महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निमगुळ शाखा व ग्रामपंचायत निमगुळ यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे तालुक्यातील निमगुळ येथे अमावस्येच्या दिवशी अंनिस कार्यकर्तेव ग्रामस्थांनी स्मशान सहल काढली. सुरुवातीला संपूर्ण स्मशानाची साफसफाई केली. नंतर स्मशानभूमीत मरणोत्तर व अवयवदान या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी धुळे शाखेचे कार्याध्यक्ष रणजित शिंदे यांनी देहदानाबाबत माहिती देऊन जनजागृती केली. धुळे शाखेचे प्रदीप सोनवणे, […]
कॅटेगरी: उपक्रम
जटामुक्तीचा ध्यास घेतलेली नंदिनी
‘केसात जट आली’ तर देवीचं बोलावणं आलं, असं समजून मुलाला किंवा मुलीला देवीला सोडण्याचा प्रकार अनेक वर्षे सुरू होता. सीमाभागात – कोल्हापूर-निपाणी-बेळगाव-सांगली या भागात या प्रथेचे प्राबल्य होते. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी गडहिंग्लजच्या विठ्ठल बन्ने यांनी याविरोधात मोहीम उघडली. त्यांनी या भागात कार्यकर्ते तयार केले. यल्लम्मादेवीचा प्रभावही प्रचंड! देवीचा कोप झाला, तर ती ‘बाईचा बापय करती आन् […]
‘जाता जात नाही ती जात’ ही जातीची नकारात्मक; पण खेदाने वास्तवदर्शी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करणार्या जातिअंताच्या लढ्यातील कार्यकर्त्यांसाठी एका प्रभावी माध्यमाची जोड देणे, हे यंदाच्या व आगामी विवेक महोत्सवाचे प्रमुख प्रयोजन होते आणि असेल. कारण जात ही संकल्पना देखील एक अंधश्रद्धाच आहे; पण या अंधश्रद्धेचा पगडा समाजमानसावर गहिरा आहे. महाराष्ट्र अंनिस व आटपाट यांनी आयोजित […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या विचारसूत्रावर आधारित संमेलने महाराष्ट्रभर आयोजित केली जातात. याचाच एक भाग म्हणून ‘महिला’ हे विचारसूत्र घेऊन अंनिस व समविचारी संघटनांच्यावतीने जळगाव येथे हे संमेलन पार पडले. त्याचा हा वृत्तांत… संविधानाच्या माध्यमातून प्रबुद्ध भारताची निर्मिती आवश्यक – डॉ. अंजली मायदेव आंबेडकर. जातमुक्ती, पितृसत्ताकता यातून स्त्रीमुक्तीची भूमिका व विचार डॉ. […]
स्मशानभूमीत मुलीचा वाढदिवस साजरा
सामान्य माणसांची भूताविषयीची भीती घालविण्यासाठी मअंनिस, बिलोली (जि.नांदेड) शाखेचे प्रधान सचिव कमलाकर जमदाडे हे बिलोली तालुक्यापासून सद्रापूर या खेड्यामध्ये राहतात, त्यांनी आपल्या चार वर्षांची मुलगी क्षितिजा हिचा वाढदिवस बिलोली या तालुक्याच्या ठिकाणी स्मशानभूमीत करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी बिलोली येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी नगरपालिका, पोलीस प्रशासन व तहसीलदार यांची रीतसर […]
‘जातिप्रथा’ या विषयावर लघुपट बनवा!
डॉ. दाभोलकरांच्या जन्मदिनानिमित्त अंनिसचा लघुपट महोत्सव ‘जातिप्रथा’ या विषयावर लघुपट बनवा! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव – 2017’ आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये पुढील विषयावर लघुपट, माहितीपट व अॅनिमेशनपट बनविण्याकरिता आयोजित स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे :- स्पर्धेचा विषय : जातिप्रथा […]
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे घेण्यात आलेल्या रिंगणनाट्य कार्यशाळेचा समारोप आर. आर. विद्यालयात झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक एकात्मतेवर आधारित नवीन बसस्थानकात ‘सापडलं रे सापडलं’ या नाटकाचे सादरीकरण केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित गीते, घोषवाक्ये सादर केली. या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रा. योगेश कुदळे, अवधूत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अंनिसचे कार्यकर्ते आणि नाट्य व लघुपट दिग्दर्शक अवधूत […]
आयुष्यातील कोणताही पहिला चांगला प्रसंग हा हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी कोरला जातो. ती अनुभूती मग आठवण होऊन निरंतर आठवत राहते, आनंद देते. 17 एप्रिल 2017 ची खरी तर उकाड्यातील; पण शांत, आल्हाददायक अशी पहाटेची 4 वाजताची वेळ. विश्रामबाग चौक, सांगलीच्या चौकातील डॉ. संजय निटवे यांच्या हॉस्पिटलच्या टेरेसवर आमच्या अंनिसचे कार्यकर्ते उत्साह व उत्सुकता यांची दाटणी मनात […]
आपण बहुतेकजण मळलेल्या वाटेवरचा प्रवास पसंत करतो. कराड (जि. सातारा) येथील कल्पना चावला विज्ञान केंद्राचे सर्वेसर्वा संजय पुजारी याला अपवाद आहेत. विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल नुकतेच त्यांना राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मुलांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी देण्यात […]
‘टग्यांची’ पाडळी ते ‘सत्यशोधक’ पाडळी
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळीची खरी ओळख महाराष्ट्राला झाली ती ‘फटाकेमुक्त दिवाळी’मुळे. पाडळी गाव, रानातील घरे, वाडी व वस्ती कुठेही दिवाळीत फटाका फोडला जात नाही. दुकानदार फटाके विकत नाहीत. विद्यार्थी व शिक्षक गावातून प्रबोधन फेरी काढतात. ‘मी फटाके फोडणार नाही,’ अशी प्रतिज्ञा घेतात. गेली चार वर्षे पाडळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करीत आहे. शेतकरी मोफत वाचनालय, […]