनेने समाज, सत्ता आणि माध्यमे यांचे खरे रूप आपल्यासमोर ठेवले आहे. आधुनिक युगात वावरताना जातीय अहंगंडातून युवक किती हिंसक आणि अविवेकी होऊ शकतो, याचं भयावह चित्र या घटनेने दाखवलंय. विकासाच्या वाटा दाखवणारे पक्ष आतून मात्र ही हिंसक घटना घडवून आणणाऱ्या अतिरेकी संघटनांना पाठीशी घालत […]

Categories
उपक्रम प्रासंगिक

विवेकी लघुपटांमधून जातिअंताच्या दिशेने…

वार्षिकांक - २०१७

‘जाता जात नाही ती जात’ ही जातीची नकारात्मक; पण खेदाने वास्तवदर्शी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या जातिअंताच्या लढ्यातील कार्यकर्त्यांसाठी एका प्रभावी माध्यमाची जोड देणे, हे यंदाच्या व आगामी विवेक महोत्सवाचे प्रमुख प्रयोजन होते आणि असेल. कारण जात ही संकल्पना देखील एक अंधश्रद्धाच आहे; पण या अंधश्रद्धेचा पगडा समाजमानसावर गहिरा आहे. महाराष्ट्र अंनिस व आटपाट यांनी आयोजित […]

Categories
प्रासंगिक

असेही एक मरणपत्र!

ऑक्टोबर – २०१७

लंकेश पत्रिकेतील एक संपादकीय (काही महिन्यांपूर्वी गौरी लंकेश यांनी ‘गौरी लंकेश पत्रिके’साठी लिहिलेल्या संपादकीयांचे पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशन झाले. बहुतेक अग्रलेख कर्नाटकातील राजकारणाशी संबंधित असून त्या-त्या काळच्या प्रसंगावरील टीका-टिप्पणीच्या स्वरुपात आहेत. परंतु 29 जुलै 2009 रोजी प्रकाशित झालेले संपादकीय मात्र फार वेगळ्या प्रकारचे होते. त्यांच्या पत्रिकेसाठी सदर लिहिणार्‍या एका लेखिकेच्या मृत्युनंतर गौरी लंकेश यांना आपले वडील […]

Categories
प्रासंगिक

फेक न्यूजच्या काळात

ऑक्टोबर – २०१७

गौरी लंकेश ज्या साप्ताहिकातून कट्टर हिंदुत्ववाद्यांवर कोरडे ओढत होत्या, त्याच्या 13 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकातील हे त्यांचे संपादकीय अखेरचे ठरले. या लेखाचा हा मराठी अनुवाद… आपल्या लंकेश पत्रिका नावाच्या साप्ताहिकातून कट्टरतावाद्यांवर जहाल टीका करणार्‍या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरू येथे त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि देशभरात शोक-संतापाची लाट उसळली. […]

Categories
प्रासंगिक

समकालीन झुंडशाहीचा गळफास

शहीद डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१७

अपघातात मित्राच्या आईचं निधन झाल्याचं कळालं आणि मी कोथरूडहून हडपसरला निघालो. वाटेत पाच-सहा मित्र-मैत्रिणींचे फोन आले- ‘कुठंयस, ठीक आहेस ना,’ अशी विचारणा करणारे. शेवटच्या एका फोनला मी विचारलंच ‘नक्की काय झालंय.’ त्यावर मैत्रीण म्हणाली, ‘शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त फोटो ‘पोस्ट’ केल्यामुळे तणावग्रस्त वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बसेसची तोडफोड करण्यात आलीय.’ मी फेसबुकवर […]

Categories
प्रासंगिक

9 ऑगस्ट मअंनिसचा वर्धापन दिन साजरा करा!

शहीद डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१७

सर्व शाखा व जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव यांना जाहीर आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटनात्मक कामाला रीतसर व संवैधानिक पातळीवर ऑगस्ट 1989 मध्ये सुरुवात झाली. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन महाराष्ट्र अंनिसचा वर्धापन दिन म्हणून खालील उपक्रमांपैकी शक्यतेनुसार उपक्रमातून सर्व शाखा व जिल्हा पातळीवर साजरा करावा असे जाहीर आवाहन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले […]

Categories
प्रासंगिक

अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक वाई येथे संपन्न

जुलै - २०१७

शिस्तबद्ध, सनदशीर आणि अहिंसक मार्गाने लढणार्‍या अंनिसच्या कार्यकर्त्यांसमोर आज परिस्थितीने अनेक आव्हाने उभी केली आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन अंनिसचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. अंनिसच्या वाई शाखेने यजमानपद भूषवलेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप वाईत पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. अडीच दिवस चाललेल्या या बैठकीत अंनिसच्या सर्व […]

Categories
प्रासंगिक

सहारनपूर-शब्बीरपूर दलित हल्ला धर्मांध राजकारणाचे बळी

जुलै - २०१७

हर हर महादेव, जय श्रीराम, राणा प्रताप की जय, आंबेडकर मुर्दाबाद, चमार चट्टा मुर्दाबाद देश में रहना तो मोदी मोदी कहना है, परदेश (प्रदेश) में रहना है, तो योगी योगी कहना है, अशा घोषणांचा जयघोष करीत उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील शब्बीरपूर गावच्या दलितांच्या वस्तीवर आणि संत रोहिदास मंदिरावर हजारो ठाकूरांचा जमाव नंग्या तलवारी, बंदुका, शिगा, […]

Categories
प्रासंगिक

वाघजाई देवी यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलनाचा जिवंत देखावा

जून – २०१७

सातारा जिल्ह्यातील धावडशी हे अत्यंत महत्त्वाचं गाव. दरवर्षी वाघजाईदेवीच्या यात्रेत प्रथेप्रमाणे देवीची पालखी अत्यंत दिमाखदार अशा मिरवणुकीने संपूर्ण गावात रात्री 12 ते सकाळी सहापर्यंत वाजतगाजत फिरवली जाते. यामध्ये अनेक सोंगे विविध ट्रॉली ट्रॅक्टरवर सजवली जातात. या वर्षी याला अत्यंत आगळेवेगळे व सकारात्मक प्रबोधनाचे रूप देण्याचे गावातील नवजवान मित्रमंडळ, नेहरू युवा मंडळ व सिद्धिविनायक ग्रुप या […]