सांगली अंनिसने एका विचित्र भानामतीची केस सोडवली. एका तीन वर्षांच्या बालकाच्या अंगावर अचानक चटणी पावडर पडायची, बालकाच्या ढुंगणाला चटणीचा लेप लागायचा. पाठीवर ओरखडे उठायचे. दारात हळद-कूंकू, लिंबू-मिरची, करणीची परडी, मुलाच्या कपड्याची बाहुली पडायची. बाहुलीवर सुई टोचून मुलाचा व आई-वडिलांचा फोटो लावलेला होता. त्या मुलाच्या आईच्या हातावर मागील आठवड्यात अचानक ओरखडे उठले होते. हा सर्व प्रकार […]