Categories
परिसंवाद

धर्मसत्ता आणि साहित्य

वार्षिकांक - २०१६

धर्मसंस्था ही प्राचीन काळापासून सामाजिक व सांस्कृतिक मानवी व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. आजच्या अत्याधुनिक काळातही तिचे या संदर्भातले स्थान हे महत्त्वाचेच राहिले आहे. प्राचीन काळात तर ती राज्यसत्तेबरोबर समांतरपणे कार्यरत होती. ऋग्वेदपूर्व आणि ऋग्वेदोत्तर काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारातील धर्मसंस्थेचा सहभाग काय होता आणि या इतिहास प्रवाहातून नेमके काय घडत गेले, याची […]

Categories
मुलाखत

डॉ. डी. डी. बंदिष्टे – पूर्ण विरामाला स्थान न देणारे विवेकवादी

वार्षिकांक - २०१६

माझ्या विचार प्रक्रियेत पूर्ण विरामाला स्थान नाही, माझी मनोवृत्ती अर्धविरामी आहे. मी थांबत नाही, थबकतो, अभ्यास करतो, चिकित्सा करतो त्यामुळेच माझी विचार प्रक्रिया सातत्याने गतीशील राहिली आहे आणि मला वाटते ही वैचारिक गतिशीलता हाच विवेकवादाचा गाभा आहे. हे उद्गार आहेत गेली चाळीस वर्षे विवेकवादाचा विचार आपल्या भाषणातून, लिखाणातून, शिकवणुकीतून सार्‍या भारतभर मांडणार्‍या डॉ. डी. डी. […]

Categories
व्यक्तिविशेष

मृत गुरांची कातडी काढण्याचे काम मी जातीअंताच्या दिशेने करीत आहे! – विजय दिवाण

वार्षिकांक - २०१६

गोवंश हत्याबंदीचा कायदा, गोरक्षण, गोसेवा या संदर्भात सर्वोदयवाद्यांनी प्रदीर्घ आंदोलने केली आहेत. आज याचाच आधार घेत मुस्लीमांवर, दलितांवर हल्ले होत आहेत. प्रचंड दहशत पसरवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोदयवाद्यांची या सर्व बाबतीत काय भूमिका आहे? आजच्या सत्ताधार्‍यांच्या भूमिकेत आणि सर्वोदयवाद्यांच्या भूमिकेत काय फरक आहे? या संदर्भात गेली अनेक वर्षे मृत गायींचे कातडे फाडण्याचे काम […]

Categories
कार्यकर्ता मुलाखत

विवेकी जगणं हाडीमांसी रूजलं पाहिजे – प्राचार्या सविता शेटे

वार्षिकांक - २०१६

प्राचार्य सविता शेटे. बीडच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य. ‘मअंनिस’च्या माध्यमातून महिला विभागापासून राष्ट्रीय अनुसंधान विभागापर्यंत वेगवेगळ्या विभागात, सामान्य कार्यकर्ता ते राज्य कार्यवाह अशा वेगवेगळ्या पदावर काम केलेले व्यक्तिमत्त्व. परंपरा, रूढी आणि महिलांचं दुय्यमत्व नाकारण्यापासून ते पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्यासाठी जागृती करणार्‍या प्रचारक; प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवरचे टीकेचेच नव्हे, तर हिंसेचे हल्लेही सहन करणार्‍या कणखर आंदोलक […]

Categories
स्पेशल रिपोर्ट

शोध अंबेचा

वार्षिकांक - २०१६

देवीच्या प्रथा बदलतात गाथा बदलतात देवीचा प्रसाद बदलतो नैवेद्य बदलतो देवीचे रूप बदलते नाव बदलते नाती बदलतात पती बदलतात साथी बदलतात माथी बदलतात रीती बदलतात बदलत नाही ती भाविकांची भक्ती! आणि पुजार्‍याची शक्ती! असे का होते? असे कसे होते? त्याचा हा शोध …. शोध अंबेचा! कोल्हापूरची प्रसिध्दी अनेक गोष्टीसाठी आहे. पण सामाजिकदृष्ट्या राजर्षी शाहूंची नगरी, […]

Categories
चिकित्सा

प्रार्थनेने आजार बरे होऊ शकतात का?

वार्षिकांक - २०१६

आजही प्रार्थनेने रोग बरा होऊ शकतो, पाऊस पडू शकतो, अडचणी दूर होऊ शकतात, आंधळ्याला दृष्टी येऊ शकते, पांगळा डोंगर चढू शकतो, असे दावे केले जातात व त्याला भुलून फसणार्‍यांची संख्याही मोठी आहे. तेव्हा या दाव्यापाठीमागे सत्य काय आहे याचा शास्त्रीय उहापोह प्रभाकर नानाटी यांनी या लेखात केला आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील गर्भधारणेवर संशोधन करणार्‍या तज्ञांनी […]

Categories
महिला

मुस्लिम व्यक्तिगत कायदा आणि मुस्लिम महिलांच्या समस्या

वार्षिकांक - २०१६

नुकतेच शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील तलाक, बहुपत्नीत्व व हलाला पद्धती घटनेशी विसंगत असल्याचे व व्यक्तिगत कायदे मुलभूत अधिकारांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत व ते बदलण्यासाठी भारतीय विधी आयोगाला शिफारसी करण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले. त्या विरोधात धर्मांध मुस्लीम संघटनांनी प्रचंड गदारोळ उठविला आहे. त्या संदर्भातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाची भूमिका स्पष्ट […]

Categories
पुस्तक परिचय

वर्डस मॅटर : रायटिंग्ज अगेन्स्ट सायलेन्स

वार्षिकांक - २०१६

शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणारा ग्रंथ अलिकडच्या काळात धर्मांध आणि जातीय झुंडशाही राजकारणाने देशभर धुमाकूळ घातला आहे. कोणी काय खावे, प्यावे, कोणता वेश घालावा, कोणी काय पहावे यावर बंधने घातली जात आहेत. त्या विरोधात आवाज उठवणार्‍यांचे खून केले जात आहेत. पण तरीही येथील प्रज्ञावंतांना दडपणे शक्य नाही. ते कोणत्याही दहशतीला भीक घालीत नाहीत. असा संदेश देणार्‍या […]

Categories
अंधश्रद्धा महिला

मासिक पाळी विषयी पुरातन अंधश्रद्धा

वार्षिकांक - २०१६

आयुर्वेद असो वा आधुनिक वैद्यकशास्त्र असो या दोन्हींचा स्त्रियांच्या आरोग्याकडे अथवा मासिक पाळीकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर पारंपारिक, धार्मिक विचारसरणीचा फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मासिक पाळी विषयीच्या अंधश्रद्धा पसरण्यास मदतच होते. याचा उहापोह करणारा अरूणा देशपांडे यांच्या ‘एका शापाची जन्मकथा’ या पुस्तकावर आधारित हा लेख. ‘मासिक पाळी’ हा स्त्रीच्या व संपूर्ण मानव जातीच्या पुनरुत्पादन व्यवस्थेचा एक […]

Categories
चिकित्सा

धार्मिक टीव्ही चॅनल्सचं मार्केट

वार्षिकांक - २०१६

आजचे आपले सारे व्यवहार जाहिरातबाजीने व्यापलेले आहेत. अगदी धार्मिक व्यवहारही याला अपवाद नाहीत. सर्वच धर्म चढाओढीने यात सामील झाले आहेत. टी.व्ही.सारखे प्रभावी माध्यमही त्यांना उपलब्ध आहे. प्रत्येक धर्माची चॅनेल्स् आज आपल्या धर्मातील कर्मकांडांची जाहिरातबाजी करीत आहेत. एकप्रकारचे अवैज्ञानिक, अंधश्रद्धांना पूरक असे वातावरण निर्माण करीत आहे. या धार्मिक चॅनेलच्या बाजारीकरणाचा उहापोह करणारा हा लेख…. इस्लामी धार्मिक […]