लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ 1 ऑगस्टला होत आहे. त्यानिमित्ताने कॉ. अण्णा भाऊ साठेंवरचा लेख प्रसिद्ध करीत आहोत. “ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित-श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” असे वरिष्ठ वर्णाला आणि वरिष्ठ वर्गाला ठणकावून सांगणार्या अण्णा भाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 चा! गाव वाटेगाव! शेती […]
लेखक: arc_admin
9,10 व 11 ऑगस्टला मुलुंड (मुंबई) येथे भव्य अधिवेशन प्रिय साथी, आपणांशी संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. या वर्षी महाराष्ट्र अं.नि.स.च्या शाखा, जिल्हा व राज्य या तीनही स्तरांवरील कार्यकारिणीची निवडप्रक्रिया पार पडली. महत्त्वाचे म्हणजे संपर्ण निवड सर्वसहमतीने होण्याची आपली परंपरा कायम ठेवली. लोकशाही पद्धतीने असली, तरीही कोणीही निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला नाही, ही विशेष […]
त्रिदशकपूर्तीच्या अंतरंगात
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती निमित्ताने 9 ऑगस्टला होणार्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि 10 व 11 ऑगस्टला होणार्या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी सप्टेंबर 2018 महिन्यातच सुरू झाली. पूर्वतयारीच्या आतापर्यंत एकूण 8 बैठका झाल्या. भूपेश गुप्ता भवन दादर, कॉम्रेड शामराव परुळेकर सभागृह ठाणे व कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे झालेल्या सर्व बैठकांना कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि इतर […]
देवाचा धाक संपविणारी पंढरीची वारी
“टाळ-मृदंगाच्या गजरात वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने त्या सावळ्या विठूरायाला भेट्ायला निघाल्या आहेत. जात-धर्म, स्त्री- पुरुष, गरीब- श्रीमंत हे सर्व भेद गळून पडले आहे. अवघा रंग एक झाला, असे संपूर्ण वातावरण आहे. ही वारी म्हणजे सामाजिक समतेचे जगातील सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल. विशेष म्हणजे देवाबद्दलचा पूर्वी जो धाक होता, तोही संपून देव सोयरा, सखा, जीवलग […]
मनाची प्रयोगशाळा
प्रयोगशाळा म्हटले की, आपल्या नजरेसमोर एक विशिष्ट चित्र उभे राहते. पांढरे डगले घातलेले शास्त्रज्ञ, ‘आम्ल’, ‘अल्कली’, ‘लिटमस पेन’, ‘चंचुपात्र’ अशा अनेक गोष्टी नजरेसमोर येतात; पण आपण आज ज्या प्रयोगशाळेविषयी समजून घेणार आहोत ती एक आगळी-वेगळी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेची लक्षणे म्हणजे ज्या क्षणी आपण जन्म घेतो, त्या क्षणापासून ही प्रयोगशाळा चालू होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत […]
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धोंगडेपाडा गाव आहे. या गावात आदिवासी भिल्ल समाजाची लोकसंख्या जास्त आहे. सुनीता (नाव बदलविले आहे) या पंधरा वर्षांच्या मुलीची गावातल्या एका लग्नात बाळा सहाणे या तरुणाशी ओळख झाली. तो बेज (नाशिक) येथील रहिवासी असून आपल्या एका नातेवाईकांकडे धोंगडेपाडा येथे आला होता. तो सुद्धा तिच्याच समाजाचा होता. तिला लग्नाचं आमिष दाखवून बाळा […]
‘इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल,’ (India, that is Bharat, shall be a Union of States.) या विधानाने भारताच्या संविधानाची सुरुवात होते. 395 कलमांच्या संविधानातील पहिल्या कलमातील हा पहिला भाग. यानुसार राज्यांची निर्मिती झाली. आज भारतात 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत. या सर्वांचं मिळून जे राज्यक्षेत्र बनतं, ते भारताचं राज्यक्षेत्र आहे. […]
दारिद्र्याची शोधयात्रा
हेरंब कुलकर्णी म्हणजे तेच, ज्यांचे शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारे “शाळा आहे शिक्षण नाही” हे पुस्तक प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये जाहीरपणे जाळले होते. पुस्तक जाळले; पण त्यातील मुद्दे खोडणे शक्य झाले नाही; प्रत्यक्ष पाहणी करून, शाळांना भेटी देऊन, वस्त्या-वस्त्यांवर चर्चा करून त्यांनी अनुभव लिहिले होते. शासकीय पातळीवर मात्र त्याची दखल घेतली गेली. पुस्तक शिक्षक संघटनांपर्यंत पोचायला […]
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक डॉ. आशुतोष मुळे यांचे दिनांक 2 जून 2019 रोजी अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या आजाराने अकाली अवघ्या 51 व्या वर्षी निधन झाले. व्यवसायाने डॉक्टर असलेले आशुतोष फिनोलेक्स या कंपनीत 1993 पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. अलिकडे काही वर्षांपासून त्यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी पदाचाही कार्यभार होता. या काळात त्यांनी कंपनीच्या सीएसआर धोरणांतर्गत ग्रामीण भागात […]
सतीची गावपळत
वाघणगाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव. गावची वस्ती 1500. सुमारे 500 माणसं मुंबईत. गावात वाड्या चार, कुणबी समाजाच्या डोंगरेवाडी आणि नेमणेवाडी या दोन वाड्या; एक सुतारवाडी आणि एक बुद्धवाडी. सुमारे 300 वर्षांपूर्वी विशाळगडावरून लांज्याला जाणार्या रेडीज नावाच्या खबर्याचा खून झाला. त्याचा शोध घेत आलेल्या त्याच्या पत्नीला वाघणगावाजवळ प्रेत सापडलं. अग्निसंस्कारासाठी अपरात्री […]