माननीय साथींनो, नेहमीप्रमाणे मागील महिना देखील धावपळीतच गेला. वाई मधील महाराष्ट्र अंनिसची अडीच दिवसीय विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक 2 ते 4 जून दरम्यान अत्यंत उत्साही सहभाग, संयोजनाने संपन्न झाली. त्यानंतर ‘नशामुक्त महाराष्ट्रासाठी’ महाराष्ट्र अंनिस आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांच्या एकत्रित पुढाकाराने महाराष्ट्रभर विभागीय पातळीवर बैठकांचं सत्र सुरू आहे. त्यामधील 7 जूनला ‘ग्रामगीता’कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या […]
लेखक: arc_admin
महाराष्ट्र अंनिस, अंबरनाथ शाखेतर्फे दिनांक 28 मे 2017 रोजी आयोजन महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे येथे करण्यात आले. सकाळी 9.30 च्या सुमारास शाहीर शिंदे यांच्या चळवळ गीतांनी व अभिवादन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मच्छिंद्र मुंडे यांनी (बुवा) इच्छेनुसार जळणारा कापूस श्री. वाघ यांना जाळायला लावला. आधी तो कापूस काही जळेना. मग मुंडे (बुवा) […]
गेल्या महिन्यात वारी आणि वारीत सहभागी कुणी व्हायचं यावर गदारोळ होईल अशा काही घटना घडल्या…! शिवप्रतिष्ठान या संघटनेचे लोक हातात तलवारी घेऊन वारीत घुसले आणि वारकर्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला म्हणून मोठा गदारोळ एकीकडे घडला; तर दुसरीकडे ’एक तरी वारी अनुभवावी’ असे आवाहन करून दिनांक 23 जून रोजी जेजुरी ते वाल्हे यादरम्यान ‘अंनिस’सह अनेक पुरोगामी […]
मेहरून्निसा दलवाई यांना अभिवादन
प्रख्यात मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई यांचे दु:खद निधन झाले. महाराष्ट्र अंनिसचे त्यांना भावपूर्ण अभिवादन! त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘मी भरून पावले’ या आत्मवृत्ताचा परिचय आम्ही वाचकांना करून देत आहोत. ‘मी भरून पावले आहे’ लेखिका मेहरून्निसा दलवाई! मेहरून्निसा म्हणजे हमीद दलवाईंच्या पत्नी! हमीद यांनी 1970 साली ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना […]
मासिक पाळी : मिथक कथा व गैरसमजुती
मानवनिर्मितीसाठी अत्यंत आवश्यक अशा जीवनशास्त्रातील ज्या एका स्वागतक्षम बदलाला आपल्या भारतीय धर्मप्रवृत्तींनी परंपरागत गैरसमजुतींच्या चौकटीत बंद करून ठेवले आहे, ती म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी, त्यातील काही गैरसमजुती पौराणिक व वैदिक काळातीलही आहेत. त्या अशा 1) एकदा देव शंकराच्या काखेत गळू झाले. त्या सतत वाहणार्या जखमेच्या त्रासाचे संकट पार्वतीने स्वत: स्वीकारले. तेव्हा तिच्या पातिव्रत्याने प्रसन्न होऊन […]
नामजपाचा नाद सोडला…
माझ्या लहानपणी वाचायला, ऐकायला मिळालेल्या बहुतेक गोष्टी पौराणिक असायच्या आणि त्या वयात त्या अगदी खर्या वाटायच्या. मारिचानं हरिणाचं रूप घेतलं, हनुमानानं झेप घेऊन समुद्र ओलांडला वगैरे गोष्टी अचंबित करायच्या; पण त्यावर विश्वासही बसायचा. मोठ्या माणसांच्या गप्पा ऐकताना कुणाला तरी साक्षात्कार झाला. कुणाला प्रत्यक्ष रामानं, कृष्णानं किंवा देवीनं दर्शन दिलं, तेव्हा रोमांच यायचे. प्रत्यक्ष देवाचं दर्शन […]
धनगरवाडी, ता. चाकूर येथील एक महिला व एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस करणी, भानामती होते, त्यांना ज्यांनी करणी, भानामती केली त्यांची नावे भोंदू बाबाकडून जाहीर करवून घेण्यासाठी त्यांना भोंदू बाबाकडे नेऊन पीडितांचे केस, हात-पाय, नाक दाबून गावातील दोन महिला व एक पुरुषाचे नाव वदवून घेऊन शेण खातो का? शेण खाल्लास तरच सोडतो नाही, तर नाही […]
सौ. अनुबाई केरबा सरनाईक रा. गिरगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर ही महिला गरोदर असणार्या महिलांना मुलगाच व्हावा म्हणून उपचार करीत होत्या. त्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर शाखेकडे निनावी तक्रार आली. ही महिला गरोदर राहिलेल्या महिलेस दीड महिना झाल्यावर फुलांच्या कळ्या, अंगारा खायला द्यायची. तसेच डॉक्टरांकडे न जाण्याचा सल्ला द्यायची. त्याचप्रमाणे करणी, भुताटकी, लागीर झालेले […]
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात अनेक दिवसांपासून झोपडीवजा कुटीमध्ये रुपन कल्याण बरूआ ऊर्फ पाणीवाले बाबाने बस्तान मांडले होते. दैवीशक्तीने पाणी देऊन रोगांवर उपचार करून भोळ्याभाबड्या नागरिकांना लुटण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता. मात्र भुसावळच्या अंनिस शाखेच्या पदाधिकार्यांनी आव्हान देताच त्याने बस्तान गुंडाळून पोबारा केला. पाणीवाले बाबा गेल्या अनेक दिवसांपासून कंडारी परिसरात पाणी-मंत्राने अनेक आजार […]
लोकविज्ञान संघटनेचे आधारस्तंभ असलेले, वयाच्या 82 व्या वर्षीही प्रचंड उत्साहाने विज्ञान-प्रसाराचे काम करणारे श्रीकृष्ण गुत्तीकर यांच्या अचानक जाण्याने लोकविज्ञान संघटनेत तर मोठी पोकळी झाली आहेच; पण विज्ञान चळवळीतील निरनिराळे प्रवाह आणि कार्यकर्तेयांच्यातील एक महत्त्वाचा दुवाही निखळला आहे. पक्का विज्ञानवादी, पुरोगामी असा हा हाडाचा कार्यकर्ता दिलदारपणे सर्वांशी संवाद साधणारा आणि जीवनावर सर्वांगाने प्रेम करणाराही होता. अनेकांना […]