Categories
अघोरी प्रथा

पशुबळीला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांवर भक्तांचा प्राणघातक हल्ला!

मे - २०१८

हरंगुळ (ता. जि. लातूर) येथील मरिआईसमोर गाभण मेंढीचा ‘जळ’ या प्रथेनुसार बळी दिला जातो. या प्रथेला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते अंगद कांबळे यांच्यावर देवीच्या भक्तांनी प्राणघातक हल्ला केला. याच्या निषेधार्थ आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी अंगद कांबळे यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्याला अंनिस लातूरने जाहीर पाठिंबा दिला. पोलीस आरोपींना पाठीशी घालत […]

Categories
संपादकीय

जात पंचायतींना दणका

एप्रिल - २०१८

भारतीय राज्यघटनेत सर्व सज्ञान व्यक्तींना विवाहाचे स्वातंत्र्य दिलं आहे; पण प्रत्यक्ष व्यवहारात विविध जाती धर्माच्या व्यवस्थेत व्यक्तीच्या या स्वातंत्र्याला मान्यता नाही. जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन विवाह करणार्‍या जोडप्यांना उत्तर भारतात खाप पंचायतीसारख्या संघटना अमानुष शिक्षा देतात. महाराष्ट्रातही जातपंचायती या आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना क्रूर शिक्षा ठोठावतात. नाशिकमध्ये जोशी समाजातील आंतरजातीय विवाह करणार्‍या एका मुलीला तिच्या बापानेच […]

Categories
कव्हर स्टोरी

विज्ञाननिष्ठेचा कळसस्टीफन हॉकिंग

एप्रिल - २०१८

धर्मावर आधारित विश्वरचनेची कल्पना विज्ञानाच्या प्रकाशात चुकीची ठरत असेल, तर धार्मिक नेत्यांनी तसं मान्य करायला हवं; पण धर्म आपला हटवादीपणा सहसा सोडत नाही. धार्मिक सत्तेचा जनमनावरील प्रभाव कायम राहावा, या हेतूने संबंधित सत्ताधारी मग विचारवंतांना आणि वैज्ञानिकांना आदेश देतात. असाच आदेश 1964 मध्ये पोपने पाश्चिमात्य वैज्ञानिकांना काढला. त्यांनी शास्त्रज्ञांची बैठक बोलावून सर्वांना इशारा दिला की, […]

Categories
अभिवादन

डॉ. रखमाबाई : पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर

एप्रिल - २०१८

भारतातील पहिल्या डॉक्टर म्हणून डॉ. आनंदीबाई जोशी प्रसिद्ध आहेत. आनंदीबाईंनी इंग्लंडला जाऊन डॉक्टरची पदवी घेतली; पण त्या वैद्यकीय सेवा करू शकल्या नाहीत. त्यानंतर डॉ. रखमाबाईंनी इंग्लंडला जाऊन डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आणि भारतात येऊन 1895 ते 1931 अशी प्रदीर्घ काळ रुग्णसेवा केली. त्यापूर्वी स्त्रीच्या एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याच्या हक्कासाठी त्यांनी पराकोटीचा संघर्ष केला. त्यांचा हा […]

Categories
प्रासंगिक

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि सातार्‍यातील आंदोलन

एप्रिल - २०१८

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी मला समजली आणि मी एकदमच भूतकाळात गेलो. प्रथमत: माझ्यावरील संस्काराचा भाग म्हणून मी शंकराचार्यांना आदरांजली वाहतो. याच शंकराचार्यांशी संबंधित ते 1980-1981 च्या सुमारास ते सातार्‍याला असतानाच्या माझ्याशी संबंधित काही घटना आता सद्य:स्थितीत मांडाव्याशा वाटल्याने त्या लिखित स्वरुपात मांडत आहे. कांची कामकोटी पीठाचे स्वामी […]

Categories
उपक्रम

ग्रंथदिंडीचे वारकरी : पेंडसे काका

एप्रिल - २०१८

पिंपरी चिंचवड मधलं पेंडसेकाकांचं घर! आम्ही अंनिस संबंधातल्या गप्पा मारत होतो. काका चहा आणायला आत गेले, आणि टेबलावरचा फोन वाजला. फोन उचलला. “आमच्या घरी सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रम आहे, आपण येऊ शकाल काय?” ओळख न विचारता कॅसेट सुरू झाली, तेव्हा मी म्हटलं, “थांबा हं, काका कामात आहेत, पाच मिनिटांनी फोन करा.” तेवढ्यात चहा आला. मी म्हटलं, […]

Categories
प्रासंगिक

पुतळे निर्जीव असतात काय?

एप्रिल - २०१८

त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीचे सरकार पराभूत होऊन भाजपप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीची ही एक सर्वसाधारण परंपरा आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका होऊन सरकारे बदलली जातात किंवा जुनीच सरकारे सत्तेवर परत येतात. भारतीय जनतेला राज्यघटनेने बहाल केलेला हा मौलिक अधिकार आहे. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर ते ज्या […]

Categories
फसवे विज्ञान बुवाबाजी

रेडिएशन पॉवरने पैसे ओढणारे भांडे : या फसवणुकीतून एका पैलवानाचा खून

एप्रिल - २०१८

मानवी दैनंदिन जीवन विज्ञानाने व्यापले आहे. त्याचबरोबर आधुनिक जीवनशैलीबरोबर आधुनिक बुवाबाजी फसवे विज्ञान वापरून वेगाने सुसाट धावत आहे. यात चुंबकीय उपचार बेड, मिड ब्रेन, रेडिएशन, धनभारित कंपने, वलये, तरंग, अशा क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. हे समाजापुढे आव्हान आहे. संत तुकारामांचे ‘मुखे बोले ब्रह्मज्ञान। मनी धन अभिमान।’ या अभंगानुसार धनदौलत, संपत्ती, सौख्य यांच्या अतिमोहाचा प्रभाव अविवेकी […]

Categories
अंधश्रद्धा

आफ्रिकेतील अंधश्रद्धा

एप्रिल - २०१८

मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात होणार्‍या ‘ग्लोबल मुव्हमेंट फॉर मेंटल हेल्थ’च्या द्विवार्षिक बैठकीला उपस्थित राहण्याचे मला आमंत्रण आले होते. जगभरातील मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्था-संघटनांची ही शिखर संस्था आहे. आफ्रिकेत जायची संधी मिळाली आहे तर तिचा उपयोग करून तेथील “अंधश्रद्धा आणि विवेकवादी चळवळीची सद्य:स्थिती” याचा देखील अभ्यास करायचे असे मी जातानाच ठरवले […]

Categories
चिकित्सा

धार्मिक व्यक्तीचा मेंदू..?

एप्रिल - २०१८

‘न्यूरोसायकॉलॉजिया’ नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार मेंदूतील एक भाग, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स, योग्य काम करेनासा झाल्याने धार्मिक मूलतत्त्ववाद निर्माण होतो. मेंदूच्या या भागाला धक्का पोचल्याने माणसाच्या आकलनातील लवचिकता आणि विचारासंबंधीची उदारमनस्कता कमी होते. कुतूहल व सृजनशीलतेवर परिणाम होऊन अपरोक्षरित्या धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागतो. समाजात पसरलेल्या, खर्‍या समजल्या जाणार्‍या, पारलौकिक घटना आणि व्यक्तिरेखा म्हणजेच माणसाच्या धार्मिक श्रद्धा […]