Categories
परिसंवाद

संतांनी समतेचा विचार मांडून धार्मिक दहशतवादाला व असहिष्णुतेला विरोध केला

वार्षिकांक - २०१८

ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एका सुंदर-सुश्राव्य श्लोकाने केली. संत ज्ञानेश्वरांच्या अभंग पंक्तीही यांनी उद्धृत केल्या. ‘जे अविवेकाची काजळी। फेडोनी विवेकदीप उजळी। ते योगिया पाही दिवाळी निरंतर॥’ धार्मिक दहशतवाद आणि अहिष्णुतेविरोधी परिषद घेण्याचे कारण नमूद करताना त्यांनी वारकरी संप्रदायाच्या स्थापनेचा संदर्भ दिला. ज्या-ज्या वेळी समाजात असे असहिष्णू वातावरण तयार झाले किंवा होत असते, […]

Categories
कार्याध्यक्षांची डायरी

नवे पर्व, नवी आव्हाने…

वार्षिकांक - २०१८

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासोबतच देशाच्या स्वातंत्र्य वर्षाला 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाला 26 जानेवारी 2025 रोजी 75 वर्षेपूर्ण होणार आहेत. या तीनही महत्त्वपूर्ण घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजपरिवर्तनाच्या कामाचा लेखाजोखा मांडला जाणे आवश्यक वाटते. महाराष्ट्र राज्य हे धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठी […]

Categories
बालविभाग

द़ृष्टीभ्रम

वार्षिकांक - २०१८

मुलांनो! मराठीत एक म्हण आहे, ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’. पण ही म्हण अपुरी आहे. बहुतेक वेळा आपण जे पाहतो ते खरेच असते. आपण झाड पाहतो, चंद्र पाहतो, सूर्य पाहतो, एकमेकांना पाहतो. आपला डोळा आपल्याला सृष्टीचे वास्तव ज्ञान देतो; पण काही वेळा विशिष्ट परिस्थितीत आपले डोळेदेखील फसतात, हे खरे आहे. आपले डोळे जेव्हा फसतात, […]

Categories
संपादकीय

चला, तयारीला लागू या!

ऑक्टोबर - २०१८

नोव्हेंबर महिना जवळ आलाय. आपणा सर्व कार्यकर्त्यांना आणि आमच्या वाचकांना वैचारिक साहित्याची मेजवानी देणार्‍या विशेषांकाची तयारी आम्ही सुरू केलीय. आपल्या नेहमीच्या अंकात अंनिसच्या चळवळीचे रिपोर्टिंग हा प्रमुख विषय असतो, काही वैचारिक लेखही असतात. सामाजिक क्षेत्रात घडणार्‍या अविवेकी घटनांवर प्रतिक्रिया नोंदविणारे लेख पण आपण या अंकातून प्रसिद्ध करतो; पण विशेषांकाची यापेक्षा वेगळी अशी खासियत असते. त्यामुळे […]

Categories
परिषद

धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद

ऑक्टोबर - २०१८

सध्या देशातील वातावरण अतिशय चिंताजनक आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतर विचारवंतांच्या खुनासाठी पकडले गेलेले आरोपी हे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. ‘आमच्या धर्माविरोधी बोललात, तर तुम्हाला संपवून टाकू,’ ही प्रवृत्ती अत्यंत घातक व संविधानविरोधी आहे. आमच्या विचारांच्या विरोधात बोललात, तर तुम्ही देशद्रोही, सत्ताधारी मंत्री व अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये, झुंडशाहीने […]

Categories
मंथन

हिंसेशी अहिंसेने लढण्याचे धाडस हवे – डॉ. गणेश देवी

ऑक्टोबर - २०१८

‘आज लोकांच्या भल्यासाठी आवाज उठविणारे पकडले जात आहेत, त्यांचा आवाज थांबवले जात आहे. लेखक-पत्रकारांवर हल्ले होत आहेत. प्रस्थापितांना त्रासदायक असे कुणी बोलू नये, लिहू नये असा प्रयत्न केला जाण्याचे प्रमाण जगभरातच वाढत आहे. अशा वेळी वंचितांचा आवाज टिकवून ठेवण्यासाठी ‘पेन’सारख्या संस्थांची गरज आहे. एक नव्या स्वरुपाचा हिंसक समाज निर्माण होऊ लागला आहे; पण त्याचे प्रत्युत्तर […]

Categories
मंथन

आत्म्याशी बोलणे हा मानसिक आजार

ऑक्टोबर - २०१८

समाजातील सध्याच्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’ हे अभियान गेले तीन वर्षे चालवत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी अंनिसने केलेले सगळे प्रयत्न हे अहिंसक आणि संवैधानिक होते. या पार्श्वभूमीवर समाजातील जमावाची वाढती हिंसा आणि टोकाच्या धार्मिक प्रभावामधून झालेली ‘बुरारी’ सारखी कुटुंबाच्या आत्महत्येची हिंसा आणि तेलंगणामध्ये झालेली प्रणयची […]

Categories
अनिष्ट रुढी - परंपरा

साबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेशाचा हक्क : सर्वोच्च न्यायालय

ऑक्टोबर - २०१८

कोणत्याही धार्मिक स्थळात सर्व वयाच्या स्त्रियांना आपल्या मर्जीप्रमाणे प्रवेश घेण्याचा हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिनांक 28 सप्टेंबर रोजी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने बहुमताने (चार विरुद्ध एक) दिलेला आहे. त्यामुळे केरळमधील साबरीमाला येथील अय्यप्पाच्या मंदिरात 10 ते 50 वर्षांच्या स्त्रियांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. केरळ सरकारने या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर साबरीमालाच्या मुख्य पुजार्‍याने म्हटले […]

Categories
युवा मानस

अमृता, प्रणय आणि तुम्ही …

ऑक्टोबर - २०१८

प्रिय मित्र–मैत्रिणींनो, मागच्या आठवड्यात प्रणय आणि अमृताची बातमी वाचली आणि मनाचा तळ ढवळला गेला, असे वाटले. तेलंगणातील ही घटना. प्रणयकुमार हा दलित तरुण आणि अमृता वर्शिणी ही उच्च जातीतली, धनाढ्य घरची मुलगी. दोघांचे प्रेम होते आणि अमृताच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. आपल्या धनाढ्य बिल्डर वडिलांच्या धमक्यांना न घाबरता अमृताने प्रणयशी लग्न केले, ही गेल्या जानेवारीतली […]

Categories
प्रासंगिक

समलैंगिकतेचा हक्क : प्रखर संघर्षाची 25 वर्षे – चयनिका शाह

ऑक्टोबर - २०१८

पाव शतकाचा प्रदीर्घ लढा जेव्हा निर्णायक स्थितीला पोचतो, तेव्हा जगभर पसरलेल्या आपल्यासारख्या अनेकांच्या भावना काय असतील, याची आपण कल्पना करू शकतो. 6 सप्टेंबर 2018 ला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने भारतीय दंडसंहितेचे 377 वे कलम, जे समलैंगिक संबंधांना नैसर्गिक न मानता गुन्हेगारीचे रूप देत होते, त्या कलमाला अंशत: रद्दबातल केले. ‘जोपर्यंत आपल्यातले सारे मुक्त नाहीत, तोपर्यंत आपल्यातील […]