Categories
उपक्रम

वटपौर्णिमेदिवशी विधवा महिलांचा सन्मान अंनिस अलिबाग शाखेचा अभिनव उपक्रम

सप्टेंबर - २०१८

अंनिसच्या अलिबाग शाखेने यावर्षी काहीतरी नवीन आणि समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे ठरले आणि लक्षात आले. सावित्रीच्या भूमिका जगणार्‍या अनेक महिलांना अकाली वैधव्याला सामोरे जावे लागते आणि नंतरच या सावित्रीचा संसार संघर्ष सुरू होतो. अशा महिलांच्या संघर्षाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा, या विचाराने कार्यक्रम ठरला आणि तयारी सुरू झाली. स्थानिक पेपरला बातमी दिली. अनेक मान्यवरांनी बातमी […]

Categories
शाखा वार्ता

सोलापुरात मअंनिस राज्यस्तरीय महिला कार्यकर्ता शिबीर

सप्टेंबर - २०१८

महाराष्ट्र अंनिसच्या कामात पुरुषांबरोबर महिलाही सहभागी असतात. हा सहभाग देताना महिला कार्यकर्त्यांना येणार्‍या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रबोधनाचे निरनिराळे मार्ग दाखवून त्यांचा सहभाग व काम वाढविण्यासाठी राज्य महिला सहभाग विभागातर्फे राज्यव्यापी महिला कार्यकर्ता शिबीर आयोजित करण्यात आले होते. सोलापूर येथील हिराचंद नेमचंद मंगल कार्यालयात दि. 28 व 29 जुलै रोजी हे शिबीर […]

Categories
उपक्रम

जातिप्रथांविरुद्ध बनवा लघुपट, माहितीपट व अ‍ॅनिमेशन पट

सप्टेंबर - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मितीतर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे “विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा” घेण्यात येणार आहे. या वर्षी ‘जातिप्रथा आणि त्यांच्या विविध समस्या’ हा विषय लघुपट स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या […]

Categories
आंदोलन

म.अं.नि.स.चे पंजाब व दिल्ली येथे ‘जबाब दो’ आंदोलन

सप्टेंबर - २०१८

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 20 ऑगस्ट 2018 रोजी पाच वर्षे पूर्ण होऊनही तपास यंत्रणा त्यांच्यामागील प्रमुख सूत्रधार कोण यांच्यापर्यंत पोचण्यात अपयशी ठरली. या अक्षम्य विलंबाची कारणे काय आहेत? यांना कोणी मारले, का मारले? हे प्रश्न घेऊन केंद्र व राज्य सरकारनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी याबाबत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत व जिल्ह्यातील शाखांच्या मध्ये 20 […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

…तर पुरोगामी महाराष्ट्राचे तालिबीकरण होईल!

सप्टेंबर - २०१८

महाराष्ट्र अंनिसला सन 2000 पासूनच ‘सॉफ्ट टारगेट’ म्हणून विरोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र अंनिस करीत असलेल्या विधायक व कृतिशील चिकित्सेचा भाग म्हणून सण-उत्सवांना कालसुसंगत पर्याय देणार्‍या उपक्रमांविरोधात विखारी, अनैसर्गिक दाव्यांची प्रचार मोहीम राबविली. गणेशोत्सवातील निर्माल्य दान व विसर्जित मूर्ती दान, फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी-धुलिवंदन-रंगपंचमी, नागपंचमी निमित्त सर्पविज्ञान प्रबोधनपासून आताचे बकरी ईद निमित्त हिंदू-मुस्लिमांचे रक्तदानपर्यंत जवळपास […]

Categories
संपादकीय

विवेकवादी समाज घडविण्याच्या स्वप्नाच्या दिशेने…

ऑगस्ट २०१८

20 ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहिदत्वाला पाच वर्षे पूर्ण होतील. अजूनही त्यांच्या; तसेच कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या खुन्यांचा पत्ता तपास यंत्रणांना लागलेला नाही. न्यायालयीन दबाव असूनही तपास ‘जैसे थे’ असल्यासारखी परिस्थिती आहे. सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण या संघटनांच्या साधकांची नावे आरोपपत्रात नमूद असूनही त्या संघटनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या संदर्भातला […]

Categories
डॉ. दाभोलकर खून तपास

खून तपास “जैसे थे”

ऑगस्ट २०१८

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’ घेताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला 20 ऑगस्ट 2018 रोजी पाच वर्षेपूर्ण होत आहेत. पाच वर्षांनंतर देखील डॉ. दाभोलकरांचे खुनी पकडण्यामध्ये तपास यंत्रणांना यश आलेले नाही. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर पुरोगामी कार्यकर्ते व विचारवंतांच्या खुनाची मालिकाच सुरू झालेली आहे व जोपर्यंत मारेकरी व त्यामागील […]

Categories
उपक्रम

विवेक व्याख्यानमालेचा ‘नाशिक पॅटर्न’

ऑगस्ट २०१८

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा 20 ऑगस्ट 2013 ला पुणे येथे पुलावर ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असताना खून झाल्यावर देशातील पुरोगामी डाव्या आणि विवेकवादी कार्यकर्त्यांच्या व देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पण तो संताप विध्वंसक न बनता विधायकतेकडे वळविण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले. यात डॉ. दाभोलकरांनी रुजविलेल्या विवेकवादी मूल्यांचा मोठाच वाटा होता. तो वारसा घेऊन […]

Categories
उपक्रम

वर्ध्याच्या अभ्यासवर्गाची अर्धशतकी वाटचाल

ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अथक परिश्रमातून संपूर्ण महाराष्ट्रात गाव, तालुका, शहर, जिल्हा अशा विविध शाखांमधून फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये रुजविण्यासाठी कार्यरत असणारी विवेकवादी चळवळ आहे. 20 ऑगस्ट 2013 ला विचारांचा प्रतिवाद विचाराने न करता आलेल्या विकृत माथेफिरूने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या केली. प्रत्येक शाखेतील कार्यकर्त्यांच्या, […]

Categories
आंदोलन

पुण्याच्या पुलावर 59 महिने अखंड चाललेले आंदोलन

ऑगस्ट २०१८

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निर्घृण खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले. पुण्यात खून झाल्यामुळे, पुण्यात त्याचे विशेष पडसाद उमटणे स्वाभाविक होते. कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची न होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम तेवढ्याच हिरिरीने पुढे चालू राहावे, यासाठी काही पावले उचलणे आवश्यक […]