Categories
पुरस्कार

कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार ‘अंनिस’ ला प्रदान

शहीद डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१७

जयसिंगपूर येथे पार पडला शानदार सोहळा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचा खून धार्मिक उन्मादात राहून काम करणार्‍या लोकांनी केला. विवेकाचा आवाज बुलंद करून जाती-धर्म आणि शोषणमुक्त, कल्याणकारी, समतेचे राज्य उभे राहावे, हे दाभोलकर व कॉ. पानसरे यांनी पाहिलेले स्वप्न साकार करावयाचे असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील […]

Categories
संपादकीय

राजधानीत ‘अंनिस’चा गौरव

जुलै - २०१७

नुकताच राजधानी दिल्लीत महाराष्ट्र अंनिसच्या कार्याचा प्रफुल्ल बिडवाई पुरस्काराने गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये व सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अंनिसच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर विचारवंतांकडून मिळालेली ही दाद आपणा सर्व कार्यकर्त्यांना खचितच आनंददायी व प्रोत्साहित करणारी आहे. ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही, याचे समाधान देणारी ही घटना आहे. […]

Categories
कव्हर स्टोरी

तिहेरी तलाक आणि समाजबदलाची लढाई

जुलै - २०१७

तिहेरी तलाकच्या विषयी सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये सुनावणी सुरु असल्याने सध्या या विषयाला धरून समाजमन घुसळून निघालेले आहे. समाजमनातील वाढता दबाव, केंद्र सरकारने तिहेरी तलाक प्रथेला आळा घालण्यासाठी दाखवलेली अनुकुलता आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात जाण्याची भीती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिम वैयक्तिक कायदे मंडळ आपली तिहेरी तालाकचे समर्थन करण्याची भूमिका बदलत असल्याचे समोर येते आहे . […]

Categories
जादुई वास्तव

प्रकरण 4 – हे विश्व बनलंय कशाचं?

जुलै - २०१७

ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात कणादमुनींनी वैशेषिक सूत्रात हे सारं जग अतिसूक्ष्म कणांपासून बनलं आहे आणि त्या कणांची पुढे विभागणी शक्य नाही, अशी कल्पना मांडली. अन्नाचा घास घेता घेता, आता याच्यापेक्षा बारीक बारीक असे कुठवर तुकडे करता येतील, असा विचार त्यांना सुचला आणि त्यातून त्यांनी अविभाज्य अशा अणुची कल्पना मांडली. कणादमुनींसारखीच बारीक बारीक कणांची कल्पना, डेमोक्रेटस या […]

Categories
अभिवादन

मृत्यूनंतरच्या धार्मिक कर्मकांडास फाटा

जुलै - २०१७

सहवेदना : अंनिस, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे यांच्या मातोश्री मंजुळाबाई भारुळे (वय वर्षे 84) यांचे नुकतेच वृद्धत्वाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. भारुळे कुटुंबियांनी मृत्यूनंतर धार्मिक कर्मकांडास फाटा दिला. अंनिस, सांगलीचे आधारस्तंभ व मराठा समाज सांगलीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांचे वडील व्यंकटराव चव्हाण (वय वर्षे 100) यांचे नुकतेच वृद्धत्वाने निधन झाले. […]

Categories
धर्म आणि विज्ञान

श्रद्धा – धार्मिकांचा प्लॅसिबो

जुलै - २०१७

(’राँग आयडिया ब्रेनमा ठोक दिया’ यापूर्वीच्या लेखात धर्मसंकल्पनेचा उदय, धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती, सत्याचा शोध आणि आत्मा याबद्दलची थोडीफार माहिती दिलेली आहे. विज्ञान आणि धर्म याबद्दलची चर्चा करताना धर्माचा पाया असलेल्या श्रद्धेला धर्मापासून वेगळे करता येत नाही. श्रद्धेशिवाय कुठलेही धार्मिक व्यवहार होऊ शकत नाहीत. परंतु वैज्ञानिकांना मात्र श्रद्धा ही धार्मिकांच्या मनाची समजूत घालणारी व/वा खोटे समाधान […]

Categories
प्रासंगिक

अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक वाई येथे संपन्न

जुलै - २०१७

शिस्तबद्ध, सनदशीर आणि अहिंसक मार्गाने लढणार्‍या अंनिसच्या कार्यकर्त्यांसमोर आज परिस्थितीने अनेक आव्हाने उभी केली आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन अंनिसचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. अंनिसच्या वाई शाखेने यजमानपद भूषवलेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप वाईत पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. अडीच दिवस चाललेल्या या बैठकीत अंनिसच्या सर्व […]

Categories
प्रासंगिक

सहारनपूर-शब्बीरपूर दलित हल्ला धर्मांध राजकारणाचे बळी

जुलै - २०१७

हर हर महादेव, जय श्रीराम, राणा प्रताप की जय, आंबेडकर मुर्दाबाद, चमार चट्टा मुर्दाबाद देश में रहना तो मोदी मोदी कहना है, परदेश (प्रदेश) में रहना है, तो योगी योगी कहना है, अशा घोषणांचा जयघोष करीत उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील शब्बीरपूर गावच्या दलितांच्या वस्तीवर आणि संत रोहिदास मंदिरावर हजारो ठाकूरांचा जमाव नंग्या तलवारी, बंदुका, शिगा, […]

Categories
संतविचार

अनुभव मंटप – तीर्थी धोंडा पाणी

जुलै - २०१७

भारतीय समाज धर्मभोळेपणाने कर्ज काढून चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, अमरनाथ यात्रा, गंगास्नान करण्यात धन्यता मानतो. या मनोवृत्तीचे विडंबन करताना महात्मा बसवण्णा म्हणतात- जलाशय पाहुनी डबकी मारतात वृक्षाला पाहुनी प्रदक्षिणा घालतात आटणारे पाणी, वाळणार्‍या झाडांना आपलेसे करणारे तुम्हाला कसे जाणतील, कुडलसंगमदेवा. (ब. व. क्र. 580) गंगास्नानाने अथवा वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने सत्यदर्शन होणार नाही. बाह्य अवडंबरापेक्षा अंतरंगशुद्धी महत्त्वाची […]

Categories
जात पंचायत

गर्भवती मुलीचा खून करणार्‍या बापास फाशीची शिक्षा

जुलै - २०१७

अंनिसच्या जातपंचायतीला मूठमाती या अभियानाचे मोठे यश दि. 28 जून 2013 ची नाशिकची सकाळ. एकनाथ कुंभारकरने एक रिक्षा सोबत घेतली.सातपूर भागात राहणार्‍या आपल्या विवाहित मुलीचे घर गाठले.आई आजारी असल्याने आपण घेण्यास आलो असल्याचे त्याने मुलगी – प्रमिलास सांगितले. नऊ महिने गरोदर असलेली प्रमिला बापासोबत रिक्षा बसली. त्या दिवशी प्रमिलाचा वाढदिवस असल्याने ती खूष होती. काही […]