Categories
आव्हान ज्योतिष

अंनिसच्या आव्हानापासून ज्योतिषांनी काढला पळ

जून - २०१९

‘लोकसभा निवडणूक 2019’ च्या निकालाचे अचूक भविष्य वर्तवण्याचे व एकवीस लाख रुपये जिंकण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांसाठी केलेल्या जाहीर आव्हानाची फलश्रुती महाराष्ट्रात आणि देशात होणार्‍या विचित्र स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्यासमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात, असा संघटनेचा […]

Categories
कायदा जादूटोणा

अमरावती नरबळी प्रकरणातील आरोपींना जादूटोणाविरोधी कायद्यानुसार जबरी सजा

दि. 7 ऑगस्ट 2016 रोजी संत शंकर महाराज आश्रम, पिंपळखुंटा (जि. अमरावती) येथील विद्यामंदिरमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला पीडित बालक कु. प्रथमेश अवधूत सगणे, वय 11 वर्षेहा आश्रमातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वरील मजल्यावर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता. त्याचे गळ्यावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडिताचे मामा यांचे फिर्यादीवरून […]

Categories
अंधश्रद्धा

सातारा अंनिसने केले एका महिलेला जटामुक्त

जून - २०१९

खरं सांगायचं तर आता बरंच मोकळं-मोकळं वाटतंय… अशा सद्गदित शब्दांत निर्मला लोकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या जटामुक्तीनंतर परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, सातारा येथे बोलत होत्या. यावेळी जटामुक्त महिलेबरोबर मुलगी रूपाली ही होती. ती म्हणाली, आईची 21 वर्षांपूर्वी केसं चिकट झाली आणि घरच्यांनी जटा आल्याचे घोषित केले. तेव्हापासून जटाचे ओझे हळूहळू वाढत गेले. अलिकडे आईला […]

Categories
व्यक्तिविशेष

विवेकाचा झरा : डॉ. बापूजी साळुंखे

जून - २०१९

समाजशिक्षण दोन पातळ्यांवर अखंडपणे चालू असते. एक म्हणजे ‘औपचारिक शिक्षण’ आणि दुसरं म्हणजे ‘अनौपचारिक शिक्षण.’ अनौपचारिक शिक्षणाच्या चळवळीत महाराष्ट्र अंनिसचे कार्य गेली 30 वर्षेअखंडपणे चालू आहे. मीडिया आणि इतर घटकही अनौपचारिक शिक्षणात कार्यशील असतात. महाराष्ट्र अंनिसची लोकप्रबोधनाची चळवळ गतिमान करण्यासाठी एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्थेने मौलिक मदत केली आहे. विशेषत: विज्ञानवाहिनीचे कार्य […]

Categories
इतर

संविधानाची प्रास्ताविका वाचून गृहप्रवेश – गोवळकर कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम; धार्मिक विधींना दिला फाटा

जून - २०१९

खेड (जि. रत्नागिरी) जवळील चिनकटेवाडी येथील सचिन, संदीप आणि संजय गोवळकर बंधूंनी बांधलेल्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश भारताच्या संविधानाची प्रास्ताविका वाचून केला. भारतीय संस्कृतीचे धार्मिक विधी, पूजापाठ यांना त्यांनी फाटा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. चिनकटेवाडीतील सर्व ग्रामस्थ व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. हे तीनही बंधू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेली अनेक वर्षेजिल्ह्यात काम करत […]

Categories
पुरस्कार

मअंनिसला केरळच्या युक्तीवादी संस्थेचा फ्री थॉट अ‍ॅवॉर्ड

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम दिवसेंदिवस वाढत असून आता एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोचले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन यापासून सुरू झालेले संघटनेचे काम आज विविध अंगांनी विस्तारले आहे. कोणत्याही कारणाने खंड न पडता गेली 30 वर्षे सातत्याने हे काम विशिष्ट ध्येयाने, नाविन्यपूर्ण पद्धतीने, उपक्रमशीलता राखून, लोकसहभागातून, विवेकी आणि मानवतावादी समाजनिर्माणासाठी काम करीत आहे. महाराष्ट्रात तर या […]

Categories
पुरस्कार

फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन, अमेरिकेचा ‘अविजीत रॉय धैर्य पुरस्कार’ महाराष्ट्र अंनिसला जाहीर

जून - २०१९

1978 साली स्थापन झालेल्या ‘फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन, अमेरिका’ या संस्थेचा ‘अविजीत रॉय धैर्य पुरस्कार’ हा 5000 अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस जाहीर झाला असून या संस्थेच्या 52 व्या राष्ट्रीय अधिवेशनात 18 ते 20 ऑक्टोबर 2019 दरम्यान मॅडिसन, विस्कॉन्सीन येथे प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना […]

Categories
पुरस्कार

श्रीनिधी चॅरिटी, सांगली या संस्थेचा महाराष्ट्र अंनिसला पुरस्कार

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला श्रीनिधी संस्था, सांगलीचा रुपये 21 हजारांचा ‘समाजसेवा पुरस्कार’ नुकताच रोटरी क्लब, सांगलीच्या सहकार्याने दिला गेला. त्यानिमित्ताने श्रीनिधी या संस्थेने राबविलेल्या अभिनव उपक्रमाचा थोडक्यात परिचय वाचकांना करून देत आहोत. सन 2015 मध्ये जेव्हा लंडनला गेले, तेव्हा मुले नोकरीला बाहेर पडल्यावर दुपारचा वेळ आम्ही दोघे सर्व रस्त्यांवरून पायी फिरण्यात घालवत असू. मोठमोठे पार्क, […]

Categories
चळवळ

‘मअंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड’ या विभागातर्फे
अभिनव पद्धतीने वधू-वर परिचय मेळावा संपन्न

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम राबविला जातो. ऑनलाईन ट्रेनिंग आणि संवादशाळा यांच्या माध्यमातून गेली 3 वर्षे महाराष्ट्रातील शेकडो लग्नाळू तरुण-तरुणी या उपक्रमाच्या माध्यमातून जोडले आहेत. या वर्षी 12 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात ‘जोडीदाराची निवड युवा संकल्प अभियान’ महाराष्ट्रभर राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत 55 संकल्प परिषदा घेण्यात आल्या. त्यातून […]

Categories
इतर

शून्य सावलीचा भरीव अनुभव

जून - २०१९

असे म्हणतात की, आपली सावली नेहमी आपल्यासोबतच असते; परंतु 7 मे 2019 रोजी दुपारी 12 वाजता सावलीने चक्क आपली पाठ सोडल्याचे अनेकांनी अनुभवले. विद्यार्थ्यांच्या जीवनात विज्ञानाचे भान राखून त्यांनी प्रयोगशीलता जोपासण्यासाठी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली शाखेच्या कार्यकर्त्यांनी 5 ते 7 मे 2019 या दिवसांत सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे ‘शून्य सावली’ची अनुभूती दिली. […]