Categories
उपक्रम

‘होळी करा लहान, पोळी करा दान!’ अंनिसच्या आवाहनास महाराष्ट्रभर उत्तम प्रतिसाद!

एप्रिल २०१९

शाखा : मुंबई महाराष्ट्र अंनिसने मुंबईत राबवलेल्या ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ उपक्रमाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी ग्रँट रोड ते विरारपर्यंत सोसायटीतून स्वतःहून फोन करून नागरिकांनी होळीचा नैवेद्य म्हणून जाळल्या जाणार्‍या पोळ्या वाचवून कार्यकर्त्यांना दिल्या. दहिसरची रिझर्व्ह बँक सोसायटी, दहिवली सोसायटी यांनी नैवेद्यासाठी स्वतंत्र भांडे ठेवून त्याला ‘नैवेद्य कुंड’ असे नाव दिले होते. […]

Categories
उपक्रम शाखा वार्ता

महाराष्ट्र अंनिस नागपूर जिल्हा शाखेने 14 स्मशानभूमींमध्ये देहदानाचे संदेश फलक लावले

एप्रिल २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर जिल्हा शाखेने देहदान आणि अवयवदान यासंदर्भात जनतेपुढे आवाहन ठेवलेले आहे, काही सामाजिक विषय असे असतात की, ज्याबद्दल लोकांमध्ये जागृती होण्यासाठी पुन्हा-पुन्हा लिहिणे गरजेचे असते. मानवी जीवनाइतके अमूल्य दुसरे काही असू शकत नाही. हा अमूल्य ठेवा वाचविण्याकरिता अवयवदान ही वैद्यकशास्त्राने मानवी जीवनाला दिलेली अमूल्य देणगी आहे, हे लोकांना कळावे, यासाठी महाराष्ट्र […]

Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

जेवढं पुण्य चारधामाचं, त्याहून अधिक चार दानाचं!

एप्रिल २०१९

5 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन 1. रक्तदान ‘अमूल्य तुमचे रक्तदान वाचविते रुग्णांचे प्राण’ 1) वय 18 ते 60 वर्षांपर्यंतची किमान 45 किलो वजन असणारी कोणतेही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. 2) रक्तदात्याचे हिमोग्लोबिन साधारणत: 12.5 ग्रॅम असावे. रक्तदान करतेवेळी वेदना; तसेच नंतर अशक्तपणाही वाटत नाही. 3) दिलेले रक्त केवळ 24 तासांत आपोआप भरून निघते. […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

हिशोब त्रिदशकाचा, संघटित भविष्यवेधाचा

एप्रिल २०१९

‘संवैधानिक लोकशाही प्रजासत्ताका’ची निवडणूक अंधश्रद्धा निर्मूलन संघटित कार्याचा सलग 30 वर्षांच्या वर्धिष्णु वाटचालीचा वस्तुपाठ जगापुढे उभे करणार्‍या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून माझ्यात आनंद, अभिमान आणि समाधानाची भावना आहे. त्यात आता आपल्या संघटित कार्याच्या वाटचालीचे त्रिदशकपूर्ती वर्ष साजरे करायचे आपण ठरविले असताना, तर मी विविधांगी भावना, विचार व अनुभवांना सामोरे देखील जातो […]

Categories
जात पंचायत

भिल्ल समाजाची जातपंचायत बरखास्त; जिल्हाधिकारी, ‘अंनिस’समोर पंचांचा निर्णय

एप्रिल २०१९

एका जोडप्याला बहिष्कृत करण्याच्या निर्णयानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कायद्याचा बडगा उगारताच निलंगा (जि. लातूर) येथील भिल्ल (मसनजोगी) समाजाची जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय पंचांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत घेतला. यावेळी जात पंचायत बरखास्त करीत असल्याचे प्रतिज्ञापत्रही पंचांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. निलंगा येथील भिल्ल समाजाची 13 मार्च रोजी जात पंचायत भरविण्यात आली […]

Categories
अनिष्ट रुढी - परंपरा

उच्च न्यायालयाचा निकाल : अनिष्ट रुढी, परंपरांवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार

एप्रिल २०१९

भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 व 19 अन्वये दिलेल्या अधिकाराचा पुनरुच्चार करत उच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तुतारी फुंकली. नागरिकांना पुराणकथा, अनिष्ट रुढी, परंपरा, अंधविश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा अधिकार आहे. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे वैचारिक उत्क्रांतीला पायबंद घालण्यासारखे असल्याचे मत न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभाग कंकणवाडी यांच्या खंडपीठाने मांडले. समाज माध्यमांवरील पोस्टवरून दाखल […]

Categories
पुनर्विवाह

सासूनेच करून दिला विधवा सुनेचा पुनर्विवाह

एप्रिल २०१९

आयुष्याच्या जोडीदाराची गाठ बांधली जाते. मात्र हीच गाठ अपघाताने हिरावून घेतली तर काय करायचे याचे उत्तर कोणाकडेच नसते. समाजातील परंपरांच्या जोखडातून, सगळी बंधनं तोडीत शिरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील राजश्री पाटील यांनी आपल्याच विधवा सुनेचा पुनर्विवाह आपल्याच मुलाशी करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या या निर्णयाचं समाजात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महिला महिलांचं दु:ख […]

Categories
संपादकीय

राजस्थानात सरकारी ज्योतिषी

मार्च २०१९

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. राजस्थान सरकारने घोषणा केली आहे की, जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलांची कुंडली सरकारतर्फे काढून देण्यात येईल. त्यासाठी ज्योतिषांना सरकारकडून या कामाचा मोबदला दिला जाणार आहे. ही बातमी खरी असेल, तर तिचं गांभीर्य आपण ओळखायला हवे. देशपातळीवर अशा छद्म विज्ञानाविरोधात कसा उठाव करता येईल, त्याबाबत पावलं टाकली पाहिजेत. भारतातील विवेकवादी वैज्ञानिक आणि […]

Categories
कव्हर स्टोरी

नंदूरबारमध्ये आदिवासी महिलेचा डाकीण ठरवून खून…

मार्च २०१९

तू डाकीण आहेस, माझ्या मुलाला मंत्र-तंत्राने आजारी पाडलंस… तुला मी राहू देणार नाही… अशी धमकी देत सुकलाल पावराने स्वत:च्या सख्ख्या भावजयीचा चिकीबाईचा डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून निर्घृण खून केला. ही घटना जुन्या पुरातन काळाची नसून ज्या दिवशी जगभर ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे जागतिक प्रेमदिवस साजरा केला जात होता, त्याच 14 फेबु्रवारीला महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असलेल्या […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

डाकीण प्रश्नावर आक्रमक प्रबोधन करण्याची गरज

मार्च २०१९

शासन प्रशासनासह आदिवासी समाजातील शिक्षित व युवांची जबाबदारी महत्त्वाची धडगावलगतच्या वडफळी गावात चिकीबाई या 53 वर्षीय महिलेचा डाकीण ठरवून नुकताच खून करण्यात आला. कुटुंबातीलच असणार्‍या व नात्याने दीर असलेल्या सुकलाल पावराने आपल्याच वहिनीचा डाकीण ठरवून खून केल्याचे पोलीस जबाबात कबूल केले आहे. भारतीय दंडविधान कलम 302 व महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत खुनाची नोंद धडगाव पोलीस स्टेशनमध्ये […]