डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला नुकतीच पाच वर्षे झाली. खुन्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोचण्याचा प्रयत्न तपासयंत्रणा करायला तयार नाहीत. अशा वेळी कार्यकर्ते आपल्या भावना विवेकाने व्यक्त करत आहेत, त्यातील एक विलास भांदिर्गे, माजी मुख्याध्यापक, ते सातारा जिल्ह्यातील तारळ्याचे! त्यांनी ठरवले, आपण; एका महिन्यात एकशे एक वर्गणीदार नोंदवून डॉक्टरांना आदरांजली वाहायची. त्यांचा वाढदिवस 6 सप्टेंबरला. सेवानिवृत्त होऊन आठ […]
कॅटेगरी: उपक्रम
धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग हे महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी कुर्बानी किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, […]
अंनिसच्या अलिबाग शाखेने यावर्षी काहीतरी नवीन आणि समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे ठरले आणि लक्षात आले. सावित्रीच्या भूमिका जगणार्या अनेक महिलांना अकाली वैधव्याला सामोरे जावे लागते आणि नंतरच या सावित्रीचा संसार संघर्ष सुरू होतो. अशा महिलांच्या संघर्षाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा, या विचाराने कार्यक्रम ठरला आणि तयारी सुरू झाली. स्थानिक पेपरला बातमी दिली. अनेक मान्यवरांनी बातमी […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मितीतर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे “विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा” घेण्यात येणार आहे. या वर्षी ‘जातिप्रथा आणि त्यांच्या विविध समस्या’ हा विषय लघुपट स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या […]
विवेक व्याख्यानमालेचा ‘नाशिक पॅटर्न’
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा 20 ऑगस्ट 2013 ला पुणे येथे पुलावर ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असताना खून झाल्यावर देशातील पुरोगामी डाव्या आणि विवेकवादी कार्यकर्त्यांच्या व देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पण तो संताप विध्वंसक न बनता विधायकतेकडे वळविण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले. यात डॉ. दाभोलकरांनी रुजविलेल्या विवेकवादी मूल्यांचा मोठाच वाटा होता. तो वारसा घेऊन […]
वर्ध्याच्या अभ्यासवर्गाची अर्धशतकी वाटचाल
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अथक परिश्रमातून संपूर्ण महाराष्ट्रात गाव, तालुका, शहर, जिल्हा अशा विविध शाखांमधून फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये रुजविण्यासाठी कार्यरत असणारी विवेकवादी चळवळ आहे. 20 ऑगस्ट 2013 ला विचारांचा प्रतिवाद विचाराने न करता आलेल्या विकृत माथेफिरूने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या केली. प्रत्येक शाखेतील कार्यकर्त्यांच्या, […]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे संघटनेचा पुढील दशकातील महत्त्वाचा उपक्रम म्हणून बघायचे. व्यवसायाची निवड आणि जोडीदाराची निवड या तरुणांच्या भावी आयुष्यावर खोलवर परिणाम करणार्या दोन बाबी आहेत. यापैकी, व्यवसाय निवडीचा सर्वांगीण विचार कसा करावा, या विषयीच्या माहितीचे अभिसरण आपल्या समाजात सुरू झालेले आहे. जोडीदाराची निवड या विषयाचा […]
ग्रंथदिंडीचे वारकरी : पेंडसे काका
पिंपरी चिंचवड मधलं पेंडसेकाकांचं घर! आम्ही अंनिस संबंधातल्या गप्पा मारत होतो. काका चहा आणायला आत गेले, आणि टेबलावरचा फोन वाजला. फोन उचलला. “आमच्या घरी सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रम आहे, आपण येऊ शकाल काय?” ओळख न विचारता कॅसेट सुरू झाली, तेव्हा मी म्हटलं, “थांबा हं, काका कामात आहेत, पाच मिनिटांनी फोन करा.” तेवढ्यात चहा आला. मी म्हटलं, […]
खरे तर दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा करायला हवा आहे. त्या ऐवजी होळीच्या निमित्ताने वारेमाप झाडे तोडली जातात, होळीत बोंबा मारून शिव्या दिल्या जातात, होळीमध्ये पोळी नैवेद्य म्हणून जाळली जाते, रंगपंचमीला भरपूर पाण्याचा वापर होतो, एकमेकांना अपायकारक रासायनिक रंग लावले जातात. या चुकीच्या प्रथांबाबत जनजागृती करण्यासाठी यंदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन […]
मृत्युंजय अमावस्येच्या काळोख्या मध्य रात्री पनवेल जवळील काळुंद्रे गावातील स्मशानात 110 च्या वर उपस्थिती. त्यातही 8 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या आजींपर्यंत जमलेले सारे, स्मशान असतं कसं? आणि तिथं भुताचा वावर खरंच असतो काय? या उत्सुकतेपोटी आलेले होते. महाराष्ट्र अंनिसच्या पनवेल शाखेच्या वतीने 17 मार्चच्या मृत्युंजय अमावस्येच्या निमित्ताने स्मशान सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियाच्या […]