जानेवारीच्या अंकात आपण परभणी जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. या अंकात बीड जिल्ह्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या काही गुन्ह्यांची माहिती घेऊ. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि त्यामुळे निर्माण होणारे शोषण यांची घट्ट सांगड या गुन्ह्यांच्या तपशिलातून लख्खपणे समोर येते. जून 2015 मध्ये बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बुवाबाजी चालत असण्याच्या खबरीवरून सापळा […]