Categories
व्यक्तिविशेष

शतकांची लढाई!

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

तुम्ही याला ‘शतकांची लढाई’ संबोधले होते ना डॉक्टर. काही शतके काम केल्यावर आपल्या हाती काही लागेल, असेच तुम्हाला म्हणायचे होते ना! मग ही एक मोठी जबाबदारी आहे. काही शतकांची वाटचाल करणारे दमदार संघटन असेच वृद्धिंगत आणि अभेद्य ठेवण्याचे आम्ही तुमच्या मुशीत घडलेले सर्व कार्यकर्ते ही जबाबदारी नेटानं पार पाडू, अशी ग्वाही देतो. प्रिय डॉक्टर, पुन्हा […]

Categories
डॉ. दाभोलकर खून तपास

आरोपी एकाच गुन्हेगारी ‘सिंडीकेट’चे सदस्य

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

20ऑगस्ट 2019रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी खुनाचा तपास केला; परंतु तपासात कोणतीही प्रगती न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास 9मे 2014रोजी सीबीआयकडे सोपविण्यात आला. डॉक्टरांचा खून झाला त्या पद्धतीनेच पुढे 16फेब्रुवारी रोजी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यात त्यांचा 20फेब्रुवारी 2015रोजी […]

Categories
अभिवादन

राजा ढाले : ‘पँथर’चा लास्ट समुराई

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

मानवजातीच्या इतिहासात शोषित समुदायांचे विद्रोह जननायकांना जन्म देतात, जे त्यांच्या न्यायपूर्ण विद्रोहाला चिरंतन मानवी मूल्यांची नैतिकता प्रदान करतात. या नैतिकतेचा कधीच पराभव होत नाही. ती प्रत्येक काळात वेगवेगळ्या रुपात शोषितांच्या विद्रोहाला बळ पुरवते, नवे जननायक, नवे विचारवंत निर्माण करते. या विद्रोहाच्या गाभ्याशी चिरंतन मानवी मूल्य असल्याने ही लढाई माणसाचे माणसाकडून होणारे शोषण नष्ट करणार्‍या दीर्घकालीन […]

Categories
भांडाफोड

‘गुरूमाँ’चा साईबाबांशी थेट संवाद!

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

‘माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे. थेट साईबाबांशी संवाद, संपर्क साधून लोकांना, त्यांच्या अडचणीतून सुटका करते, भूतबाधा, करणी दूर करते, कोर्ट प्रकरण सोडवते,’ असे खोटे दावे करून फसवणूक करणार्‍या किरण दारूवाला ऊर्फ ‘गुरूमाँ’ (रा. शिवाजी नगर, लोअर परेल) या महिलेला मुंबईतील अंनिस कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याची सुरुवात फसवणूक झालेल्या महिलेच्या वडिलांनी […]

Categories
संविधान

सामाजिक न्याय आणि संविधान

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

स्वातंत्र्यानंतर भारत हे राष्ट्र कसे असेल, ते कोणत्या मूल्यांच्या दिशेने पुढे जाईल, येथे कोणती व्यवस्था असेल, या विषयी स्पष्ट कल्पना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये विकसित झाली होती. स्वातंत्र्यानंतर या देशाचे संविधान तयार होताना त्या सर्व कल्पनांना मूर्त रूप देण्याचे काम संविधान सभेने केले. भारत हे राष्ट्र लोकांनी तयार झाले आहे. ते लोकांच्या सुखासाठी आहेे. लोक आनंदी असणं […]

Categories
चळवळ वैज्ञानिक दृष्टिकोन

20 ऑगस्ट 2019- राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन 20ऑगस्ट हा 2018पासून आपण ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. मागील वर्षी ‘पीपल्स सायन्स नेटवर्क’ (खझडछ) व महाराष्ट्र अंनिस यांच्या संयुक्त आवाहनाने देशातील विविध विज्ञानवादी संस्था–संघटनांच्या सहभागाने ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ व्यापक प्रमाणावर आयोजित करण्यात आला होता. या वर्षी देखील 20ऑगस्ट 2019हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन […]

Categories
वैज्ञानिक दृष्टिकोन

शहिदत्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

प्रिय साथी, ही कार्याध्यक्षांची डायरी लिहिताना वेदना आणि आनंद अशी संमिश्र भावना मनात आहे. आपल्या समितीचे अध्वर्यु शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. आजपर्यंत मागील सहा वर्षांच्या कालावधीत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुण्यातील निर्घृण खुनानंतरच्या परिस्थितीचा मागोवा घेतला तर लक्षात येते की, समाजसुधारणेसाठी, शोषणमुक्त, समताधिष्ठित, धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीसाठी आपल्या आयुष्यात आपल्या परिने […]

Categories
कविता

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पोवाडा

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक - ऑगस्ट २०१९

चाल 1 फुले, शाहू, आंबेडकर हा ऽऽ महात्मे थोर, केला उद्धार, बहुजन दलित शोषितांचा। वारसा त्यांच्या विचारांचा। शिलेदार दाभोलकर त्यांचा रं जी ही जी जी ॥1॥ स्वातंत्र्यसूर्य उगवला हाऽऽ मुक्त जाहला। देश आपुला, गुलामीच्या बेड्या जरी तुटल्या। अंधश्रद्धेच्या परी उरल्या। विकासाचा मार्ग म्हणून अडला रं जी ही जी जी ॥2॥ श्रद्धेची चिकित्सा करा हाऽ बुद्धी […]

Categories
संपादकीय

निरोप घेताना…

जुलै - २०१९

महाराष्ट्र अंनिसच्या भोर येथील विस्तारित राज्य कार्यकारिणीत मी (प्रा. प. रा. आर्डे) पाठविलेला मुख्य संपादक पदाचा राजीनामा संघटनेने मंजूर केला. याबद्दल मी संघटनेचा मन:पूर्वक आभारी आहे. 1995 ते 2002 पर्यंत मी वार्तापत्राच्या ‘संपादक’ मंडळातील एक सदस्य म्हणून सहभाग दिला. या काळात डॉ. प्रदीप पाटील हे वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांनी 2002 मध्ये मुख्य संपादक पदाचा […]

Categories
अभिवादन

‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर

जुलै - २०१९

गोपाळ गणेश आगरकरांचे 125वे स्मृतिवर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर (14 जुलै 1856 ते 17 जून 1895) ‘सुधारक’अग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांचा यंदा 125 वा स्मृतिदिन आहे. मला आठवतंय की, मी शाळेमध्ये असताना वि. स. खांडेकरांचा एक लेख आम्हाला अभ्यासक्रमाला होता. त्याचं क्रांतिकारी शीर्षक होतं, “देव न […]