महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती समारंभात आंतरराष्ट्रीय विवेकवादी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, 2017 साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करणार्या इंग्लंडमधील ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ या प्रसिद्ध संस्थेतील संपर्क व मोहीम विभागाचे संचालक मा. बॉब चर्चिल यांनी शालेय शिक्षणानंतर वारविक विद्यापीठ व कॅनडा येथील क्वीन्स विद्यापीठ येथून तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले. हा आवडीचा विषय शिकत […]
लेखक: arc_admin
सध्या देशात चिकित्सक विचार करणे, वरिष्ठांना प्रश्न विचारणे किंवा बहुसंख्याकांच्या मताविरोधात मत व्यक्त करणे, अशा गोष्टी फारशा लोकप्रिय राहिलेल्या नाहीत; पण व्यक्तिस्वातंत्र्य, तिचे किंवा त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांची मुळे प्राचीन भारतीय संस्कृतीत चांगलीच रुजली होती, असे प्रतिपादन ‘इंटरनॅशनल हुमॅनिस्ट आणि इथिकल युनियन’ ज्या संस्थेला ‘हुमॅनिस्ट इंटरनॅशनल’ असेही ओळखले जाते, त्या संस्थेच्या जागतिक संचालक मंडळाचे […]
मानसमैत्री : पूरग्रस्त आपत्तीबाधितांशी
महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला गेल्या महिन्यात महापुराने झोडपले. मनुष्यहानी जरी खूप मोठ्या प्रमाणात झाली नसली, तरी बाकीची हानी खूप मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकांची राहती घरे, कपडे, पशुधन, शेती यांची मोठी हानी झाली आहे. पुराच्यामुळे भौतिक पातळीवर झालेली पडझड नजरेला दिसून येते आणि त्यामुळे त्या बाबतीत मदत करणे हे देखील शक्य होते; पण पुरासारख्या आपत्तीमुळे माणसाच्या […]
समाजपरिवर्तनासाठी संघर्ष अटळ…
महाराष्ट्राला धर्मचिकित्सेची संतपरंपरेपासून थेट फुले-शाहू-आंबेडकर-आगरकर अशी मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेच्या मूल्यांशी धागा जोडत, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. 9 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. तीस वर्षांचा काळ म्हणजे एखाद्या संघटनेसाठी काही फार मोठा काळ नाही; अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीसाठी तर नाहीच नाही. कारण चार्वाक, महावीर, बुद्ध, […]
कृतिशीलतेचा आदर्श!
डॉ. दाभोलकरांची कल्पकता सनदशीर मार्गाने, अहिंसक चळवळीतून महात्मा गांधींना उजाळा देणारी असायची. असा उपक्रम ते लादायचे नाहीत. कार्यकर्त्यांच्या पुढे ते प्रश्न ठेवत. उपाय, उपक्रम कार्यकर्ते सुचवत. लोकशाही पद्धत रुजवण्यावर डॉ. दाभोलकरांचा भर असायचा. पुरोगामी, डाव्या, समाजवादी, मानवाधिकारकेंद्री, शोषणमुक्त समाजाची घडण हे आपल्या चळवळी व संघटनेचे उद्दिष्ट आहे, याचा ते विसर पडू देत नसत. चळवळीचा चेहरा […]
हाडाचा कार्यकर्ता!
नरेंद्र एक बहुगुणी कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याला आवश्यक असणारी संवादाची, युक्तिवादाची विशिष्ट शैली त्याच्याकडे होती. उपजत असेल-नसेल; पण अनुभवानं ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली; पण नुसत्या बोलण्यानं, आवाजानं काय होणार? त्यासाठी अभ्यासाचा भक्कम पाया नितांत महत्त्वाचा असतो. तो त्याच्याकडे होता. मला त्याचं एक हे वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की, तो अनेकदा आपले विचार मांडताना, संतांच्या अभंगांचा अतिशय […]
वडीलधारी मित्र !
या महाराष्ट्राच्या पडझडीच्या काळात तुम्ही हवे होतात डॉक्टर. प्रत्येकवेळी आज तुम्ही काय केले असते, असा प्रश्न कुरतडत राहतो. कोणत्याही अस्वस्थतेला तुम्ही उत्तरांची जोड देत असायचे. केवळ वांझ अरण्यरुदन करण्यात तुम्हाला रस नव्हता. तुम्ही असताना ‘सोशल मीडिया’ बाल्यावस्थेत होता. आज आम्ही सारे त्यावर व्यक्त होऊन कृतिशीलता मारत आहोत; तुम्ही मात्र प्रत्येक अस्वस्थ करणार्या विषयांचे कृतीत रूपांतर […]
सत्यशोधकांचा पाठीराखा!
नवनवे उपक्रम आणि प्रयोग परिवर्तनाच्या लढ्यासाठी ऊर्जा देतात, याची खात्री पटल्यामुळे तसे प्रयोग डॉक्टरांनी नेहमी केले. धार्मिक सण हे अधिक समाजाभिमुख व्हावेत, ते मानवतावादी व्हावेत, पर्यावरणपूक व्हावेत, यासाठी केलेले प्रयत्न आजही दिशादर्शक आहेत. गणेशोत्सव, होळी आणि दीपावली अशा सणांच्या काळात डॉक्टरांनी पर्याय दिले. हे पर्याय नवा दृष्टिकोन देणारे होते, उत्साह आणि ऊर्जा वाढवणारे होते. मला […]
निर्मळ आणि निर्भीड!
मला डॉक्टर आवडतात. कारण त्यांनी कुठल्या व्यक्तीवर, धर्मावर किंवा संस्थेवर राग म्हणून काम केलं नाही. सदैव सामान्य माणसाच्या कल्याणाची कास धरली. हजारो कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ दिलं. अशा फार कमी संघटना आहेत, ज्या आपल्या संस्थापकाच्या निधनानंतरही त्याच जोमाने काम करताना दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यातली महत्त्वाची. कारण डॉक्टरांनी सच्ची आणि तळमळ असलेली माणसं निवडली. वैचारिक बैठक […]
… आणि माझा विरोध मावळला!
गोरगरीब, दीनदुबळ्यांची, रंजल्या-गांजल्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी डॉक्टर आयुष्यभर झटले. कुणी कितीही कठोर शब्दांत बोलले, तरी डॉक्टरांचा आवाज कधी वाढला नाही. म्हणून ‘मृदू सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त॥’ हे वचन त्यांच्यासाठी लागू होते. मृदू सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त॥ तुकाराम महाराज यांनी सज्जनाचे केलेले वर्णन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना लागू होते, असा ‘साक्षात्कार’ त्या दिवशी मला […]