जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल छातीत दुधाची गाठ निर्माण झाल्याने संध्या सोनवणे (वय-24, रा.पर्वती, पुणे) या महिलेवर डॉ. चव्हाण यांच्या स्वारगेट येथील रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र तेथील उपचाराला यश न आल्याने संध्या यांना दीनानाथ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, डॉ. चव्हाण यांनी सोनवणे यांना ‘सकाळी 7 ते 8:30 ही यमाची घंटा […]
लेखक: arc_admin
सायन्स काँग्रेसचे अभिनंदन!
देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या लोकविज्ञान चळवळीतील संस्था, संघटना व कार्यकर्तेयांच्या भुवनेश्वर येथे नुकत्याच भरलेल्या सोळाव्या ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स काँग्रेस’ या परिषदेत 20 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव व निर्धार करण्यात आला आहे. या निर्धाराबद्दल सायन्स काँग्रेसचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हार्दिक आभार मानीत आहे. 20 ऑगस्ट 2013 […]
भगवं विज्ञान
धर्मग्रंथ हे वैज्ञानिक ग्रंथ नाहीत. त्यात बराचसा कल्पनाविलास आणि मानवकेंद्रीत विचार असतो. वेदाची किंवा बायबलची तुलना न्यूटनच्या ‘प्रिन्सिपिया’ या वैज्ञानिक ग्रंथाशी करता येणार नाही. वास्तव जगाचे आकलन करण्यात धर्म विज्ञानाची बरोबरी करू शकत नाही. विज्ञानाचे हे सामर्थ्य लक्षात आल्याने धार्मिक मंडळी आधुनिक विज्ञानाचे शोध आम्ही आधीच लावले आहेत, अशी चलाख भूमिका घेतात. त्यातून निर्माण होते […]
तीन वर्षांपूर्वी, फेबु्रवारी 2015रोजी कॉ. गोविंद पानसरेंना सनातन्यांनी गोळ्या घातल्या. त्यात त्यांचा अंत झाला. त्यावेळी कॉ. उमा पानसरे यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. दोन गोळ्या खाऊनही त्या वाचल्या; बर्या झाल्या आणि पुन्हा सामाजिक कार्यात उतरल्या. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची ही मुलाखत. मीना चव्हाण : लाल सलाम उमाताई! कॉ. उमाताई : लाल सलाम! कशी आहेस? मीना […]
महिलांनी महिलांचा घेतलेला शोध! महिलांप्रमाणे पुरुषही बुवा, बाबा, महाराज, ताई यांच्याकडे जातात; पण आपला अभ्यास महिलांपुरता मर्यादित ठेवायचा आणि हा शोध महिलांनीच घ्यायचा, असे ठरवून या ‘पायलट स्टडी’ला म्हणजे प्राथमिक अभ्यासास सुरुवात केली. महिला कार्यकर्त्यांनी आपल्या संपर्कातील, दहा महिलांशी चर्चा करावी, त्यांच्याकडून उत्तरे मिळवावीत आणि नंतर त्याचे एकत्रीकरण करायचे, असे ठरले. ‘महिला बुवांकडे का जातात?’ […]
सुटे गिराण
अशिक्षित बाई ग्रहणाला भीत नाही; पण पदवीधर (तथाकथित शिकलेले) ग्रहणाला घाबरतात, या वास्तवावर आधारित ही सत्यकथा… “आज लवकर आली गं कामाला?” “अवं ती तुमची मैत्रीण, तिचा नवरा नाय का डॉक्टर हाय, ती नाय घरी. तिचं काम नाय आज.” “कोण? सुजाता?” “व्हय, तीच.” “का गं?” “अवं, सकाळी नऊ वाजता गेलती, आता पण जाऊन आली तिच्याकडं, पण […]
हे सत्पुरुषा, एकदाच बाई होऊन बघ कशी असते, कशी वागते अशीच का वागते, तशीच का बोलते, हसते एकदाच उमगून बघ ॥धृ॥ फार वेळ नको! सहा महिन्यातून एकदा तुझी पाळी होऊ दे, अंगावरून लाल-पांढरं भरपूर जाऊ दे पायाच्या तळापासून केसांच्या मुळा पावत कळा सोसून बघ एकदाच सत्पुरुषा…. ॥1॥ कधी दोन दिवस, कधी तीन चार, पाच, सहा, […]
हिंसा अंतिम उत्तर नाही
मानवी समाजात अहिंसा हे नेहमीच आदर्श मूल्य राहिले आहे. हे आदर्श मूल्य व्यवहाराच्या स्वरुपात समाजजीवनात अस्तित्वात आले. यासाठी मानवजातीची धडपड आपणास दिसून येते. यासाठी समाजजीवनातून हिंसेचा पूर्ण नायनाट व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसतात. तरीपण हिंसा अक्राळ-विक्राळ स्वरुपात समाजजीवनात प्रकट होत राहते. ‘खरा तो एकचि धर्म- जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींनी किती साध्या-सरळ शब्दांत […]
मीरा प्रभू रैदास शरण ले
मीराबाई संत रैदासांची शिष्या होती. आपण गुरूचा खूप शोध घेतला, अखेर संत रैदासात मला माझा गुरू मिळाला. त्यांच्या त्यागाला, ज्ञानाला मी शरण गेले, अशा आशयाची मीराबाईंची अनेक पदे आहेत. अशा पदांच्या आधाराने लोक रैदासांना मीराबाईंचे गुरू म्हणून मानत आलेले आहेत. काहीजणांचे मत आहे, मीराबाई आणि राणी झांशी या वेगवेगळ्या आहेत; पण बहुतेक अभ्यासकांचे मत आहे, […]
अविचारी, अविवेकी व हिंसक प्रवृत्ती बळावत असलेल्या या काळात कुणीतरी विचार करण्याचा आग्रह धरतात व त्याविषयी पदरमोड करून पुस्तकही लिहितात, ही आश्चर्यजनक गोष्ट ठरत आहे. कारण भोवतालचे वातावरण इतके कलुषित झालेले आहे की आपला समाज राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय प्रश्नांबद्दल सारासार विवेकी विचार करण्याची क्षमताच हरवून बसला आहे की काय, अशी दाट शंका येते. सामाजिक […]