संत तुकारामांच्या एका अभंगात अज्ञानात बुडालेल्या समाजाबद्दल कळवळा व्यक्त करणारे एक विधान आहे- ‘बुडती हे जन। न देखवे हे डोळा।’ तुकोबांच्या काळात बहुजन समाजाला विळखा घालणार्या अंधश्रद्धा, अंधरुढी आणि कर्मकांडे यांचा अतिरेक झालेला होता. हा विळखा सुटावा म्हणून त्यांनी अभंगाच्या रुपात समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला. तुकोबांनंतर महाराष्ट्रात विविध समाजसुधारकांनी रान उठविले. महात्मा फुल्यांनी […]