महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा जिल्हा व तालुका शाखेच्या वतीने अंनिसतर्फे संपूर्ण राज्यामध्ये विविध उपक्रम विभागांतर्गत दि. 23 ते 30 मार्च दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘देहदान, अवयवदान प्रबोधन मोहीम’ अंतर्गत दि. 1 एप्रिलला येथील मुख्य स्मशानभूमीत ‘मृत्यूनंतर देहदान, अवयवदान करून मूर्तरुपाने जगण्याचा आनंद घ्या’ या आशयाच्या फलकाचं अनावरण राज्य सरचिटणीस संजय शेंडे, प्रभाग क्र. 19 चे सदस्य परवेझ खान व भीम टायगर सेनेचे विशाल रामटेके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, संस्थापक जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी परवेझ खान व विशाल रामटेके यांनी महाराष्ट्र अंनिसच्या या कार्याला सदिच्छा दिल्या.
या फलकाचे लेखन करणारे मा. अशोक जीवने यांनी यावेळी देहदानाचा संकल्प केला, त्याबद्दल त्यांच्या फलक लेखनकरिता आर्थिक मदत करणारे अंनिसचे सदस्य मा. गोवर्धन टेंभुर्णे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रधान सचिव सारिका डेहनकर यांनी केले. आभार सांस्कृतिक विभागप्रमुख संजय भगत यांनी मानले. आयोजनाकरिता रोशन माहुरे, विक्की बिजवार, डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे, भीमसेन गोटे, नितीन झाडे, सुनीता सहारे, राजेश डेहनकर, विनायक झिलपे इत्यादींनी सहकार्य केले.
-प्रकाश कांबळे, वर्धा