Categories
भानामती

नांदेड येथे शाळेमध्ये आग लागणारी भानामती अंनिसने केली बंद

एप्रिल २०१९

नांदेड जिल्ह्यातील देगलूर या तालुक्याच्या ठिकाणी सुरेश जाधव यांची जी प्लस टू (G + 2) बंगला टाईप बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये त्यांची स्वत:ची अक्षरधाम नावाची शाळा आहे. शाळेत जवळपास 150 विद्यार्थी संख्या आहे. तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर शाळेचे वर्ग आहेत. तसेच पहिल्या व तळमजल्यावर त्यांचे जवळचे नातेवाईक सहकुटुंब राहतात. तळमजल्यावर एक जोडपं व त्यांचा 23 वर्षीय […]

Categories
जात पंचायत

अंनिसच्या प्रयत्नाने रमेश धुमाळ यांच्यावरील गोंधळी जातपंचायतीचा बहिष्कार मागे

एप्रिल २०१९

देवळी (जि. वर्धा) येथील रहिवासी असलेले गोंधळी जोशी समाजातील रमेश धुमाळ यांच्यावर बहिष्कृत कुटुंबातील मुलगी केल्याचा ठपका ठेवून 9 वर्षांआधी रायपूर, छत्तीसगड येथे भरलेल्या जातपंचायतीने 5 हजार रुपये दंड व संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकलेला होता. दि. 13 मार्चला कळमेश्वर (जि. नागपूर) येथे भरविलेल्या महाजातपंचायतीने रमेश धुमाळ व इतरही कुटुंबांवर एकमताने घातलेला बहिष्कार मागे घेत यापुढे […]

Categories
डाकिण प्रथा

डाकीण हत्यामध्ये बळी पडलेल्या महिलांच्या सन्मानार्थ ओडिशा पोलिसांनी उभे केले अनोखे स्मारक

एप्रिल २०१९

भुबनेश्वर/केओंझर : आपली आई नथी मुंडा हिच्यावर सप्टेंबर 2017 रोजी केओंझर क्षेत्रातील ऊरुमुंडा येथे झालेल्या भयानक हल्ल्याची माहिती सांगताना दुखीनी मुंडा अजूनही थरथर कापतात, त्यांचा आवाज मधूनच तुटतो. माझी आई स्वयंपाक करत होती. मी परसदारी नांगरणी करीत होतो, त्यावेळी मी गलका ऐकला. मी धावत आत आलो आणि पाहतो, तर शेजारच्या खेड्यातील तीन माणसे माझ्या आईला […]

Categories
युवा मानस

‘डिप्रेशन’च्या जाळ्यात युवा पिढी

एप्रिल २०१९

मनाचा फ्लू : ‘स्वाईन फ्लू’च्या साथीमुळे सध्या फ्लूचा आजार सर्वत्र चर्चेमध्ये आहे. फ्लू हा बहुतांश वेळा स्वत:च स्वत: बरा होणारा आजार आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोळ्यांतून पाणी येणे अशी त्याची लक्षणे आपण सर्वांनी अनेक वेळा अनुभवली आहेत. आपल्यातील बहुतांश लोकांना वर्षातून एकदा तरी फ्लू होतो, मग त्या योगाने दोन-तीन दिवसांची सक्तीची विश्रांती मिळते. जे […]

Categories
संविधान

संविधान : धर्मस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता

एप्रिल २०१९

धर्माच्या दोन बाजू ‘धर्म’… एक अत्यंत संवेदनशील बनलेली संकल्पना. इतिहासातील काही हजार वर्षे या संकल्पनेने मानवी जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकली आहेत. अफाट सामर्थ्याच्या निसर्गासमोर क:पदार्थ असणार्‍या भयभीत माणसाला समूहशक्तीचा दिलासा धर्माने पुरवला. कष्ट आणि दुःख यांनी व्यापलेले माणसाचे आयुष्य साहित्य, संगीत, शिल्प, वाद्य, नाट्य, नृत्य अशा कलांचा आधार बनून रसपूर्ण बनवले. सण, उत्सवांच्या माध्यमातून […]

Categories
विज्ञान

‘डिझायनर्स बेबी’चे (दुः) स्वप्न

एप्रिल २०१९

त्या चिनी वैज्ञानिकाचे नाव हे जियांक्वी. वय सुमारे 35 वर्षे. दोन महिन्यांपूर्वी वैज्ञानिक जगाला त्यांनी फार मोठा धक्का दिला. एका गर्भिणीच्या भ्रूणामधील जनुकं बदलून त्यांनी केलेल्या प्रयोगामुळे चक्क जुळी मुलं जन्माला आली. या जनुकबदलाच्या यशस्वी प्रयोगाची घोषणा त्यांनी केल्यानंतर वैज्ञानिक अवाक् झाले. त्यांनी घोषित केलेली किमया कदाचित फार मोठी नसेलही; परंतु मानवी पेशीतील जनुकबदल न […]

Categories
नाट्य-चित्र परिक्षण

हिंदू कोड बिल – एक नाटक

एप्रिल २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लेख! सध्या रंगभूमीवर हिंदू कोड बिल हे नाटक गाजते आहे. हिंदीतील सुप्रसिध्द नाटककार राजेश कुमार यांनी लिहिलेले प्रमोद नवार यांनी अनुवादित केलेले; तसेच संजय खिलारे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक निर्माते मनोहर एस. पवार यांनी आपल्या ‘स्पंदन थिएटर’ तर्फे रंगभूमीवर आणले आहे. आजकाल समाजप्रबोधनपर गंभीर आशय असलेल्या नाटकांना सहसा कोणी […]

Categories
संतविचार

शेंदरी हेंदरी दैवते…

एप्रिल २०१९

अंधश्रद्धेच्या विरोधात वारकरी संतांनी मोठ्या प्रमाणात जनजागरण केल्याचे दिसून येते आहे. त्यातून समाज मोठ्या प्रमाणात जागृत होत होता; किंबहुना अधिक धाडसाने विधान करायचे झाले तर महाराष्ट्रात ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्यांच्या मुळाशीसुद्धा संतविचार होता, असे म्हणायला मोठा वाव आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अनेक व्याख्यानांत संतांची वचने पाहायला मिळत होती. संतांनी विवेकाचा अखंड जागर केला. […]

Categories
अभिवादन

डॉ. विठ्ठल प्रभू यांना विनम्र आदरांजली!

एप्रिल २०१९

डॉ. विठ्ठल प्रभू आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संबंध सुरवातीपासून अगदी समितीच्या स्थापनेपासून अतिशय जवळचे होते. समितीने आयोजित केलेल्या अनेक परिषदांमध्ये, कार्यक्रमातून, शिबिरातून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. अंनिस वार्तापत्राशी तर त्यांचे खास संबंध होते. वार्तापत्राच्या नेहमीच्या अंकात ते वेळोवेळी लिहित असायचेच पण वार्षिक अंकातही त्यांचे लिखाण असायचे. आसारामबापूंनी लैंगिकतेबद्दल काही अवैज्ञानिक दावे केले होते. […]

Categories
मंथन

चूप!..‘शास्त्र’असतं ते…

एप्रिल २०१९

विविध प्रकारच्या अनिश्चितता घोंघावत असतात रोज आपल्या मनोविश्वात… कामावर, ऑफिसमध्ये गेलेला आपला नवरा सुखरूप रात्री घरात परत येईल का? त्याचा कुठे काही अ‍ॅक्सिडेन्ट वगैरे होणार नाही ना? नोकरी टिकेल का? उद्योगधंद्यात तोटा ओढवेल का? आईला /वडिलांना हार्ट अटॅक आला तर किंवा लकवा मारला तर? नोकरी गेली तर? बायकोचं बाळंतपण सुखरूप होईल का? भावाचं, बहिणीचं लग्न […]