Categories
परिषद

अमेरिकेतील अंनिसच्या अधिवेशनात !

वार्षिकांक - २०१८

अमेरिकेतील अंनिसला अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं न म्हणता ‘कमिटी फॉर स्केप्टिकल इन्क्वायरी’ असं म्हणतात; पण एकूण बाज तोच. परामानसिक आणि छद्मवैज्ञानिक दाव्यांचा यथायोग्य शास्त्रीय मागोवा घेणे हे या संस्थेचे काम. त्यासाठी अनेक तज्ज्ञ इथे काम करतात. असं काम करणार्‍या लोकांचं जाळंच या संस्थेने तयार केलं आहे. असे दावे तत्परतेने खोडून काढावे लागतात. अशी तयारीची टीम […]

Categories
चिकित्सा

मोक्षाचा बाजार : काशी-वाराणशी

वार्षिकांक - २०१८

मी कोण? मला आत्मा आहे का? आत्म्याला पूर्वजन्म, पुर्नजन्म आहे का? मृत्यूनंतर त्याचे काय होते? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा, आहे हे जीवन सुखी–आनंदी करा. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अवलंब करा, असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले. आत्मा–परमात्मा, स्वर्ग–नरक सर्व पुरोहितांनी दक्षिणा मिळविण्यासाठी रचलेल्या भाकडकथा आहेत. तेव्हा “भस्मिभूतस्य देहस्य, पुनरागमनम् कुत:” – मेल्यावर, देह जाळल्यावर […]

Categories
संस्था परिचय

उत्तर प्रदेशातील सत्यशोधक चळवळ : अर्जक संघ

वार्षिकांक - २०१८

महाराष्ट्र अंनिसने आपल्या कामाची चतु:सूत्री ठरवली आहे. पहिले सूत्र आहे – शोषण करणार्‍या आणि उघड–उघड अन्याय करणार्‍या रुढींना विरोध करणे. दुसरे सूत्र – वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे. तिसरे सूत्र – धर्माची विधायक चिकित्सा करणे आणि चौथे सूत्र – समविचारी संघटनांशी जोडून घेणे. या चौथ्या सूत्रानुसार दरवर्षी आपण वार्तापत्रातून देशातील एका समविचारी संघटनेची ओळख […]

Categories
मुलाखत

विवेकी माणूस घडविणारा विचार हवा – सत्यपाल महाराज

वार्षिकांक - २०१८

सध्या महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या अंत:करणाला भिडणारे प्रबोधन करण्याचे कार्य करणार्‍या कीर्तनकारांमध्ये सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज अगदी आघाडीवर आहेत. सुस्पष्ट भूमिका, प्रभावशैली व सामाजिक बांधिलकी अशा विविध गुणांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात ते लोकांची मने विधायक दिशेने वळविण्याचे काम अखंडपणे करीत आहेत. सात खंजिरी वाजविणारे कीर्तनकार म्हणून असलेल्या त्यांच्या प्रारंभीच्या प्रतिमेला आता अनेक नवी परिमाणे प्राप्त झाली […]

Categories
मुलाखत

‘अंनिस’चा लढाऊ कार्यकर्ता : विष्णुदास लोणारे

वार्षिकांक - २०१८

‘विवेकाचा आवाज, बुलंद करू या!’ या ‘महाराष्ट्र अंनिस’च्या घोषणेतील व या चळवळीतील महत्त्वाचा घटक ‘विवेक.’ उच्च शिक्षण किंवा चांगल्या संस्कारातूनच माणूस शिकतो, या समजुतीला तडा देणारे चालते-बोलते उदाहरण म्हणजे महाराष्ट्र अंनिसचे, भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास बाबुराव लोणारे. जेमतेम सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण (नाही म्हणायला बाहेरून एस.एस.सी. परीक्षा दिल्याने व ती अनुत्तीर्ण झाल्याने ‘नॉन-मॅट्रिक’ हे त्यातल्या त्यात […]

Categories
न्याय

आसारामबापू बलात्कार प्रकरण – न्यायालयाचा निकाल मराठीत

वार्षिकांक - २०१८

आसारामबापू प्रकरणी, जोधपूर येथील न्यायमूर्ती मधुसूदन शर्मा यांच्या विशेष न्यायालयाने 25 एप्रिल 2018 रोजी दिलेल्या निकालाचे निकालपत्र 156 पानी आहे. उत्तम जोगदंड यांनी ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी तो निकाल हिंदीतून मराठीत अनुवादित केला आहे. अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी या निकालातील महत्त्वाचे तपशील या लेखात दिले आहेत. हा निकाल वाचून या प्रकरणातील बुवाबाजीची भयानकता वाचकांच्या लक्षात येईल. काय […]

Categories
अनिष्ट रुढी - परंपरा

पुन्हा एकदा ‘शबरीमला’

वार्षिकांक - २०१८

सर्वच धर्मांनी धार्मिक आचरणातल्या पाप–पुण्याच्या आणि शुद्ध–अशुद्धतेच्या कल्पना स्त्रियांशी जोडल्या. शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातल्या स्त्रियांना प्रवेशबंदी घालण्यामागे मासिक पाळी हे कारण सांगितले जाते. त्या मंदिरातला अय्यप्पादेव हा आजन्म ब्रह्मचारी असल्यामुळे पाळी आलेल्या स्त्रियांपासून त्याचे लक्ष विचलित होऊन त्याचे व्रत मोडण्याचा धोका निर्माण होतो, असे म्हणून बंदीचे समर्थन केले जाते. ‘शबरीमला’चा प्रश्न आणि त्यातील […]

Categories
अंधश्रद्धा

अंधश्रद्धेचे बळी

वार्षिकांक - २०१८

प्रयत्नांती परमेश्वर हे देखील कष्टप्रद असते. त्या मानाने जादू, मंत्र–तंत्र, पूजापाठ, उपास, उपासना सारे सोपे असते. दरिद्री, नाडलेल्या जीवाला वास्तवाकडून काहीच आशा नसतात. झटपट प्रश्न सोडविण्याची खात्री देणार्‍या विनाकष्ट भाग्य उजळविणार्‍या, गुप्तधन शोधून देण्याचा दावा करणार्‍या अवास्तव अंधश्रद्धा दारिद्य्राने त्रस्त, थकलेल्या (आणि श्रीमंतीने मस्त माजलेल्या) मनांना विलक्षण भुरळ घालतात. स्वतःचा विचार करताना अघोरी प्रकारांची भीती […]

Categories
नवी अंधश्रद्धा

मनी वसे ते सर्वत्र दिसे

वार्षिकांक - २०१८

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये एका चमत्काराच्या बातम्या पेपरमीडिया आणि व्हॉट्सअपद्वारे सगळीकडे पसरल्या. शिर्डीच्या साईबाबांचा चेहरा चंद्रावर दिसू लागला. साईबाबा चंद्रावर अवतरले, अशी बातमी वेगाने सगळीकडे पसरली. लोक घराबाहेर पडून चंद्रावरील साईबाबाचे दर्शन घेण्यास अधीर झाले. काहींनी दुर्बिणीतून तसेच बायनॉक्युलरवरून साईबाबाचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. ज्यांना चंद्रावर साईबाबा दिसले नाहीत, ते पापी किंवा साईबाबाच्या […]

Categories
व्यक्तिविशेष

विवेकी लेखिका : ताराबाई शिंदे

वार्षिकांक - २०१८

‘स्त्री–पुरुष तुलना’ हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी सन 1882 मध्ये लिहिले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘स्त्री–पुरुष तुलना’ अथवा ‘स्त्रिया व पुरुष यात साहसी कोण?’ हे स्पष्ट दाखविण्याकरिता हा निबंध ताराबाई शिंदे यांनी रचिला असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ज्या काळात ‘चूल आणि मूल’ हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले जात होते, जगात कुठेच स्त्रीवादी विचारांचा उदय झाला नव्हता; अशा […]