बंडोपंत दातरंगे महाराष्ट्र अंनिसचे नाशिकचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र दातरंगे यांचे वडील बंडोपंत दातरंगे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. निधनासमयी त्यांचे वय 92 वर्षेहोते. त्यावेळच्या नाशिक नगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत राहून त्यांनी त्यांच्या सेवेत कामाचा वेगळा ठसा उमटविला होता. कवितालेखन, वाचन व श्रवण करणे हा त्यांचा आवडीचा […]
लेखक: arc_admin
मानवतावादी कलावंत : गिरीश कार्नाड
10 जून रोजी प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक आणि कलावंत गिरीश कार्नाड यांचे दीर्घ आजारानंतर राहत्या घरी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. विवेकवादाच्या चळवळीच्या अंगाने लक्षात घेतले, तर हा माणूस आपला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सत्तेविरुद्धही बंडखोर विचार मांडताना कार्नाड कचरले नाहीत. त्यांना अंनिसतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आमच्या वाचकांना परिचय करून देणे आमचे कर्तव्य […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या बैठकीत विविध उपक्रम, बुवा-बाबा यांच्या बाबत तक्रारी, झालेले कार्यक्रम याबाबत चर्चा होते. एकदा उपस्थित कार्यकर्त्याने एक जाहिरात दाखवली, सदरची जाहिरात त्यास वृत्तपत्रातून मिळाली होती. जाहिरातीत म्हटले होते – “हनुमानाचे भक्त श्री. शास्त्री महाराज कोल्हापुरात प्रथम आलेले आहेत, हे महाराज चेहरा पाहून भविष्य सांगतात, कोणत्याही समस्येवर त्यामध्ये पती-पत्नीमधील तणाव, संतानसुख, […]
वटपौर्णिमा हे विषमतेला उघडपणे समाजमनात रुजवणारं व्रत आहे. तरीही खेडेगावातील स्त्रिया असोत की, मुंबई सारख्या महानगरातील, त्या अशिक्षित असोत की, अति उच्चशिक्षित प्रत्येक स्त्री त्याच श्रद्धेने ते व्रत करीत असते. यामागे स्त्रियांची नेमकी मानसिकता काय असते, हे समजून घेण्याचा प्रयत्न पनवेल शाखेने वटपौर्णिमेनिमित्ताने केला. पनवेल हा नवी मुंबई या आधुनिक शहराचाच एक भाग. येथे देशाच्या […]
सी.बी.आय.ची उशिरा; पण योग्य कारवाई
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना सी.बी.आय.ने केली अटक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांना सी.बी.आय.ने शनिवारी, दिनांक 25 मे रोजी मुंबईतून अटक केली. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणार्या दोघांना मदत करून या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली […]
हिमालयीन यती : सत्य की कल्पित?
30 एप्रिल 2019 रोजी वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.वर एक सनसनाटी बातमी झळकली. बातमीचा विषय होता हिमालयात आढळतात (?) माकड-मानवसदृश प्राणी, त्याचे नाव आहे यती. यतीला हिममानव या नावाने ओळखतात. भारतीय सैन्याने असा दावा केला आहे की, त्यांना हिमालयात यतीची पावले दिसली, ही बातमी विविध मीडियाद्वारे सगळीकडे पसरली. यानंतर 3 मे 2019 रोजी नेपाळी सैन्य आणि तेथील […]
संगीत उपचार आता शालेय अभ्यासक्रमात इ. 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता संगीत-वादन-नृत्य कलांचा समावेश असणारा ‘भारतीय संगीत’ विषय सुरू होत आहे. प्राचीन परंपरा भारताला संगीताची प्राचीन परंपरा आहे. लोकगीतांपासून शास्त्रीय संगीतापर्यंत, आदिवासी नृत्यापासून कथ्थक नृत्यापर्यंत, मंजुळ सनईपासून कान फोडणार्या ढोलाच्या दणदणाटापर्यंत अनेक मार्गांनी इथली संगीत परंपरा संपृक्त झाली आहे. आता त्यात पाश्चात्य संगीतानेही प्रवेश […]
आपले मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी स्वत:कडे अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज याविषयी आपण मागच्या लेखात पाहिला; पण खरी पंचाईत ही असते की, स्वत:ला अंतर्मुख होऊन तपासायचं म्हणजे काय करायचं, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करताना अशा अनेक व्यक्ती भेटतात की, ज्यांना या क्षणी आपल्याला नक्की काय वाटतं आहे, हे नीट सांगताच येत नाही. ‘काहीतरी […]
दुष्काळात यज्ञ घालून पाऊस पाडता येत नाही
संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळामध्ये होरपळत आहे. अशा दुष्काळाच्या काळातही काही लोकं सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची लूट करण्याचा प्रयत्न करतात. या लुटीचे प्रमुख माध्यम आहे यज्ञ. पाऊस पडत नसेल, तर यज्ञ करावा, असा सल्ला ही मंडळी देत असतात; परंतु वारकरी संतांनी मात्र यज्ञाच्या माध्यमातून होणार्या शोषणातून समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. योग-याग करून […]
भारतातील समाजवाद : विचार आणि वाटचाल
माणूस हा संपत्ती निर्माण करणारा प्राणी आहे. जिज्ञासा, विचार करण्याची क्षमता, करून पाहणं, सतत सुधारणा करत नवं कौशल्य आत्मसात करणं यातून त्यानं प्रचंड संपत्ती निर्माण केली. एक प्रकारे पर्यायी जग निर्माण केलं. ही संपत्ती जगणं सुरक्षित आणि सुखकर, सुखमय करण्यासाठी महत्त्वाची आहे, असं त्याच्या लक्षात आलं. अशी संपत्ती निर्माण करण्यासाठी अर्थातच नैसर्गिक साधन संपत्तीची गरज […]