Categories
संविधान

हिंसक पंथाचे मोहजाल

जून – २०१७

वास्तव जगात वावरताना आपणास अनेक प्रश्नांना आणि संकटांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण संभ्रमित होतो, मन:शांती ढळते, काय करावे समजत नाही. जगावे की मरावे असा प्रश्न विचारणार्‍या हॅम्लेटसारखी आपली स्थिती होते. या परिस्थितीला आपणास धैर्याने तोंड देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. आपली बुद्धी पणाला लावून आपले प्रश्न सोडविता येतात. विवेकाचा वापर करून जीवनाची वाटचाल करता […]

Categories
कव्हर स्टोरी

‘शिफू सनकृती’चे मायाजाल

जून – २०१७

छद्म विज्ञानाचे आपल्या पुढचे आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. एका बाजूला थेट चमत्काराचा दावा करणारे बाबा-बुवा कमी झाले तरी विज्ञानाचीच भाषा वापरून आधुनिकतेच्या बुरख्याखाली शोषणाची दुकाने चालवणारे अनेक बाजार आपल्या आजूबाजूला नव्याने जन्म घेत आहेत. ‘शिफू सनकृती’ हा काही आपल्या नेहमीच्या संवादातला शब्द नाही. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेकांनी तो शब्द पहिल्यांदाच ऐकला असेल. निमित्त झाले, […]

Categories
कव्हर स्टोरी

भूलभुलैय्या अध्यात्मवादी पंथ

जून – २०१७

शिफू सनकृतीसारखे तथाकथित अध्यात्मवादी; पण प्रत्यक्षात भूलभुलैय्या पंथ जगभर विखुरले आहेत. अशा काही पंथांचा थोडक्यात परिचय. ओम शिनरिको जपानमध्ये उगवलेला हा हिंसक पंथ होय. ओम शिनरिको म्हणजे ‘सर्वोच्च सत्य.’ (Supreme Truth) हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मातील विचारांची खिचडी या पंथात आहे. त्याचा प्रमुख शोभो असहारा हा स्वत:ला ख्रिस्ताचा अवतार मानत होता. या पंथाकडे विद्यापीठातील तरुण […]

Categories
फसवे विज्ञान

वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यक्रम चाहूल भारताच्या नाझीकरणाची

जून – २०१७

थोर इतिहासतज्ज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबींनी प्राचीन काळातील हिरण्यगर्भ विधीबद्दल लिहिलं आहे. एखाद्या राजाला क्षत्रियपद बहाल करण्यासाठी हा विधी ब्राह्मण पुरोहितांकडून केला जात असे . सोन्याच्या मोठ्या भांड्यात राजाला बसवून मंत्र म्हणून बाहेर काढणे, असे त्या विधीचे स्वरूप होते . सोन्याचे भांडे हे गर्भाशय असून आमच्या मंत्रांनी त्यात बसलेल्या व्यक्तीवर क्षत्रिय कुळाचे गर्भसंस्कार आम्ही केले आहेत […]

Categories
अभिवादन

निळूभाऊंच्या स्मृतीनिमित्ताने निळू फुले फिल्म क्लब सुरू करण्याचे मअंनिसचे आवाहन

जून – २०१७

13 जुलै 2009 साली सुप्रसिद्ध कलावंत निळूभाऊ फुले आपल्यातून गेले. ते केवळ सिने व नाट्य कलावंत नव्हते, तर एक सच्चा माणूस म्हणून त्यांचे जगणे होते. पुरोगामी चळवळीशी त्यांची अखेरपर्यंत सक्रिय बांधिलकी होती. स्वातंत्र्य चळवळीच्या समाजवादी पार्श्वभूमीतील राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकातून ते कलावंत म्हणून पुढे आले होते. त्यानंतर त्यांनी मराठी व हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणून […]

Categories
धर्म आणि विज्ञान

5. आत्मा : एक संकल्पना

जून – २०१७

’राँग आयडिया ब्रेनमा ठोक दिया’ – प्रभाकर नानावटी / सुमन ओक (धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्म ही संकल्पना कशी रूढ झाली, हे समजून घेणे आवश्यक होते. म्हणून धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज आणि धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती आणि सत्याच्या शोधात याबद्दलची थोडीफार माहिती मागील चार लेखात दिलेली आहे. आत्मा ही संकल्पना प्रत्येक धर्माच्या जिव्हाळ्याचा […]

Categories
जादुई वास्तव

इतक्या प्रकारचे प्राणी निर्माण कसे झाले?

जून – २०१७

(मागील अंकावरून पुढे…) एका समूहाची ताटातूट झाल्यावर निर्माण होणार्‍या दोन्ही समूहातील भाषा आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे बदलत राहतात. तसंच दोन प्रजातींची ताटातूट झाली तरी दोन्ही ठिकाणी ‘डीएनए’तले बदल होतच राहतात. आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे बदल घडत राहतात. ही ताटातूट अनेक कारणांनी होऊ शकते. समुद्र हे अगदी सहज समजण्यासारखं उदाहरण आहे. दोन […]

Categories
बुवाबाजी

अपशकुनी मुलीला मारून टाका असा सल्ला देणार्‍या देवऋषी बाईला अटक

जून – २०१७

सातारा : ‘जन्माला आलेली मुलगी अपशकुनी आहे, तिला संपवून टाका, तरच तुमची प्रगती होईल,’ असा अघोरी सल्ला देणार्‍या देवऋषी महिलेविरोधात उच्चशिक्षित विवाहितेने ‘अंनिस’कडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी देवॠषीला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा सल्ला मान्य करण्यासाठी दबाव टाकणार्‍यांमध्ये नवरा, दीर व पोलीस हवालदार चुलत सासर्‍याचाही समावेश असून, संबंधितांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी ‘अंनिस’ला […]

Categories
संतविचार

अनुभव मंटप – देहचि माझे देवालय

जून – २०१७

या चराचर सृष्टीत ईश्वराचे अस्तित्व ओतप्रोत भरले आहे, असे सांगणार्‍या धर्मांनी त्या ईश्वराला मंदिर, मठ-पीठ, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा या चौकटीत बंदिस्त केले. ही सर्व त्या-त्या धर्माची प्रार्थनास्थळे म्हणून निर्माण झाली असली, तरी कालांतराने त्या व्यवस्थेत अनेक विकृती निर्माण होऊन ही ठिकाणे पुरोहित-पुजारी, मठाधीश, पाद्री, मुल्ला-मौलवी यांची सत्ताकेंद्रे बनली. जिथे विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली जायची, त्या केंद्रांतून […]

Categories
भांडाफोड

भविष्य सांगणार्‍या टोळीचे शहाद्यातून पलायन

जून – २०१७

शहादा शहरातील विजयनगर परिसरात नंदीबैल घेऊन एका टोळीने सकाळी दहाच्या सुमारास आगमन केले. अंनिस कार्यकर्त्यांच्या हे लक्षात येताच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. टोळीतील दोघांनी विजयनगरमधील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. तेथे आपली कला दाखवत त्यांनी भविष्यकथन केले आणि घरातील अशांती दूर करण्याच्या नावाखाली पूजाविधी केला. त्याच्या बदल्यात पाच हजार […]