Categories
आंदोलन

कोल्हापूरचा ‘निर्भय मॉर्निंग वॉक!’

ऑगस्ट २०१८

कोल्हापूर पुरोगामी आहे का, हा वादाचा मुद्दा आहे; पण इथले पुरोगामी मूठभर असले की, निर्भयपणे प्रतिगाम्यांशी सामना करतात, एवढे खरे! न्यूज चॅनेलवरील एका चर्चेत सनातन्यांच्या वकिलाने निर्लज्जपणे धमकी वजा इशारा दिला, “मॉर्निंग वॉक करत चला.” त्याला शहीद डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील भ्याड, खुनी हल्ल्याची पार्श्वभूमी होती, असे वक्तव्य केले. मॉर्निंग वॉकवेळी त्यांच्यावर […]

Categories
जट निर्मूलन

नेसरीतील वृद्ध महिला झाली जटमुक्त

ऑगस्ट २०१८

गडहिंग्लज अंधश्रद्धा निर्मूलन शाखेच्या सहकार्याने नेसरी येथील अंनिस शाखेतर्फे श्रीमती विठाबाई लक्ष्मण कांबळे (वय 70) या वृद्धेची जटा काढण्यात आली. नेसरी शाखेचे हे तिसरे जटानिर्मूलन ठरले. येथील शाखेचे कार्यकर्ते टी. बी. कांबळे यांनी विठाबाई यांते मतपरिवर्तन केले. त्यानुसार येथील नेसरी वाचन मंदिरात हा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे यांनी प्रारंभी मार्गदर्शन करून जट हा […]

Categories
व्यक्तिविशेष संवाद

वाटचाल सुरूच राहील… अखंडितपणे!

ऑगस्ट २०१८

आदरणीय डॉक्टर, पुन्हा एकदा आपणाशी पत्रसंवाद. तुम्हाला मागेच म्हटल्याप्रमाणे आम्हा सर्वांचा संवाद तर सुरूच असतो ना डॉक्टर तुमच्याशी. संघटनेत काम करताना अनेकदा असे प्रसंग येतात की, मन आपोआप तुमच्याशी संवादी होतं आणि विचारतं तुम्हाला…. ‘आता तुम्ही राहिले असते, तर काय केलं असतं?’ हे फारच स्वप्नाळू वाटेल डॉक्टर….. पण तुम्ही सोबत असल्याची भावना आजही तशीच आहे […]

Categories
व्यक्तिविशेष

ब्रूनो, गॅलिलिओ ते दाभोलकर

ऑगस्ट २०१८

गेल्या एप्रिलमध्ये ‘फाल्कन 9’ हे नासाने सोडलेले रॉकेट अंतराळात झेपावले. या रॉकेटमधून प्रक्षेपित उपग्रह सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहांबाबतची माहिती मिळवणार आहे. खगोल वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की, सूर्याप्रमाणेच इतर तार्‍यांच्या कक्षेत पृथ्वीसारखेच ग्रह फिरत आहेत. आतापर्यंत अशा 3700 सूर्यमालाबाह्य ग्रहांचे अस्तित्व खगोल अभ्यासकांना माहीत झालं आहे. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार अशा ग्रहावर जीवसृष्टीही असू शकेल. खगोलविज्ञानात मांडलेल्या अवकाशातील […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही तयार!

ऑगस्ट २०१८

प्रिय साथी, येत्या 20 ऑगस्ट रोजी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचे अध्वर्यु शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पाचवा स्मृतिदिन आहे. त्या आधी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंनिसच्या त्रिदशकपूर्ती वर्षाची सुरुवात होत आहे. या दोन्ही महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही ‘कार्याध्यक्षाची डायरी’ लिहित आहे. मित्रहो, या दोन्ही घटनांत आपण एक महत्त्वाचा टप्पा पार करीत आहोत. आपल्या नेत्याचा खून […]

Categories
वैज्ञानिक दृष्टिकोन

देशभर 20 ऑगस्टला साजरा होणार राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस

ऑगस्ट २०१८

‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ने देशभरात 20 ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भातील ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’चे समन्वयक डॉ. विवेक मॉन्टेरो यांचा लेख देत आहोत. 20 ऑगस्ट 2013 रोजी भारतभरातले लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते बंगळुरूमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ येथे एका राष्ट्रीय कार्यशाळेसाठी जमले होते. तेव्हाच […]

Categories
वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेताना…

ऑगस्ट २०१८

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन (20 ऑगस्ट) हा देशभर ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा होत आहे. तो ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आहे तरी काय? हे समजावून घेण्यासाठी डॉ. दाभोलकरांचा यावरील ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकातील लेख येथे पुर्नमुद्रित करीत आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनाची महत्ता कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ अशी […]

Categories
वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक

ऑगस्ट २०१८

आपल्याकडे अडाणी, अल्पशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित सर्वजण वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यात आणि बाळगण्यात सारखेच अडाणी आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतो. ज्यांना माहीत असतो; ती जीवनातील घटनांना कार्यकारणभावाचे सूत्र सहसा लावत नाहीत. विचार करण्याची पद्धत म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला, तरच ही कोंडी फुटू शकते. यासाठी शिक्षणक्षेत्रात डायरेक्ट प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या अवघा अठरा वर्षांचा […]

Categories
व्यक्तिविशेष

धर्मांध शक्तींविरोधात लढण्याची प्रेरणा देणारा प्रा. एन. डी. पाटील सरांचा कृतज्ञता सोहळा

ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष, अंनिसच्या आजपर्यंतच्या वाटचालीचे साक्षीदार, मदतनीस आणि नेतेही. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या भाषेत सांगायचे, तर ‘फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड!’ अशा प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांचा 15 जुलै हा 90 वा जन्मदिवस! अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निर्णय घेतला यावर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करायचा; पण वाढदिवस वगैरे समारंभापासून एन. डी. सर नेहमीच […]

Categories
पुरस्कार

परिवर्तनाचा विचार पुढे घेऊन जाणे हेच सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य – डॉ. बाबा आढाव

ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र अंनिसचा पहिला प्राचार्य डॅडी देशमुख स्मृती पुरस्कार सर्पमित्र बाळ काळणे यांना प्रदान समाजाची वाटचाल तपासण्यासाठी चिंतनशीलता व कलात्मक सर्जनशीलता हे मापदंड असताना आज ती दुर्लक्षित होत असल्याची खंत प्रसिध्द विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी अकोला येथे व्यक्त केली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व डॅडी देशमुख परिवाराच्या वतीने पहिला प्राचार्य डॅडी देशमुख स्मृती विदर्भस्तरीय कार्यकर्ता […]