Categories
अघोरी प्रथा महिला

बोहरा समाजातील खतना प्रथा अमानवी – शबनम पूनावाला

जागतिक महिलादिनाच्या अनुषंगाने पुणे शहर अंनिस शाखेच्या महिलांनी ‘बोहरा समाजातील खतना प्रथा’ या विषयावर शबनम पूनावाला यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शबनम पूनावाला यांचे कुटुंब त्यांच्या सुधारणावादी विचारांमुळे बोहरा समाजातून बहिष्कृत केलेले आहे, तरीसुध्दा त्यांनी आपले सुधारणावादी विचार हिरिरीने मांडणे सोडलेले नाही. गेली काही वर्षे शबनम पूनावाला या बोहरा समाजात असलेल्या खतना प्रथेविरोधात काम करत […]

Categories
चळवळ

महाराष्ट्रभर अंनिसच्यावतीने सामाजिक समता सप्ताह संपन्न

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते, या दोन्ही महामानवाच्या जयंती निमित्त त्यांचे समतेचे विचार जनमानसात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा-शाखांत दरवर्षी सामाजिक समता सप्ताह साजरा केला जातो. या अभियानांतर्गत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजकार्याविषयी व्याख्यानाचे आयोजन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

Categories
अघोरी प्रथा

मांगीरबाबा यात्रेतील कमरेत गळ टोचून नवस फेडण्याच्या अघोरी प्रथेला न्यायालयाचा लगाम!

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

औरंगाबाद शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर शेंद्रा नावाच्या गावात दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या पंचमीला मांगीरबाबा देवस्थानच्या नावाने यात्रा भरते. येथे पाच ते सात हजार कोंबड्या, बकरांचा नवस फेडण्याच्या नावाने बळी दिला जातो. काही भाविक तर नवस फेडण्यासाठी आपल्या कमरेला गळ (चार मिलिमीटर जाडीचा लोखंडी आकडा) टोचून घेतात आणि विशेषतः कमरेतून गळ काढल्यानंतरही रक्त निघत नाही. कारण मांगीरबाबा […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

महाराष्ट्राची आली साठी, पुरोगामीत्वाची आता कसोटी !

ज्योतिष चिकित्सा विशेषांक - मे २०१९

महाराष्ट्र राज्य निर्मितीला 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होणार आहेत. म्हणजे आताच्या 1 मे 2019 रोजी आपले राज्य साठाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. मराठी भाषिकांना भाषावार प्रांत रचनेतुन मिळालेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासुन साठ वर्षातील वाटचालीचे अवलोकन होणे गरजेचे वाटते. त्याच दरम्यान ऑगस्ट 2019 मध्ये आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देखिल तीस वर्षे पूर्ण […]

Categories
संपादकीय

पाऊल पडले पुढे!

एप्रिल २०१९

फेब्रुवारी महिन्यात सांगली जिल्ह्यात संपूर्ण समाजाने जिचे कौतुक करावे, अशी घटना घडली. 24 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्यातील शिरगाव येथील वीस वर्षांच्या विधवा सोनाली संतोष पाटील हिचा, सासू राजश्री आणि सासरे शांताराम पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांचा धाकटा मुलगा उमेश याच्याशी पुनर्विवाह घडवून आणला. सोनालीचे पती काविळीने आजारी पडले; त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले. त्यावेळी त्यांची […]

Categories
भांडाफोड

उघडेबाबाचे पलायन

एप्रिल २०१९

के.ई.एम. हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये सुरू होता दरबार दिनांक 4 ऑक्टोबर 2018 रोजी ‘झी 24 तास’ वाहिनीवर केईएम रुग्णालयात अस्थिभंग उपचार विभागामागे चालत असलेल्या भोंदू उघडेबाबा ऊर्फ मनोहर खंडू साळुंके याची भोंदूगिरीची बातमी थडकली. हा बाबा 1987 पासून ‘केईएम’सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयामध्ये ठाण मांडून होता. दर गुरुवारी अमावस्या-पौर्णिमेला तिथे दरबार भरायचा. त्यात तो तोडगे, अवैज्ञानिक उपाय सुचवायचा. वरील […]

Categories
भांडाफोड

हजरतच्या दैवी शक्तीचे आमिष दाखवून दोन मुलींवर बलात्कार

एप्रिल २०१९

कॉलेजचा अभ्यास अवघड जात असल्याने मुलगी कॉलेजला सतत गैरहजर राहत होती, या कारणास्तव त्या मुलीला कॉलेजच्या परीक्षेला बसता आले नाही. या गोष्टींमुळे आई बेचैन झाली. आपल्यावर काहीतरी संकट कोसळले अथवा मुलीला काहीतरी बाधा झाली आहे, या समजुतीने कोंढवा (पुणे) येथील एका दैवी शक्तीवाल्या महिलेकडे घेऊन गेली. या दैवी शक्तीवाल्या महिलेने दैवी शक्तीची भीती दाखवून या […]

Categories
बुवाबाजी

भोंदूबाबाने पुत्रप्राप्तीसाठी सात लाख रुपये घेऊन महिलेस फसविले

एप्रिल २०१९

नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये मुकेश ऊर्फ बाबा टिल्लू डांगोरे (वय 62, रा. रामनगर) व रजनी माहुले (वय 35, रा. बुद्धनगर) यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली व पोलीस कोठडीत टाकले. तंत्रमंत्र आणि जादूटोणा या उपचाराने पुत्रप्राप्ती करून देतो यासाठी मुकेश ऊर्फ टिल्लू बाबाने साथीदार महिलेच्या मदतीने पीडित महिलेकडून 7 लाख रुपये उकळण्याची […]

Categories
बुवाबाजी

मुलाचा रोग दैवी शक्तीने बरा करण्याच्या बहाण्याने शास्त्रज्ञाच्या पत्नीवर बुवाचा बलात्कार

एप्रिल २०१९

ट्रॉम्बे पोलीस सध्या उज्जैन येथील एका भोंदूबाबाचा शोध घेत आहेत, ज्याने मुलाचा कॅन्सर बरा करण्याचा बहाणा करत चेंबूर येथील 41 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने दांपत्याकडून 3.5 लाख रुपये लाटले. कॅन्सरग्रस्त 10 वर्षीय मुलाचा गतवर्षी मृत्यू झाला असून दांपत्याने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे दांपत्य उच्चशिक्षित असून […]

Categories
भानामती

अंगावर गोटे पडणारी भानामती अंनिसच्या प्रबोधनाने पडली बंद

एप्रिल २०१९

वर्धा येथे शिक्षण घेण्यासाठी महादेव तोटे (नाव बदलले संपूर्ण कुटुंबाचे) यांची लहान मुलगी वर्ग 6 मध्ये शिकत असलेली, छोटा मुलगा जो बालवाडीत शिकतो व भावाची मुलगी जी बी.एस्सी.च्या प्रथम वर्षाला; गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्याला आहे. अचानक सहा महिने आधी वर्ग 6 मध्ये शिकत असलेल्या मुलीच्या अंगावर गोटे पडण्याचे प्रकार घडू लागले, तर कधी-कधी घरावर […]