कोर्या साडीचा गंध लिंबाचा गंध भंडार्याचा गंध फुलांचा गंध कडू हिरवा गोड सफेद तुरट पिवळा घमघम कळना नाकाला काई येगयेगळ आज्जीन आंघोळ घाटलीती उष्ण उदकानं जसा सूर्यच ओतायलीती अंगावर निस्त्या वाफांनी धुकं भरतेल दगडी न्हाणीत जसा भिंतीना पाझर फुटल आत्ता, पण नही फुटला लिंब बांधलाता वल्या आंगाला देवासमूर केसांचा आंबाडा नारळायेवढा, आंबोली, जाईजुईचे गजरे मस्तकावर […]
गावनवरी : स्त्रीशोषणाची गाथा